इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS- प्रा.रविंद्र जोशी यांचा विशेष ब्लॉग>>>>सर्वांना आपली वाटणारी- "चिमणी" ऐन पन्नाशीत उडाली भुर्रऽऽऽ

 परळीत स्थायिक झालेली - इटालियन कुळातील - सर्वांना आपली वाटणारी- "चिमणी" ऐन पन्नाशीत उडाली भुर्रऽऽऽ



रळी वैजनाथ /प्रा.रविंद्र जोशी.....
        काही वस्तू, काही व्यक्ती ,काही इमारती, काही जागा ,काही प्राणी, काही पक्षी, काही पदार्थ ,काही कला, काही परंपरा, काही रस्ते, काही चौक, या त्या भागाच्या- त्या त्या गावाच्या- त्या त्या परिसराच्या प्रतिनिधिक प्रतीक बनलेल्या असतात. 
      परळी व परिसराचे एक ऊर्जावान प्रतीक म्हणून ज्योतिर्लिंग प्रभू वैजनाथ मंदिरानंतर परळी औष्णिक विद्युत केंद्राची ओळख आहे. परंतु परळी औष्णिक विद्युत केंद्र म्हणजे नेमके कोणते चित्र डोळ्यासमोर येणार तर सर्वांच्याच मनामनात आणि डोळ्यात साठवलेले प्रतीक म्हणजे थर्मलच्या धूर निघणाऱ्या तीन चिमण्या. आज या तीन चिमण्यांपैकी एक चिमणी आपल्यातून भूर उडून निघून गेली.
     खरंतर ही निर्जीव वस्तू परंतु प्रत्येक परळीकर आला आणि परळीच्या पंचक्रोशीत राहणाऱ्या प्रत्येकाला एक प्रकारची हुरहुर वाटली आणि मन काही काळासाठी का होईना विषन्न झालं प्रत्येकाची भावना आणि प्रतिक्रिया ही शोकयुक्त आणि हळवी होती यातच या निर्जीव चिमणीने प्रत्येकाशी आपले घट्ट नाते गेल्या पन्नास वर्षात कसे निर्माण केले होते याची प्रचिती येते.
   इटालियन तंत्रज्ञानाचा वापर करून हे जुने विद्युत केंद्र बनवण्यात आले होते. त्याचाच सगळ्यात दर्शनीय भाग म्हणजे ही चिमणी होती जी आज इतिहास जमा झाली आहे.कोळशापासून  विद्युत निर्मिती करणारा मराठवाड्यातील एकमेव प्रकल्प असलेल्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तीन नंबरची चिमणी आता जमीनदोस्त करण्यात आली आहे. 
      मागच्या काही दिवसापासूनच परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक तीन चार व पाच हे बंद करण्यात आलेले आहेत. 210 मेगाव्हेट वीज निर्मितीचे हे तीन संच बंद केल्यानंतर या संचासाठी लागणारी सगळी सामग्री सुद्धा  भंगरात काढण्याचं काम सध्या सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व परिचित चिमणी पाडण्यात आली आहे. या चिमणीतून कोळशाचा धूर बाहेर काढला जायचा.
           प्रत्येक शहराची ओळख एक वेगळ्या वास्तूने होत असते तशी परळीची ओळख ही थर्मल पॉवर स्टेशनमुळे नक्कीच वेगळी आहे. हे थर्मल पावर स्टेशन जरी बंदिस्त असले तरी या थर्मल पॉवर स्टेशनमधून निघणारा जो काही धूर आहे तो बाहेर सोडण्यासाठी उंच मनोऱ्यासारख्या उभ्या असलेल्या या चिमण्या लोकांचं लक्ष वेधून घेत होत्या. या चिमण्यांपैकी एक असलेली  जुनी चिमणी आता इतिहास जमा झाली.
      मराठवाड्यातील एकमेव  विद्युत निर्मिती करणारे हे केंद्र आहे. 1971 साली या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राची स्थापना झाली. त्यावेळी धूर वाहण्यासाठी तीन चिमण्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. 1971 पासून या तीन चिमण्या परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतीक बनल्या होत्या.
        मागच्या काही दिवसापासूनच कालावधी संपलेल्या संचातील साधन सामग्री बाजूला करण्याचे काम चालू आहे. यातच ही चिमणी पाडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये संच क्रमांक तीन पूर्णतः अवसायनात काढण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यातील सर्व मशिनरी यंत्रणा व या संचाच्या संबंधित सर्व विभाग हे एक एक करून नाहीसे करण्यात येत आहेत. आज शेवटच्या टप्प्यात संच क्रमांक तीनची धुरवाहक चिमणी जमीनदोस्त करण्यात आली आहे. 210 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक तीन एप्रिल 1979 मध्ये सुरू करण्यात आला होता. 
        2010 मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक 3 चे आयुर्मान संपल्याने महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने हा संच स्क्रॅप मध्ये काढला आहे. आयुर्मान संपल्याने 2015 पासून हा संच बंद ठेवण्यात आला होता त्यानंतर सन 2019 पूर्वी हा संच स्क्रॅप मध्ये काढण्याचा निर्णय घेण्यात आला यापूर्वी महाजनकोने परळी औष्णिक उद्योग केंद्रातील 30 मेगावॅटचे दोन संच स्क्रॅपमध्ये काढलेले आहेत. विद्युत केंद्रातील संच क्रमांक तीन चार पाच हे तीन संच 2019 पासून बंद आहेत. त्यापैकी संच क्रमांक तीनची 120 मिटर उंचीची चिमणी आज सकाळी पाडण्यात आली आहे.  

    परळीत स्थायिक झालेली - इटालियन कुळातील - सर्वांना आपली वाटणारी- "चिमणी" ऐन पन्नाशीत  भुर्रऽऽऽ उडाली. परंतु यातूनही तमाम परळी व परिसरातील नागरिकांची संवेदनशील भावना या चिमनी सोबत असल्याचे क्रिया प्रतिक्रिया करून दिसून आले ही चिमणी यापुढे दिसणार नसली तरी आजपर्यंतच्या पिढ्यांसाठी हा एक मोठा आठवणीचा ठेवा असणार आहे.
    येणाऱ्या नव्या पिढ्यांना ज्या ज्या वेळी परळीचा इतिहास सांगितला जाईल त्यावेळी या ठिकाणी तीन चिमण्या होत्या त्यातून धूर निघायचा अशा प्रकारच्या आठवणी सांगण्याची व थर्मल चा इतिहास नव्या पिढीला वारंवार सांगण्याची संधी मात्र आत्ताच्या पिढीला मिळणार आहे त्यामुळे आपलीशी झालेली चिमणी प्रत्यक्षात दुर ओळखताना दिसणार नसली तरी ती प्रत्येकाच्या मनात नक्कीच साठवलेली राहणार आहे.
-------------------------------------------------

■ संबंधित बातम्या......



● Video ●


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....