MB NEWS-केंद्रीयमंत्री ना.नितीन गडकरी यांची घोषणा

 चेतन सौंदळेंचा पाठपुरावा: श्री.संत मन्मथ-शिवलिंग पालखी मार्ग नामकरण होणार 


केंद्रीयमंत्री ना.नितीन गडकरी यांची घोषणा

   वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधी मंदीर बांधकाम भूमीपुजन सोहळयानिमित्त शनिवार दि.10 सप्टेंबर रोजी भारत सरकारचे केंद्रीय परीवहन,भुपृष्ठ वाहतुक मंत्री ना.नितीन गडकरी यांनी राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रमुख उपस्थित सुरू झालेल्या श्री.संत मन्मथ स्वामी पालखी व दिंडी जाणा-या अहमदपुर-किनगांव-पुस-अंबाजोगाई-केज-नेकनुर-मांजरसुंभा-श्रीसंत मन्मथ स्वामी,कपीलधार मार्गास श्रीसंत मन्मथ-शिवलिंग पालखी मार्ग नामकरणाची घोषणा करून राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधी मंदीर बांधकाम व सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्यावतीने सर्वोत्परी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

      कार्तिक पोर्णिमेच्या औचित्यावर बीड जिल्हयातील कपीलधार,मांजरसुंभा येथे श्री.संत मन्मथ स्वामींच्या दर्शनासाठी लाखो भाविक राज्य व परराज्यातून येतात.

     राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी अहमदपुर येथून सुरू केलेल्या श्री.संत मन्मथ स्वामी पालखी व दिंडीत हजारो भाविक सहभागी होत असतात सदरील पालखी व दिंडीचे जागोजागी उत्सुफुर्त स्वागत व प्रसादाचे नियोजन नागरिकांच्यावतीने केले जाते व स्वत: राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज भाविकांना आशीर्वचन करीत असत.महाराजांनी सुरू केलेल्या पालखी व दिंडी मार्गास श्री.संत मन्मथ-शिवलिंग पालखी मार्ग देण्याची मागणी शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे सर यांनी ना.गडकरी यांच्याकडे प्रत्यक्षभेटीद्वारे तसेच राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या परळी येथील 82व्या तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे व सद्भक्तांच्यावतीने करण्यात आली होती.याबाबतचा पाठपुरावा बीड जिल्हयाचे माजी पालकमंत्री श्री.जयदत्तअण्णा क्षीरसागर,आ.धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे यांच्या मार्फत करण्यात आला.

   श्री.संत मन्मथ-शिवलिंग पालखी मार्ग नामकरण तसेच डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या संजीवन समाधी बांधकाम व भक्तीस्थळाच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्वोत्परी मदत केल्याबद्दल ना.नितीन गडकरी व केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड,लातूर जिल्हयाचे खासदार श्री.सुधाकर श्रृंगारे,आमदार श्री.बाबासाहेब पाटील,आमदार श्री.रमेशअप्पा कराड व मान्यवरांचे आभार परळी येथील 82 व्या श्रावणमास तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे,कार्यअध्यक्ष शाहूराव ढोबळे,उपाध्यक्ष चंद्रकांत उदगीरकर,रमेशअप्पा सपाटे,वैजनाथ बागवाले,अॅड.मनोज संकाये,गिरीष बेंबळगे,सचिव संतोष पंचाक्षरी,सोमनाथ निलंगे,नंदकुमार खानापुरे,अशोक नावंदे,सोमनाथ गोपनपाळे,दयानंद चौधरी,वैजनाथ शेटे,सदानंद चौधरी,चंदूअप्पा हालगे,मकरंद नरवणे,जगदीश मिटकर,उमाकांत काळे,रवी मिसाळ,अरविंद चौधरी,प्रा.अमर आलदे,कैलास रिकीबे,राजाभाऊ हलकंचे,रमेश चौधरी सर,बाबासाहेब शिगे,रमेश काळे,प्रकाश खोत,दीपक कापसे,अतुल खके,बाबासाहेब चौधरी,विश्वनाथअप्पा लव्हराळे,चंद्रकात अंदुरे,शिवशंकर नाईक,शिरीष सलगरे,अनिल चौधरी,नागेश अलबिदे,मन्मथ नरवणे,शिवदीप चौंडे,संदीप चौधरी,मनोज बेंबळगे,संतोष जुजगर,सतीश कापसे,अशोकअप्पा झाडे,जगदीश महागांवकर,संजय कोरे,अमोल घेवारे,वैजनाथ निलंगे,अनिल मिसाळ व सर्व समाज बांधवांच्यावतीने व्यक्त करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !