पोस्ट्स

MB NEWS-परळीत साडेचार लाखांचा गुटखा पकडला

इमेज
  परळीत साडेचार लाखांचा वाहनासह गुटखा पकडला परळी (प्रतिनीधी)  परळी शहरातील विद्यानगर भागात विक्रीसाठी आणलेला गुटख्याने भरलेला छोटा हत्ती टेंम्पो अप्पर पोलिस अधिक्षक कविता नेरकर यांच्या पथकाने पकडुन 4 लाख 59 हजार 803 रुपयांचा गुटखा वाहनासह जप्त केला असुन याप्रकरणी दोघाविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  परळी शहरातील विद्यानगर भागात एका वाहनातून विक्रीसाठी गुटखा आणण्यात आल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे अप्पर पोलिस अधिक्षक कविता नेरकर यांना मिळताच सोमवार दि.12 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता अनिल दौंड,उपनिरीक्षक सिंगाडे मॅडम,चॉंद मेंडके, पोना.देवकते, पोशि. राऊत, खंदारे व इतर दोन खाजगी व्यक्तींनी छापा टाकला असता महिंद्रा जितो टेम्पो मध्ये राजनिवास पान मसाला,बाबा पानमसाला,रत्ना सुगंधीत तंबाखू ,विमल पानमसाला, आर.एम. डी. गुटखा, बाबा तंबाखू असा 59803 रुपयांचा गुटखा व गुटखा विक्रीसाठी आणलेले वाहन असा एकुण 4 लाख 59 हजार 803 रुपयांचा गुटखा जप्त करत दोघाविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात कलम 328,272,273 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MB NEWS-थेट वैष्णोदेवी हून परळीत येणार महाज्योत

इमेज
  चलो बुलावा आया है...माता ने बुलाया है थेट वैष्णोदेवी हून परळीत येणार महाज्योत नाथ प्रतिष्ठाण व राधा मोहन साथी प्रतिष्ठाणचा नवरात्र विशेष उपक्रम परळी/प्रतिनिधी नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आ.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण, न.प.गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शाखाली व चंदुलाल बियाणी अध्यक्ष असलेल्या  राधा मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने माँ वैष्णोदेवी देखावा सादर करण्यात येत असून या निमित्ताने जम्मू काश्मीर स्थित वैष्णोदेवी मंदिरातून महाज्योत परळीत आणण्यात येत आहे. उद्या दि.14 सप्टेंबर रोजी श्री वैद्यनाथ प्रभूंचे दर्शन घेवून विशेष वाहन वैष्णोदेवीच्या दिशेने जाणार आहे.  गणेशोत्सवानिमित्त परळीकरांचे आकर्षण ठरलेल्या अष्टविनायक दर्शन देखाव्यानंतर नवरात्रोत्सवानिमित्त माँ वैष्णोदेवी दर्शन देखावा साकारला जाणार आहे. औद्योगिक वसाहत येथे 31 ऑगस्टला माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते देखावा उभारणीचे काम सुरू झालेले असून सध्या हे काम प्रगतीपथावर आहे.  नवरात्र उत्सवात 700 फुट अंतराच्या भुयार, डोंगरदर्‍या व वैष्णोदेवी मार्गावर असलेला हुबेहुब देखावा प्रसिद्ध दृष्य स

MB NEWS-लम्पीमुळे पशुधनाची हानी झाल्यासपशुपालकास भरपाई देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

इमेज
  लम्पीमुळे पशुधनाची हानी झाल्यासपशुपालकास भरपाई देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई दि.१२ : - लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भावाने पशूचा मृत्यू होऊन हानी झाल्यास अशा पशुधनाच्या पालकांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. नुकसान भरपाईसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. मंत्रिमंडळाच्या याच बैठकीत पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याबाबत देखील मान्यता देण्यात आली.   राज्यातील पशुधनाला लम्पी चर्मरोगाचा वेगाने प्रादुर्भाव वेगाने होत असल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. यावेळी ज्या शेतकरी किंवा पशुपालकांचे पशुधन या आजारामुळे मृत्यू पावले आहेत त्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणामधील निकषानुसार राज्य शासनाच्या निधीतून भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी संबधित जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

MB NEWS-गणेशपार दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण फुले तर कार्याध्यक्षपदी शिवाजी देशमुख

इमेज
  गणेशपार दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण फुले तर कार्याध्यक्षपदी शिवाजी देशमुख  परळी (प्रतिनीधी)  परळी शहरातील गणेशपार दुर्गोत्सव मंडळाची कार्यकारीणी मुख्य मार्गदर्शक वैजनाथ बागवाले यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात येवुन अध्यक्षपदी बाळकृष्ण फुले तर  कार्याध्यक्षपदी शिवाजी देशमुख यांची निवड करण्यात आली.    परळी शहरातील जुना भाग असलेल्या गणेशपार भागात हिंदु सण सार्वजनिकरित्या साजरे करण्यासाठी या भागातील भक्तांनी पुढाकार घेत सन 1987 साली गणेशपार दुर्गोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरु केली कोरोना काळ वगळता मागील 35 वर्षात अखंडपणे दुर्गोत्सव साजरा केला जातो.गणेशपार भागातील सर्व भक्त यात सहभागी होतात.यावर्षीची कार्यकारीणी निवडण्यासाठी गणेशपार मंदिरात व्यापक बैठक पार पडली.या बैठकीत निवडण्यात आलेल्या उर्वरीत कार्यकारीणीत सचिवपदी: श्रीकांत पाथरकर तसेच सहसचिव: दिनेश लोंढे  उपाध्यक्ष: सचिन स्वामी  उपाध्यक्ष:चारुदत्त करमाळकर  उपाध्यक्ष: संजय गावडे  उपाध्यक्ष: शर्वकुमार चौधरी कोषाध्यक्ष: विष्णुदास भंडारी,सह कोषाध्यक्ष: श्रीकांत वाघमारे मुख्य संघटक:बालासाहेब देशमुख, गणेश सावंत  प्रसिद्धीप्

MB NEWS- प्रा.रविंद्र जोशी यांचा विशेष ब्लॉग>>>>सर्वांना आपली वाटणारी- "चिमणी" ऐन पन्नाशीत उडाली भुर्रऽऽऽ

इमेज
  परळीत स्थायिक झालेली - इटालियन कुळातील - सर्वांना आपली वाटणारी- "चिमणी" ऐन पन्नाशीत उडाली भुर्रऽऽऽ प रळी वैजनाथ /प्रा.रविंद्र जोशी.....         काही वस्तू, काही व्यक्ती ,काही इमारती, काही जागा ,काही प्राणी, काही पक्षी, काही पदार्थ ,काही कला, काही परंपरा, काही रस्ते, काही चौक, या त्या भागाच्या- त्या त्या गावाच्या- त्या त्या परिसराच्या प्रतिनिधिक प्रतीक बनलेल्या असतात.        परळी व परिसराचे एक ऊर्जावान प्रतीक म्हणून ज्योतिर्लिंग प्रभू वैजनाथ मंदिरानंतर परळी औष्णिक विद्युत केंद्राची ओळख आहे. परंतु परळी औष्णिक विद्युत केंद्र म्हणजे नेमके कोणते चित्र डोळ्यासमोर येणार तर सर्वांच्याच मनामनात आणि डोळ्यात साठवलेले प्रतीक म्हणजे थर्मलच्या धूर निघणाऱ्या तीन चिमण्या. आज या तीन चिमण्यांपैकी एक चिमणी आपल्यातून भूर उडून निघून गेली.       खरंतर ही निर्जीव वस्तू परंतु प्रत्येक परळीकर आला आणि परळीच्या पंचक्रोशीत राहणाऱ्या प्रत्येकाला एक प्रकारची हुरहुर वाटली आणि मन काही काळासाठी का होईना विषन्न झालं प्रत्येकाची भावना आणि प्रतिक्रिया ही शोकयुक्त आणि हळवी होती यातच या निर्जीव चिमणीने प्रत

MB NEWS-कोरोना काळातील कार्य: थर्मलचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचा राज्यपालांनी केला सन्मान

इमेज
  कोरोना काळातील कार्य: थर्मलचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचा राज्यपालांनी केला सन्मान परळी वैजनाथ:औष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते मुंबई येथील राजभवन येथे सन्मान करण्यात आला. कोरोना काळात औष्णिक विद्युत केंद्रात ऑक्सिजन प्लांट अतिशय तातडीने उभारण्यात मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचा सिंहाचा वाटा होता. ऑक्सिजन प्लांटमुळे हजारो नागरिकांचे कोरोना काळात प्राण वाचले होते. आव्हाड यांनी केलेल्या सेवेबद्दल त्यांचा मुंबईतील राजभवन येथे कोरोना वारियर्स हा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी सन्मान केला. कोरोना काळात संपूर्ण राज्यासह बीड जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता. याच काळात औ.वि केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी परळी औष्णिक विद्युत केंद्रात ऑक्सीजन प्लांट तातडीने कार्यान्वित करून कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात प्लांट च्या माध्यमातून उपलब्ध करून दिला होता. याची दखल घेत राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते मुंबई येथील राजभवन येथे म

MB NEWS-केंद्रीयमंत्री ना.नितीन गडकरी यांची घोषणा

इमेज
  चेतन सौंदळेंचा पाठपुरावा: श्री.संत मन्मथ-शिवलिंग पालखी मार्ग नामकरण होणार  केंद्रीयमंत्री ना.नितीन गडकरी यांची घोषणा    वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधी मंदीर बांधकाम भूमीपुजन सोहळयानिमित्त शनिवार दि.10 सप्टेंबर रोजी भारत सरकारचे केंद्रीय परीवहन,भुपृष्ठ वाहतुक मंत्री ना.नितीन गडकरी यांनी राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रमुख उपस्थित सुरू झालेल्या श्री.संत मन्मथ स्वामी पालखी व दिंडी जाणा-या अहमदपुर-किनगांव-पुस-अंबाजोगाई-केज-नेकनुर-मांजरसुंभा-श्रीसंत मन्मथ स्वामी,कपीलधार मार्गास श्रीसंत मन्मथ-शिवलिंग पालखी मार्ग नामकरणाची घोषणा करून राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधी मंदीर बांधकाम व सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्यावतीने सर्वोत्परी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.       कार्तिक पोर्णिमेच्या औचित्यावर बीड जिल्हयातील कपीलधार,मांजरसुंभा येथे श्री.संत मन्मथ स्वामींच्या दर्शनासाठी लाखो भाविक राज्य व परराज्यातून येतात.      राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी अ

MB NEWS-छत्रपतींच्या हस्ते तुळशीराम पवार "भारत गौरव पुरस्काराने" सन्मानित

इमेज
  छत्रपतींच्या हस्ते तुळशीराम पवार "भारत गौरव पुरस्काराने" सन्मानित  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) "सुशोभिता वेलफेअर एसोसिएशन प्रा.लि,ह्युमनवेल & अँटीकरप्शन इंडिया फाऊंडेशनच्या वतीने"दिला जाणारा "भारत गौरव पुरस्कार२०२२" मराठवाड्यातील व्यसनमुक्ती चळवळीचे नेते श्री तुळशीराम पवार यांना प्रदान करण्यात आला. दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी राजर्षी शाहू छत्रपती स्मारक, दसरा चौक, कोल्हापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या शुभहस्ते "भारत गौरव पुरस्कार 2022" हा पुरस्कार देउन गौरव करण्यात आला आहे. "सुशोभिता वेलफेअर एसोसिएशन प्रा.लि.ह्युमनवेल & अँटीकरप्शन इंडिया फाऊंडेशन" च्या मॅनेजिंग डायरेक्टर शोभा कोकिटकर यांच्याकडून पुरस्कारा साठी निवड करण्यात आली होती. कोणत्याही संस्कृतीच्या संवर्धन, संगोपन आणि संरक्षणासाठी समाजातील विविध कार्यक्षेत्रांना विशेष महत्त्व असते. संस्कृतीची नीतिमूल्य व वैशिष्ट्ये शोधून त्यांचे जतन, विकास व प्रचार - प्रसार करण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाची असते. एक जबाबदार व कर्तव्यदक्ष समाज घटक या नात्याने आपल्या कार्यात

MB NEWS-परळी तालुक्यात वीज कोसळली :शेतकरी बालंबाल बचावला मात्र एक बैल मृत्यूमुखी

इमेज
  परळी तालुक्यात वीज कोसळली :शेतकरी बालंबाल बचावला मात्र एक बैल मृत्यूमुखी परळी वैजनाथ,...              परळी तालुक्यातील लेंडेवाडी येथे आपल्या शेतात बैल चारत असलेल्या जागेवर आज (दि.12) अचानक दुपारच्या सुमारास वीज कोसळली. यामध्ये एक बैल मृत्युमुखी पडला असून शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.      लेंडेवाडी येथे शेतकरी उत्तमराव पवार हे आपल्या शेतात असताना एका ठिकाणी बैल चारत उभे होते. सकाळपासूनच ढगाळ वातावरण व रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटात वातावरण तयार झाले होते. छत्री घेऊन ते बैल चारत असताना अचानक विजेचा कडकडाट होऊन वीज कोसळली. यामध्ये चरत असलेला बैल मृत्युमुखी पडला तर शेतकरी उत्तमराव पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.    दरम्यान घटनास्थळी तलाठी व मंडळाधिकारी यांना पाठवण्यात आले असून घटनेचा पंचनामा करून सखोल माहिती घेतली जात असल्याची माहिती परळीचे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांनी दिली आहे.

MB NEWS- *परळीच्या थर्मलचे प्रतीक नेस्तनाबूत: मराठवाड्यातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक तीनची चिमणी जमीनदोस्त*

इमेज
 *परळीच्या थर्मलचे प्रतीक नेस्तनाबूत: मराठवाड्यातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक तीनची चिमणी जमीनदोस्त* परळी वैजनाथ, ...           मराठवाड्यातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र असलेल्या परळी जिल्हा बीड येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या संच क्रमांक तीनची धूरवाहक चिमणी आज जमीन दोस्त करण्यात आली. परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतीक बनलेल्या तीन धुराच्या चिमण्यांपैकी एक चिमणी आज सकाळी जमीनदोस्त करण्यात आली आहे. 120 फूट उंचीची असलेली ही चिमणी आज सकाळी नऊ वाजता जमीनदोस्त करण्यात आली.                 मराठवाड्यातील पहिले औष्णिक विद्युत केंद्र परळी येथे सन 1971 मध्ये सुरू झाले. त्यावेळी धूर वाहण्यासाठी तीन चिमण्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. 1971 पासून या तीन चिमण्या परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतीक बनल्या होत्या. सद्यस्थितीला परळी येथे एकूण आठ संच निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यापैकी संच क्रमांक एक ,दोन, तीन हे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आयुर्मान संपल्यामुळे ही चिमणी पाडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये संच क्रमांक तीन पूर्णतः अवसायनात काढण्याची प्र

MB NEWS-स्वातंत्र्य लढ्यात सहभागी 'क्रांतिकारी संत' शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांचं देहावसान!

इमेज
  स्वातंत्र्य लढ्यात सहभागी 'क्रांतिकारी संत' शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांचं देहावसान! नवी दिल्ली :  शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांचं निधन झालंय. ते ९९ वर्षांचे होते. मध्य प्रदेशच्या नरसिंहपूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. नरसिंहपूरमध्ये ते वास्तव्याला असायचे. आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. राम मंदिरासाठी झटणारे शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती गेले... राम मंदिर लढ्यात शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांचा मोठा वाटा राहिला. अगदी काही दिवसांपूर्वी त्यांचा ९९ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. स्वातंत्र्याच्या लढाईत त्यांनी भाग घेतला होता. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. त्यांचा ज्योतिषाचा अभ्यासही दांगडा होता. याआधीही वेगवेगळ्या धार्मिक मुद्द्यांवरही त्यांनी रोखठोक मतं मांडली होती. एकूणच धार्मिक वर्तुळातलं शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती हे नाव मोठं होतं. १९८१ साली त्यांना शंकराचार्य ही उपाधी मिळाली. त्यांच्याकडे बद्री आश्रम आणि द्वारकापीठाची जबाबदारी होती. साईबाबाच्या दर्शनाला जाऊ नका,

MB NEWS-स्वयंअध्ययनातून मिळवले यश: वसुंधरा आघावने नीट परीक्षेत संपादित केले ६१७ गुण

इमेज
  स्वयंअध्ययनातून मिळवले यश: वसुंधरा आघावने नीट परीक्षेत संपादित केले ६१७ गुण परळी वै ता.११ प्रतिनिधी परळी शहरातील विद्या नगर भागातील कु. वसुंधरा उध्दव आघाव हीने नीट परिक्षेत घवघवीत यश मिळउन डॉक्टर बणण्याचे स्वप्नावर यशस्वी वाटचाल केली आहे.     नेशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात नीट परीक्षा २०२२ चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये परीक्षेमध्ये वसुंधरा उध्दव आघाव या विद्यार्थीनीने खाजगी शिकवणी न लावता स्वतःच्या अभ्यासावर ६१७ गुण घेत यश संपादन करुन एमबीबीएस चा प्रवेश निश्चीत करूण आपले डॉक्टर बनण्याचे स्वप्न खरे करुन दाखवले आहे.     कु.वसुंधरा ही गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालयातील प्रा. उध्दव आघाव यांची कन्या आहे. वसुंधरा हिचे १२ चे शिक्षण लातूर येथील दयानंद महाविद्यालयात झाले आहे. मागच्या वर्षी पहिल्या प्रयत्नात तिने नीट परीक्षेत ५१३ गुण घेऊन उत्तीर्ण झाली मात्र त्यावेळी तिला खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळत होता मात्र तिने पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्धार करून अभ्यासाला सुरुवात करून या वर्षी ६१७ गुणासह उत्तीर्ण होऊन आपला शासकीय महाविद्यालयात प्रवेशाचा मार्ग सुकर केला आहे. आ

MB NEWS-हृदय पिळवटून टाकणारी घटना: सख्या मामानेच केला चिमुकल्या भाच्याचा खून

इमेज
  हृदय पिळवटून टाकणारी घटना: सख्या मामानेच केला चिमुकल्या भाच्याचा खून परळी वैजनाथ, प्रतिनिधी....            अतिशय हेलावून टाकणारी व हृदय पिळवटून टाकणारी घटना परळी तालुक्यातील नागापूर कॅम्प येथे घडलेआहे. आपल्या मामाच्या गावी आलेल्या चार वर्षाच्या चिमुकल्या भाच्याचा झोपेत सख्या मामानेच घरातील बतईने पोटात वार करून खून केल्याची घटना दि.10 रोजी मध्यरात्रीत घडली आहे. आजसकाळी झोपेतून जागे होताच ही घटना समोर आली आहे.           याबाबत प्राप्त अधिक माहितीनुसार, दौनापूर तालुका परळी येथील चिमनकर कुटुंब हे नागापूर कॅम्प येथे गेल्या काही वर्षांपासून राहायला आलेले आहे. या कुटुंबातील विवाहित मुलगी सुरेखा विकास करंजकर रा.लाडेगाव ता केज ही आई व भावाला भेटण्यासाठी म्हणून तीन दिवसापूर्वीच आपल्या चार वर्षिय कार्तिक विकास करंजकर मुलाला सोबत घेऊन माहेरी आली होती. आज दि.11 रोजी ते परत आपल्या सासरी जाणार होते.काल दिनांक दहा रोजी रात्री घरातील सर्वजण एकत्र जेवण करून सर्वजण शेजारी शेजारी झोपले. सर्वजण झोपेत असताना या मुलाचा सख्खा मामा शहाणिक लक्ष्मण चिमणकर वय अंदाजे 25 वर्ष हा अचानक उठला.त्याने घरातील भाजी

MB NEWS-परळीत गणेश विसर्जनाच्या 24 मिरवणुका तगडा पोलीस बंदोबस्त

इमेज
  परळीत गणेश विसर्जनाच्या 24 मिरवणुका तगडा पोलीस बंदोबस्त   परळी वैजनाथ ,प्रतिनिधी  .       गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहेत. परळी शहरात एकूण 24 मिरवणुका निघणार असून या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. त्याचबरोबर मिरवणुकांवर सीसीटीव्ही कॅमेरा च्या माध्यमातूनही लक्ष ठेवले जाणार आहे.        गेल्या दहा दिवसापासून  अतिशय उत्साहाने  गणेशोत्सव साजरा केला जात आहे. आज अनंत चतुर्दशी दिवशी गणेश विसर्जन होणार आहे. गणेश विसर्जनाच्या शहरात एकूण 24 मिरवणूका असून संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नऊ शहर पोलीस ठाणे हद्दीत 15 अशा मिरवणूक निघणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी व संवेदनशील ठिकाणी पोलीस पॉईंट लावण्यात आले आहे. त्याचबरोबर शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे .संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच अधिकारी वीस कर्मचारी पंचवीस होमगार्ड तर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा अधिकारी 25 कर्मचारी वीस होमगार्ड बंदोबस्तावर तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे बॅ

MB NEWS-आईने धुनी भांडी करून शिकवले: मुलाने केले चीज परळी तालुक्यातील सेलूचा विनायक भोसले याने नीट मध्ये मिळवले 595 गुण

इमेज
  आईने धुनी भांडी करून शिकवले: मुलाने केले चीज परळी तालुक्यातील सेलूचा विनायक भोसले याने नीट मध्ये मिळवले 595 गुण अंबाजोगाई, प्रतिनिधी... आई लोकांची धुणीभांडी करते, कसल्याही भौतिक सुविधा नाहीत, ना शिकवणी, ना कसला आधार तरीही मुलाने हार मानली नाही. यूट्यूबवरील अभ्यासक्रमांचे व्हिडीओ पाहून सेल्फस्टडी करत विनायक अर्जुन भोसले याने नीट परीक्षेत ५९५ गुण प्राप्त केले आहेत. अंगी जिद्द व चिकाटी असेल तर आर्थिक स्थिती अडसर ठरत नाही याचा प्रत्यय विनायकने समाजासमोर ठेवला आहे.  विनायक अर्जुन भोसले रा.सेलू ता. परळी. याच्या वडिलांचे सन-२०१४ मध्ये अपघाती निधन झाले. पतीच्या निधनानंतर खचून न जाता विनायकाची आई सुनीता यांनी लोकांच्या घरची धुनी-भांडी करून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले.त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. मुलांच्या शिक्षणासाठी सुनीताबाई यांनी अंबाजोगाई गाठले. आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने त्यांनी अंबाजोगाईत धुणे-भांडी करण्याचे काम सुरू केले. व एकाच छोट्याशा भाड्याच्या खोलीत हे चारजनांचे कुटुंब राहते.याच ठिकाणी सर्वजण एकत्रित अभ्यास करतात. आईचे कष्ट व आर्थिक परिस्थिती याची जाणीव ठेवून वि

MB NEWS-बांधकाम मिस्त्री चा मुलगा होणार डॉक्टर:नीट परिक्षेत मुदस्सिर अजीज खान चे घवघवीत यश

इमेज
  बांधकाम मिस्त्री चा मुलगा होणार डॉक्टर:नीट परिक्षेत मुदस्सिर अजीज खान चे घवघवीत यश परळी / प्रतिनिधी:- परळी शहरातील हबीबपुरा भागातील रहिवाशी अजिज खान यांच्या मुलाने नीट परिक्षेत उत्तीर्ण होऊ मुलांने कुटुंबातील डॉक्टर बणण्याचे स्वप्नावर यशस्वी वाटचाल केली आहे.  बुधवारी राञी उशीरा नेशनल टेस्टिंग एजन्सी ने नीट परीक्षा 2022 चा ऑनलाईन निकाल घोषीत केला यामध्ये 720 मधून खान मुदस्सिर अजीज हिने 503 मार्कस घेत यश संपादन केले आहे. त्याच्या कुटुंबाची हलाखिची परिस्थिती आहे तरीही  जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिसऱ्या प्रयत्नात हे यश संपादन करुन एमबीबीएस डॉक्टर बनण्याचे स्वप्न खरे करुन दाखवले.  वडील खान अजीज हे बांधकाम मिस्त्री असून आपल्या कुटुबाची उपजिविका भागवतात. मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत मुदसिर खान ह्याला दहावीमध्ये गणित विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण मिळाले होते. मात्र त्यांनी आपल्याला भविष्यात डॉक्टर बनून लोकांची सेवा करायची आहे त्यासाठी नीटची तयारी सुरू केली होती आणि आता त्याला त्यामध्ये यश पण प्राप्त झाला आहे मुदस्सिर खान यांच्या या यशा मागे आई आणि वडील य

MB NEWS-चोरट्यांचा धुमाकूळ: एकाच रात्री फोडली पाच दुकाने

इमेज
चोरट्यांचा धुमाकूळ: एकाच रात्री फोडली पाच दुकाने गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे दि.८ रोजी चोरट्यांनी धुमाकूळ घालत  बसस्थानक परिसरातील ज्ञानराज व देवा हे दोन मेडिकल वर चोरट्याने हात साफ केला तर  येथून जवळच असलेल्या  हायवे वरील फुलझळके मेडिकल आणि बोरगाव रस्त्यावर असलेले बाबुराव गाडे यांचे माऊली ॲग्रो एजन्सी तर शुभम ज्वेलर्स या पाच दुकानांचे शटर उचकटून फोडण्यात आले. या सर्व ठिकाणावरून चोरट्यांनी रोख रक्कम तर शुभम ज्वेलर्स मधून चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले  चोरटीने एका दिवशी पाच दुकानावर हात साफ केल्यावर नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस स्टेशनचे  डीबी पथकाचे प्रमुख प्रफुल्ल साबळे यांनी या ठिकाणी भेट दिली असून पुढील तपास करत आहेत.

MB NEWS-आफ्रिकेत व दक्षिण भारतात आढळणारा अतिशय दुर्मिळ शॅमेलिऑन लिजर्ड सरडा आढळतोय परळीच्या मेरुगिरी डोंगररांगात !

इमेज
  आफ्रिकेत व दक्षिण भारतात आढळणारा अतिशय दुर्मिळ शॅमेलिऑन लिजर्ड सरडा आढळतोय परळीच्या मेरुगिरी डोंगररांगात  ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी...  परळीच्या मेरुगिरी डोंगररांगात शॅमेलिऑन लिजर्ड अर्थात अतिशय दुर्मिळ समजला जाणारा सरडा आढळून येत आहेत.यापुर्वी अशा प्रकारचे सरडे पाहण्यात आले नव्हते.त्यामुळे शेतकरी, नागरिकांत या सरड्याबद्दल कुतुहल निर्माण झाले आहे. शॅमेलिऑन लिजर्ड आढळून आल्यानंतर याबाबत वन विभागाला कळविले तसेच प्राणीशास्त्र अभ्यासकांना याविषयी विचारले असता हा दुर्मिळ समजला जाणारा सरडा शॅमेलिऑन लिजर्ड असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.       शॅमेलिऑन लिजर्ड हा दुर्मिळ जातीचा सारडा अत्यंत दुर्मिळ समाजाला जातो. आफ्रिकेत आढळणारा हा सरडा आपल्याकडे क्वचित दिसून येतो. दक्षिण भारतात  या जातीचा सरडा आढळून येतो असे प्राणी अभ्यासक सांंगतात.साधारण सहा इंच लाब असलेला हा सारडा प्रामुख्याने झाडावर आढळून येतो.हिरव्या रंगाचा असलेला हा सरडा, रंग बदलणारा सरडा म्हणून ओळखला जातो. ज्या झाडावर हा सारडा असतो त्या झाडाच्या पानाच्या रंगाप्रमाणे तो आपल्या रंगाची छटा बदलतो. ह्या सरड्याच्या गळ्यावर आणि पोटावर पा

MB NEWS-मयताच्या खात्यावरील पैशाचा अपहार;विधवा पत्नीची पोलिसांकडे धाव

इमेज
मयताच्या खात्यावरील पैशाचा अपहार;विधवा पत्नीची पोलिसांकडे धाव अंबाजोगाई (प्रतिनिधी) : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंबाजोगाई शाखेतील घोटाळा उघडीस आला असून मयत व्यक्तीच्या खात्यावरील पैसे बँक कर्मचा-यांशी संगनमत करून परस्पर हडप केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत मयताच्या पत्नीने पोलिसांत धाव घेतली असून बँक कर्मचारी आणि संबंधित घोटाळेबाजांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, येल्डा, ता. अंबाजोगाई येथील रहिवासी भाऊसाहेब दामू चामनर यांचे बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंबाजोगाई शाखेत खाते आहे. त्यांचा खाते क्रमांक 000411002011470 असा आहे. या खात्यावर भाऊसाहेब चामनर यांनी मुलीचे शिक्षण आणि लग्नासाठी काही रक्कम ठेवली होती. दुर्दैवाने भाऊसाहेब चामनर यांचे 16 मार्च 2016 रोजी अकस्मिक निधन झाले.  पतीच्या अकस्मिक झालेल्या निधनाचा धक्का त्यांची पत्नी परिमाळा भाऊसाहेब चामनर यांना बसला. या दुःखातून सावरल्यानंतर परिमाळा या आपल्या पतीच्या नावे जमा असलेल्या रकमेबद्दल चौकशी करण्यासाठी बँकेत गेल्या तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊ परत पाठविण्यात आले. तोंडी मागणी करून,  अर्ज

MB NEWS-कै. ल . दे . महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ' एकाग्रता ' कार्यक्रम संपन्न*

इमेज
 * कै. ल . दे . महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ' एकाग्रता ' कार्यक्रम संपन्न*  परळी , दि. 8/9/20022 (प्रतिनिधी)   येथील कै. ल .दे . महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी श्री प्रिताजी व श्री कृष्णाजी संचलित विश्वशांती ' एकाग्रता' कार्यक्रम घेण्यात आला . त्याअंतर्गत विद्यार्थिनींननी मनशांतीसाठी काय केले पाहिजे. याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन तपस्वी सौ.विद्या वंगे व सौ. सरिता बेदरकर यांनी केले.  श्री प्रिताजी व श्री कृष्णाजी यांचा संकल्प याविषयी व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे विचार विद्यार्थापर्यंत पोहचवले. या ज्ञानातून विद्यार्थ्याची एकाग्रता,स्मरणशक्ती निर्णय क्षमता वाढीस लागण्यास मदत होते. युवापिढीस योग्यदिशा या कार्यक्रमातून मिळाली. याप्रसंगी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष संजय देशमुख , कोषाध्यक्ष प्रसाद देशमुख , संचालिका डॉ. विद्याताई देशपांडे -देशमुख , प्राचार्य डॉ .एल. एस . मुंडे कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा. डॉ.कचरे संगीता यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने

MB NEWS-शंभूराजे गणेशोत्सव मंडळाचे विविध उपक्रम; रक्तदान शिबीरात अनेकांचा सहभाग

इमेज
  रामानंद उगलेंच्या शाहिरीने श्रोते मंत्रमुग्ध! शंभूराजे गणेशोत्सव मंडळाचे विविध उपक्रम; रक्तदान शिबीरात अनेकांचा सहभाग परळी (प्रतिनिधी) गणेशोत्सव 2022 निमित्त तालुक्यातील मौजे पिंपरी बु. येथे शंभूराजे गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. बुधवारी दुपारच्या सत्रात रक्तदान शिबीर आयोजित केले होते, यात अनेकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवाला. तर सायंकाळच्या सत्रात शाहीर रामानंद उगले यांच्या जल्लोषपूर्ण शाहिरीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. भाजपा किसान सभेचे राज्य सदस्य उत्तम दादा माने व भाजपा तालुका सरचिटणीस सुरेश माने, रमेश पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली शंभूराजे गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळाकडून विविध लोकोपयोगी व सांस्कृतिक कार्यक्रम गावात राबविण्यात येत आहेत. बुधवारी रक्तदान शिबिरासह शाहीर रामानंद उगले यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उदघाटन प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, उत्तम दादा माने, भाजपा तालुका सरचिटणीस सुरेश माने, सरपंच माऊली साबळे, चंद्रकांत देवकते, पत्रकार दत्तात्रय काळे, महादेव शिंदे, जनहित बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अन

MB NEWS-शेततळ्यातून माशांच्या अफलातून चोरी प्रकरणी ग्रामीण पोलीसांचा तपास : चोरी नाही तर मासे झाले मृत !

इमेज
  शेततळ्यातून माशांच्या अफलातून चोरी प्रकरणी ग्रामीण पोलीसांचा तपास : चोरी नाही तर मासे झाले मृत ! परळी वैजनाथ ,प्रतिनिधी...          शेततळ्यातून पाण्यातून काढून मासे चोरीला गेल्याची अफलातून चोरीच्या घटनेची नोंद परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिनांक सहा रोजी झाली होती. ही फिर्याद दाखल झाल्यानंतर परळी ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा वेगवान तपास केला. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता या ठिकाणी चोरी नाही तर हे मासे मृत झाले असल्याचे ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.         परळीत चोऱ्यांचे सत्र सुरू असतानाच चोरीचा अफलातून प्रकार समोर आला. एका जणाच्या शेतातील शेततळ्यामधील 50 हजार रुपये किंमतीचे 500 किलो वजनाचे मासे कोणीतरी अज्ञात चोरट्याने पाण्यातून काढून चोरून नेल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. टोकवाडी शिवारातील शेतामध्ये असलेल्या एका शेततळ्यातून पन्नास हजार रुपये किमतीचे मासे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले म्हणून  परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणात फिर्यादत

MB NEWS-लातूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन

इमेज
  राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची समाधी उकरून अस्थी चोरून नेण्याचा कट ! • लातूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन लातूर- अहमदपूर तालुक्यातील भक्तीस्थळ येथील लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असणारे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची समाधी उकरून त्यांच्या अस्थी चोरून नेण्याचा कट काही समाजकंटकांनी रचल्याचा धक्कादायक आरोप भक्ती स्थळ विश्वस्त मंडळाने केला आहे. याबाबत लातूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. भक्तीस्थळाला पोलीस संरक्षण देऊन समाधी खोदण्यास, अस्थी बाहेर काढण्यास मनाई करावी. तसेच संशयित समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक, कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.   राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या महानिर्वाणानंतर अहमदपूर तालुक्यातील भक्ती स्थळ इथे त्यांची विधिवत समाधी बांधण्यात आली. मात्र महाराजांच्या मृत्यूनंतरही त्याचे भांडवल करण्याचा कट काही समाजकंटक सातत्याने करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र आता तर महाराजांची भक्ती स्थळावरील समाधी उकरून त्यातील अस्थी पळविण्याचा घाट काही समाजकंटका

MB NEWS-महाराणा प्रताप गणेश मंडळाच्या श्रीं ची 56 सुवासिनींच्या हस्ते "56 भोग महाआरती"

इमेज
  महाराणा प्रताप गणेश मंडळाच्या श्रीं ची 56 सुवासिनींच्या हस्ते "56 भोग महाआरती"  परळी वैजनाथ (प्रतिनिधी)...    परळी शहरातील गणेशपार विभागातील देशमुख गल्ली या ठिकाणी सुप्रसिद्ध असणाऱ्या श्री महाराणा प्रताप गणेश मंडळाच्या बाप्पाची "56 भोग महाआरती" या भागातील 56 सौभाग्यवतींच्या हस्ते मोठ्या उत्साहात तथा हर्षोल्हासात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.      गणेशपार विभागातील देशमुख गल्ली या ठिकाणच्या सुप्रसिद्ध असणाऱ्या व नेहमीच विधायक उपक्रम राबवणाऱ्या महाराणा प्रताप गणेश मंडळ च्या वतीने प्रतिवर्षी बाप्पांच्या आगमनानंतर आगामी दहा दिवस वेगवेगले तथा नाविन्यपूर्ण उपक्रम अतिशय भक्तिमय वातावरणात राबवण्यात येतात. अतिशय हर्षोल्हासात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवामुळे तसेच मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या उपक्रमामुळे या भागात भक्तिमय तथा आनंददायी वातावरण निर्मिती होते. दिनांक 6 सप्टेंबर रोजी महाराणा प्रताप गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य मार्गदर्शक आबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बाप्पांच्या वैशिष्ट्यपूर्ण पूजेचे आयोजन केले होते. यावेळी 56 प्रकारचे वे

MB NEWS-अफलातून चोरी-आता चोरांचं काय करावं?: शेततळ्यातून पन्नास हजाराचे मासे नेले चोरून

इमेज
  अफलातून चोरी-आता चोरांचं काय करावं?: शेततळ्यातून पन्नास हजाराचे मासे नेले चोरून परळी वैजनाथ ,प्रतिनिधी...         परळीत चोऱ्यांचे सत्र सुरू असतानाच आता चोरीचा अफलातून प्रकार समोर आला आहे. एका जणाच्या शेतातील शेततळ्यामधील 50 हजार रुपये किंमतीचे 500 किलो वजनाचे मासे कोणीतरी अज्ञात चोरट्याने पाण्यातून काढून चोरून नेल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.       परळी शहर व तालुक्यात दैनंदिन चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. घरफोड्या, मोटरसायकल चोऱ्या  मोबाईल चोऱ्या, बाजारातील चोऱ्या, भुरट्या चोऱ्या हे नित्याचे झाले आहे. ग्रामीण भागात धान्याचे पोते, जनावरांच्या चोऱ्या हे सत्रही सुरूच आहे. यातच आता चोरीचा अफलातून प्रकार समोर आला आहे. टोकवाडी शिवारातील शेतामध्ये असलेल्या एका शेततळ्यातून पन्नास हजार रुपये किमतीचे मासे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत .याप्रकरणी फिर्यादी नंदकिशोर रामपालजी लोहिया यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 6 रोजी पहाटेच्या सुमारास फिर्यादीच्या टोकवाडी शिवारातील शेतातील शेततळ्यातून 500 किलो वजनाचे मासे ज्याची किंमत 50 हजार रुपये होत