MB NEWS-कोरोना काळातील कार्य: थर्मलचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचा राज्यपालांनी केला सन्मान

 कोरोना काळातील कार्य: थर्मलचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचा राज्यपालांनी केला सन्मान


परळी वैजनाथ:औष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते मुंबई येथील राजभवन येथे सन्मान करण्यात आला. कोरोना काळात औष्णिक विद्युत केंद्रात ऑक्सिजन प्लांट अतिशय तातडीने उभारण्यात मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचा सिंहाचा वाटा होता. ऑक्सिजन प्लांटमुळे हजारो नागरिकांचे कोरोना काळात प्राण वाचले होते. आव्हाड यांनी केलेल्या सेवेबद्दल त्यांचा मुंबईतील राजभवन येथे कोरोना वारियर्स हा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी सन्मान केला.

कोरोना काळात संपूर्ण राज्यासह बीड जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता. याच काळात औ.वि केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी परळी औष्णिक विद्युत केंद्रात ऑक्सीजन प्लांट तातडीने कार्यान्वित करून कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात प्लांट च्या माध्यमातून उपलब्ध करून दिला होता. याची दखल घेत राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते मुंबई येथील राजभवन येथे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते कोरोना वॉरियर्स म्हणून सन्मान करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार