इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-थेट वैष्णोदेवी हून परळीत येणार महाज्योत

 चलो बुलावा आया है...माता ने बुलाया है


थेट वैष्णोदेवी हून परळीत येणार महाज्योत

नाथ प्रतिष्ठाण व राधा मोहन साथी प्रतिष्ठाणचा नवरात्र विशेष उपक्रम

परळी/प्रतिनिधी

नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आ.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण, न.प.गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शाखाली व चंदुलाल बियाणी अध्यक्ष असलेल्या  राधा मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने माँ वैष्णोदेवी देखावा सादर करण्यात येत असून या निमित्ताने जम्मू काश्मीर स्थित वैष्णोदेवी मंदिरातून महाज्योत परळीत आणण्यात येत आहे. उद्या दि.14 सप्टेंबर रोजी श्री वैद्यनाथ प्रभूंचे दर्शन घेवून विशेष वाहन वैष्णोदेवीच्या दिशेने जाणार आहे. 

गणेशोत्सवानिमित्त परळीकरांचे आकर्षण ठरलेल्या अष्टविनायक दर्शन देखाव्यानंतर नवरात्रोत्सवानिमित्त माँ वैष्णोदेवी दर्शन देखावा साकारला जाणार आहे. औद्योगिक वसाहत येथे 31 ऑगस्टला माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते देखावा उभारणीचे काम सुरू झालेले असून सध्या हे काम प्रगतीपथावर आहे. 

नवरात्र उत्सवात 700 फुट अंतराच्या भुयार, डोंगरदर्‍या व वैष्णोदेवी मार्गावर असलेला हुबेहुब देखावा प्रसिद्ध दृष्य सजावटकार राकेश चांडक हे साकारणार आहेत. या देखाव्याचे इतर विशेष वैशिष्टय असून परळीतील भाविकांना माँ वैष्णोदेवीचे दर्शन घडावे या दृष्टीकोनातून विशेष मेहनत घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर येथील माँ वैष्णोदेवी मंदिरात प्रज्वलीत असलेल्या ज्योत परळी शहरात आणण्यात येत असून दि.14 सप्टेंबर रोजी विशेष वाहनाद्वारे प्रतिष्ठानचे सदस्य काश्मीरकडे रवाना होत आहेत. संपूर्ण प्रवास वाहनाचा असून तेथे प्रज्वलीत झालेली ज्योत थेट परळी शहरात येत असल्याने देवी भक्तांनाही त्याची उत्सुकता असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान यावर्षी नाथ प्रतिष्ठान व राधा मोहन साथी प्रतिष्ठान आकर्षक असा भक्तीपूर्ण देखावा सादर करेल व प्रत्येकाला आपण थेट वैष्णोदेवी येथेच आहोत असा साक्षात्कार होईल असा देखावा करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!