इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-गणेशपार दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण फुले तर कार्याध्यक्षपदी शिवाजी देशमुख

 गणेशपार दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण फुले तर कार्याध्यक्षपदी शिवाजी देशमुख 


परळी (प्रतिनीधी)
 परळी शहरातील गणेशपार दुर्गोत्सव मंडळाची कार्यकारीणी मुख्य मार्गदर्शक वैजनाथ बागवाले यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात येवुन अध्यक्षपदी बाळकृष्ण फुले तर  कार्याध्यक्षपदी शिवाजी देशमुख यांची निवड करण्यात आली.
   परळी शहरातील जुना भाग असलेल्या गणेशपार भागात हिंदु सण सार्वजनिकरित्या साजरे करण्यासाठी या भागातील भक्तांनी पुढाकार घेत सन 1987 साली गणेशपार दुर्गोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरु केली कोरोना काळ वगळता मागील 35 वर्षात अखंडपणे दुर्गोत्सव साजरा केला जातो.गणेशपार भागातील सर्व भक्त यात सहभागी होतात.यावर्षीची कार्यकारीणी निवडण्यासाठी गणेशपार मंदिरात व्यापक बैठक पार पडली.या बैठकीत निवडण्यात आलेल्या उर्वरीत कार्यकारीणीत
सचिवपदी: श्रीकांत पाथरकर तसेच सहसचिव: दिनेश लोंढे उपाध्यक्ष: सचिन स्वामी उपाध्यक्ष:चारुदत्त करमाळकर उपाध्यक्ष: संजय गावडे उपाध्यक्ष: शर्वकुमार चौधरीकोषाध्यक्ष: विष्णुदास भंडारी,सह कोषाध्यक्ष: श्रीकांत वाघमारेमुख्य संघटक:बालासाहेब देशमुख, गणेश सावंत प्रसिद्धीप्रमुख: धनंजयजी आढाव, अनंत (पप्पू) कुलकर्णी, प्रकाश वर्मा
मिरवणूक प्रमुख: गोपाळ जोशी, सत्यनारायण मानधाने, नारायण डाके,गोपाळ मोदाणी.
मुख्य सल्लागार: डॉ सुरेशजी चौधरी, जगदीशआप्पा चौधरी,संतोषसेट नावंदर ,विलास जूनाळ, रमाकांत कोलवार,नंदकुमार रामदासी,विजय जोशी, वीरकुमार स्वामी, चंदूशेठ जाजू, विनोदशेठ कोलवार, दिगंबर जोशी, वासुदेव पाठक, उत्तम दादा लोखंडे, रमेश लोखंडे ,हनुमान भंडारी, सुंदर सुरवसे.
सदस्य:दिनेश बेलुरे,रमेश पवार,रवी गव्हाणे, सूनील कौलवर, गणेश कोडी, लहू हालगे, मयूर हालगे, गजानन डहाळे,राजेश लोणीकर, हरिभाऊ लोखंडे,तुकाराम धुमाळ, प्रमोद दहातोंडे, जगदीश वैद्य, राहुल लोणीकर, बंटी फुले,गोविंद भाले,शशिकांत वाघमारे,ईश्वर होलंबे,कपिल उपाध्याय,अशोक शहाणे,निलेश लोढा,अभिषेक हालगे,ज्ञानेश्वर पवार,योगेश पडळकर,अभिषेक जठार,वैजनाथ गव्हाणे आदींची निवड करण्यात आली.या बैठकीत दुर्गोत्सव स्थापना मिरवणुक पारंपारीक पध्दतीने काढण्याचा व विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!