MB NEWS-बांधकाम मिस्त्री चा मुलगा होणार डॉक्टर:नीट परिक्षेत मुदस्सिर अजीज खान चे घवघवीत यश

 बांधकाम मिस्त्री चा मुलगा होणार डॉक्टर:नीट परिक्षेत मुदस्सिर अजीज खान चे घवघवीत यश

परळी / प्रतिनिधी:- परळी शहरातील हबीबपुरा भागातील रहिवाशी अजिज खान यांच्या मुलाने नीट परिक्षेत उत्तीर्ण होऊ मुलांने कुटुंबातील डॉक्टर बणण्याचे स्वप्नावर यशस्वी वाटचाल केली आहे. 

बुधवारी राञी उशीरा नेशनल टेस्टिंग एजन्सी ने नीट परीक्षा 2022 चा ऑनलाईन निकाल घोषीत केला यामध्ये 720 मधून खान मुदस्सिर अजीज हिने 503 मार्कस घेत यश संपादन केले आहे. त्याच्या कुटुंबाची हलाखिची परिस्थिती आहे तरीही  जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिसऱ्या प्रयत्नात हे यश संपादन करुन एमबीबीएस डॉक्टर बनण्याचे स्वप्न खरे करुन दाखवले. 

वडील खान अजीज हे बांधकाम मिस्त्री असून आपल्या कुटुबाची उपजिविका भागवतात. मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत

मुदसिर खान ह्याला दहावीमध्ये गणित विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण मिळाले होते. मात्र त्यांनी आपल्याला भविष्यात डॉक्टर बनून लोकांची सेवा करायची आहे त्यासाठी नीटची तयारी सुरू केली होती आणि आता त्याला त्यामध्ये यश पण प्राप्त झाला आहे


मुदस्सिर खान यांच्या या यशा मागे आई आणि वडील यांनी घेतलेले कठोर परिश्रम समाजातील उच्चशिक्षि इच्छुकांना  प्रेरणादायी आहे.मुदस्सिरच्या या यशाला बघून मुदस्सिर व त्यांचे वडील अजिज खान यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !