MB NEWS-अफलातून चोरी-आता चोरांचं काय करावं?: शेततळ्यातून पन्नास हजाराचे मासे नेले चोरून

 अफलातून चोरी-आता चोरांचं काय करावं?: शेततळ्यातून पन्नास हजाराचे मासे नेले चोरून

परळी वैजनाथ ,प्रतिनिधी...
        परळीत चोऱ्यांचे सत्र सुरू असतानाच आता चोरीचा अफलातून प्रकार समोर आला आहे. एका जणाच्या शेतातील शेततळ्यामधील 50 हजार रुपये किंमतीचे 500 किलो वजनाचे मासे कोणीतरी अज्ञात चोरट्याने पाण्यातून काढून चोरून नेल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
      परळी शहर व तालुक्यात दैनंदिन चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. घरफोड्या, मोटरसायकल चोऱ्या  मोबाईल चोऱ्या, बाजारातील चोऱ्या, भुरट्या चोऱ्या हे नित्याचे झाले आहे. ग्रामीण भागात धान्याचे पोते, जनावरांच्या चोऱ्या हे सत्रही सुरूच आहे. यातच आता चोरीचा अफलातून प्रकार समोर आला आहे. टोकवाडी शिवारातील शेतामध्ये असलेल्या एका शेततळ्यातून पन्नास हजार रुपये किमतीचे मासे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत .याप्रकरणी फिर्यादी नंदकिशोर रामपालजी लोहिया यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 6 रोजी पहाटेच्या सुमारास फिर्यादीच्या टोकवाडी शिवारातील शेतातील शेततळ्यातून 500 किलो वजनाचे मासे ज्याची किंमत 50 हजार रुपये होते. हे मासे अज्ञात चोरट्याने पाण्यातून काढून चोरून नेले. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो.उपनि. पौळ हे करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !