इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-शेततळ्यातून माशांच्या अफलातून चोरी प्रकरणी ग्रामीण पोलीसांचा तपास : चोरी नाही तर मासे झाले मृत !

 शेततळ्यातून माशांच्या अफलातून चोरी प्रकरणी ग्रामीण पोलीसांचा तपास : चोरी नाही तर मासे झाले मृत !



परळी वैजनाथ ,प्रतिनिधी...

         शेततळ्यातून पाण्यातून काढून मासे चोरीला गेल्याची अफलातून चोरीच्या घटनेची नोंद परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिनांक सहा रोजी झाली होती. ही फिर्याद दाखल झाल्यानंतर परळी ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा वेगवान तपास केला. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता या ठिकाणी चोरी नाही तर हे मासे मृत झाले असल्याचे ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

        परळीत चोऱ्यांचे सत्र सुरू असतानाच चोरीचा अफलातून प्रकार समोर आला. एका जणाच्या शेतातील शेततळ्यामधील 50 हजार रुपये किंमतीचे 500 किलो वजनाचे मासे कोणीतरी अज्ञात चोरट्याने पाण्यातून काढून चोरून नेल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. टोकवाडी शिवारातील शेतामध्ये असलेल्या एका शेततळ्यातून पन्नास हजार रुपये किमतीचे मासे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले म्हणून  परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणात फिर्यादत्त झाल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी घटनेचा अधिक तपास केला असून खरोखरच माशांची चोरी झाली का याची घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यात आली यावेळी माशांची चोरी झाली नसल्याचे स्पष्ट झाले असून मासे शेततळ्याच्या कडेला मृत अवस्थेत आढळून आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे दरम्यान मासे चोरी केल्याची फिर्याद नोंदवून घेण्याचा आग्रह फिर्यादीने केल्याने याप्रकरणी फिर्याद दाखल करून घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण प्रभारी पो.नि. मारुती मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या