इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-परळीत गणेश विसर्जनाच्या 24 मिरवणुका तगडा पोलीस बंदोबस्त

 

परळीत गणेश विसर्जनाच्या 24 मिरवणुका तगडा पोलीस बंदोबस्त



 परळी वैजनाथ ,प्रतिनिधी 

.       गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहेत. परळी शहरात एकूण 24 मिरवणुका निघणार असून या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. त्याचबरोबर मिरवणुकांवर सीसीटीव्ही कॅमेरा च्या माध्यमातूनही लक्ष ठेवले जाणार आहे.

       गेल्या दहा दिवसापासून  अतिशय उत्साहाने  गणेशोत्सव साजरा केला जात आहे. आज अनंत चतुर्दशी दिवशी गणेश विसर्जन होणार आहे. गणेश विसर्जनाच्या शहरात एकूण 24 मिरवणूका असून संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नऊ शहर पोलीस ठाणे हद्दीत 15 अशा मिरवणूक निघणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी व संवेदनशील ठिकाणी पोलीस पॉईंट लावण्यात आले आहे. त्याचबरोबर शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे .संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच अधिकारी वीस कर्मचारी पंचवीस होमगार्ड तर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा अधिकारी 25 कर्मचारी वीस होमगार्ड बंदोबस्तावर तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे बॅरिकेटिंग 48 सीसीटीव्ही कॅमेरे एस आर पी असा तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या