MB NEWS-आफ्रिकेत व दक्षिण भारतात आढळणारा अतिशय दुर्मिळ शॅमेलिऑन लिजर्ड सरडा आढळतोय परळीच्या मेरुगिरी डोंगररांगात !

 आफ्रिकेत व दक्षिण भारतात आढळणारा अतिशय दुर्मिळ शॅमेलिऑन लिजर्ड सरडा आढळतोय परळीच्या मेरुगिरी डोंगररांगात  !

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

 परळीच्या मेरुगिरी डोंगररांगात शॅमेलिऑन लिजर्ड अर्थात अतिशय दुर्मिळ समजला जाणारा सरडा आढळून येत आहेत.यापुर्वी अशा प्रकारचे सरडे पाहण्यात आले नव्हते.त्यामुळे शेतकरी, नागरिकांत या सरड्याबद्दल कुतुहल निर्माण झाले आहे. शॅमेलिऑन लिजर्ड आढळून आल्यानंतर याबाबत वन विभागाला कळविले तसेच प्राणीशास्त्र अभ्यासकांना याविषयी विचारले असता हा दुर्मिळ समजला जाणारा सरडा शॅमेलिऑन लिजर्ड असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

     शॅमेलिऑन लिजर्ड हा दुर्मिळ जातीचा सारडा अत्यंत दुर्मिळ समाजाला जातो. आफ्रिकेत आढळणारा हा सरडा आपल्याकडे क्वचित दिसून येतो. दक्षिण भारतात  या जातीचा सरडा आढळून येतो असे प्राणी अभ्यासक सांंगतात.साधारण सहा इंच लाब असलेला हा सारडा प्रामुख्याने झाडावर आढळून येतो.हिरव्या रंगाचा असलेला हा सरडा, रंग बदलणारा सरडा म्हणून ओळखला जातो. ज्या झाडावर हा सारडा असतो त्या झाडाच्या पानाच्या रंगाप्रमाणे तो आपल्या रंगाची छटा बदलतो. ह्या सरड्याच्या गळ्यावर आणि पोटावर पांढर्‍या काटयांची ओळ दिसून येते. 

     परळीच्या मेरुगिरी डोंगररांगात अशा प्रकारची सरड्याची प्रजाती आढळून येत आहे. परळीजवळील मलकापूर-मांडवा - मालेवाडी या  डोंगररांगातील रस्त्यावर अशा प्रकारच्या शॅमेलिऑन लिजर्ड या दुर्मिळ जातीचे सरडे आढळून आले आहेत.या प्रजातीचा सरडा पहिल्यांदाच या भागात दिसल्याची नोंद मिळाली असल्याने त्याबाबतचा अभ्यास महत्त्वाचा आहे. त्याच्या संशोधनासह संवर्धनासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न करणे आवश्यक आहे.

@@

     परळीच्या जवळ डोंगर रांगांमध्ये नागरिकांना आढळलेला सरडा हा अत्यंत दुर्मिळ अशा प्रकारच्या शामी लियोन रिजल्ट प्रजातीत असून क्षणार्धात रंग बदलणारा सरडा म्हणून याची ओळख आहे हा अत्यंत दुर्मिळ समजला जातो मेरुगिरी डोंगर रांगांमध्ये बऱ्याच प्रमाणात सरड्याची ही प्रजाती आढळून येते याबाबत प्राणशास्त्र विभागाकडून वेळोवेळी निरीक्षणे नोंदविण्यात आलेली असून या प्रजातीच्या संरक्षण व संवर्धनासाठी तसेच संशोधनात्मक काम आमच्या प्राणिशास्त्र विभागाकडून सुरू आहे.

  -प्रा.डाॅ.जगदीश जगतकर,

    प्राणीशास्त्र विभाग

 वैद्यनाथ महाविद्यालय,

   परळी वैजनाथ.

@@

      अंबाजोगाई वनपरिक्षेत्रात विविध जैवविविधता आढळून येते विविध प्रकारचे प्राणी पक्षी यांच्या प्रजाती आढळून येतात शामिलिओन रिझल्ट हा दुर्मिळ समजला जाणारा सरडा असून परळीच्या परिसरातील डोंगर रांगांमध्ये हा सरडा आढळल्याचे नागरिकांनी सांगितल्यानंतर वनविभागाच्या वतीने पाहणी करण्यात येत आहे तसेच या प्रजातीच्या संवर्धनासाठी आवश्यक ते उपाय पक्षी व प्राणी मित्रांच्या सल्ल्यानुसार करण्यात येत आहेत

 -जी.बी.कस्तुरे, 

वनपाल,वनपरिक्षेत्र अंबाजोगाई 


    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !