MB NEWS-शंभूराजे गणेशोत्सव मंडळाचे विविध उपक्रम; रक्तदान शिबीरात अनेकांचा सहभाग

 रामानंद उगलेंच्या शाहिरीने श्रोते मंत्रमुग्ध!

शंभूराजे गणेशोत्सव मंडळाचे विविध उपक्रम; रक्तदान शिबीरात अनेकांचा सहभाग

परळी (प्रतिनिधी)

गणेशोत्सव 2022 निमित्त तालुक्यातील मौजे पिंपरी बु. येथे शंभूराजे गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. बुधवारी दुपारच्या सत्रात रक्तदान शिबीर आयोजित केले होते, यात अनेकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवाला. तर सायंकाळच्या सत्रात शाहीर रामानंद उगले यांच्या जल्लोषपूर्ण शाहिरीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.


भाजपा किसान सभेचे राज्य सदस्य उत्तम दादा माने व भाजपा तालुका सरचिटणीस सुरेश माने, रमेश पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली शंभूराजे गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळाकडून विविध लोकोपयोगी व सांस्कृतिक कार्यक्रम गावात राबविण्यात येत आहेत. बुधवारी रक्तदान शिबिरासह शाहीर रामानंद उगले यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उदघाटन प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, उत्तम दादा माने, भाजपा तालुका सरचिटणीस सुरेश माने, सरपंच माऊली साबळे, चंद्रकांत देवकते, पत्रकार दत्तात्रय काळे, महादेव शिंदे, जनहित बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अनिल माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.


शाहिरी, गोंधळ, भारूड, गवळण, वग हे लोकगीताचे प्रकार प्रबोधनकारी असून आजच्या पिढीला महाराष्ट्राची लोकसंस्कृती जपवणारे हे कार्यक्रम कळावेत आणि त्यांच्यात ते रुजावेत यासाठी शंभूराजे गणेश मंडळाने आयोजित केलेला कार्यक्रम कौतुकास्पद असल्याचे मत शाहीर रामानंद उगले यांनी व्यक्त केले. देशाच्या लोकसंस्कृतीला टिकवणारा एकमेव महाराष्ट्र असून, लोकचळवळी, लोकसंस्कृतीची या राज्याने जोपसणूक केली आहे. छत्रपती शिवरायआणि संभाजी महाराजांची प्रेरणा या राज्याला सतत दिपस्तंभप्रमाणे मार्गदर्शक ठरणारी असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे स्वागत शंभूराजे गणेश मंडळाचे अध्यक्ष दादा पठाण, ग्रामपंचायत सदस्य दादकिसन औटे, रवी माने, धीरज माने, रणजित पालकर, सुशांत पौळ, कुंडलिक चोपडे यांच्यासह मंडळाच्या सदस्यांनी केले. मोठ्या संख्येने ग्रामस्थ कार्यक्रमाला उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार