MB NEWS-चोरट्यांचा धुमाकूळ: एकाच रात्री फोडली पाच दुकाने

चोरट्यांचा धुमाकूळ: एकाच रात्री फोडली पाच दुकाने



गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे दि.८ रोजी चोरट्यांनी धुमाकूळ घालत  बसस्थानक परिसरातील ज्ञानराज व देवा हे दोन मेडिकल वर चोरट्याने हात साफ केला तर  येथून जवळच असलेल्या  हायवे वरील फुलझळके मेडिकल आणि बोरगाव रस्त्यावर असलेले बाबुराव गाडे यांचे माऊली ॲग्रो एजन्सी तर शुभम ज्वेलर्स या पाच दुकानांचे शटर उचकटून फोडण्यात आले. या सर्व ठिकाणावरून चोरट्यांनी रोख रक्कम तर शुभम ज्वेलर्स मधून चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले  चोरटीने एका दिवशी पाच दुकानावर हात साफ केल्यावर नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस स्टेशनचे  डीबी पथकाचे प्रमुख प्रफुल्ल साबळे यांनी या ठिकाणी भेट दिली असून पुढील तपास करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !