इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-परळीत साडेचार लाखांचा गुटखा पकडला

 परळीत साडेचार लाखांचा वाहनासह गुटखा पकडला

परळी (प्रतिनीधी)

 परळी शहरातील विद्यानगर भागात विक्रीसाठी आणलेला गुटख्याने भरलेला छोटा हत्ती टेंम्पो अप्पर पोलिस अधिक्षक कविता नेरकर यांच्या पथकाने पकडुन 4 लाख 59 हजार 803 रुपयांचा गुटखा वाहनासह जप्त केला असुन याप्रकरणी दोघाविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 परळी शहरातील विद्यानगर भागात एका वाहनातून विक्रीसाठी गुटखा आणण्यात आल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे अप्पर पोलिस अधिक्षक कविता नेरकर यांना मिळताच सोमवार दि.12 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता अनिल दौंड,उपनिरीक्षक सिंगाडे मॅडम,चॉंद मेंडके, पोना.देवकते, पोशि. राऊत, खंदारे व इतर दोन खाजगी व्यक्तींनी छापा टाकला असता महिंद्रा जितो टेम्पो मध्ये राजनिवास पान मसाला,बाबा पानमसाला,रत्ना सुगंधीत तंबाखू ,विमल पानमसाला, आर.एम. डी. गुटखा, बाबा तंबाखू असा 59803 रुपयांचा गुटखा व गुटखा विक्रीसाठी आणलेले वाहन असा एकुण 4 लाख 59 हजार 803 रुपयांचा गुटखा जप्त करत दोघाविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात कलम 328,272,273 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या