इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-कै. ल . दे . महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ' एकाग्रता ' कार्यक्रम संपन्न*

 *कै. ल . दे . महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ' एकाग्रता ' कार्यक्रम संपन्न* 



परळी , दि. 8/9/20022 (प्रतिनिधी)  

येथील कै. ल .दे . महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी श्री प्रिताजी व श्री

कृष्णाजी संचलित विश्वशांती ' एकाग्रता' कार्यक्रम घेण्यात आला . त्याअंतर्गत विद्यार्थिनींननी मनशांतीसाठी काय केले पाहिजे. याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन तपस्वी सौ.विद्या वंगे व सौ. सरिता बेदरकर यांनी केले. 

श्री प्रिताजी व श्री कृष्णाजी यांचा संकल्प याविषयी व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे विचार विद्यार्थापर्यंत पोहचवले. या ज्ञानातून विद्यार्थ्याची एकाग्रता,स्मरणशक्ती निर्णय क्षमता वाढीस लागण्यास मदत होते. युवापिढीस योग्यदिशा या कार्यक्रमातून मिळाली. याप्रसंगी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष संजय देशमुख , कोषाध्यक्ष प्रसाद देशमुख , संचालिका डॉ. विद्याताई देशपांडे -देशमुख , प्राचार्य डॉ .एल. एस . मुंडे कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा. डॉ.कचरे संगीता यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.कचरे एस.व्ही.यांनी सूत्रसंचालन सपना भुसे हिने तर आभार प्रकटन रूपाली चक्रे हिने केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या