MB NEWS-राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या परळी शहर अध्यक्षपदी प्रा. वर्षा दहीफळे

 राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या परळी शहर अध्यक्षपदी प्रा. वर्षा  दहीफळे



परळी वैजनाथ ,प्रतिनिधी....

       राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या परळी शहर अध्यक्षपदी येथील प्रा. वर्षा उमाकांत दहीफळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत नियुक्तीचे पत्र नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व न.प.गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

         राष्ट्रवादी युवती काँग्रेस हा युवतींसाठी देशातील पहिला राजकीय मंच असून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या निमंत्रक खासदार सुप्रियाताई सुळे, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित ,बजरंग सोनवणे, जिल्हाध्यक्षा सौ. विद्या जाधव यांच्या मान्यतेने परळी शहराध्यक्ष म्हणून प्रा. वर्षा उमाकांत दहिफळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पक्ष बळकटीसाठी व पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण कार्यरत राहू असा विश्वास नवनियुक्त शहराध्यक्ष प्रा. वर्षा दहिफळे यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !