MB NEWS-महाराणा प्रताप गणेश मंडळाच्या श्रीं ची 56 सुवासिनींच्या हस्ते "56 भोग महाआरती"

 महाराणा प्रताप गणेश मंडळाच्या श्रीं ची 56 सुवासिनींच्या हस्ते "56 भोग महाआरती" 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)...

   परळी शहरातील गणेशपार विभागातील देशमुख गल्ली या ठिकाणी सुप्रसिद्ध असणाऱ्या श्री महाराणा प्रताप गणेश मंडळाच्या बाप्पाची "56 भोग महाआरती" या भागातील 56 सौभाग्यवतींच्या हस्ते मोठ्या उत्साहात तथा हर्षोल्हासात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.

     गणेशपार विभागातील देशमुख गल्ली या ठिकाणच्या सुप्रसिद्ध असणाऱ्या व नेहमीच विधायक उपक्रम राबवणाऱ्या महाराणा प्रताप गणेश मंडळ च्या वतीने प्रतिवर्षी बाप्पांच्या आगमनानंतर आगामी दहा दिवस वेगवेगले तथा नाविन्यपूर्ण उपक्रम अतिशय भक्तिमय वातावरणात राबवण्यात येतात. अतिशय हर्षोल्हासात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवामुळे तसेच मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या उपक्रमामुळे या भागात भक्तिमय तथा आनंददायी वातावरण निर्मिती होते. दिनांक 6 सप्टेंबर रोजी महाराणा प्रताप गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य मार्गदर्शक आबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बाप्पांच्या वैशिष्ट्यपूर्ण पूजेचे आयोजन केले होते. यावेळी 56 प्रकारचे वेगवेगळे नैवेद्य बनवून श्री गणरायास या भागातील 56 सुवासिनींच्या हस्ते 56 भोग अर्पण करत महाआरती करण्यात आली. सर्वप्रथम आजच्या दैनंदिन आरतीचे यजमान प्रसिद्ध विधीज्ञ एड. जीवन देशमुख यांच्या हस्ते दैनंदिन आरती संपन्न झाली. तदनंतर 56 सुवासिनींच्या हस्ते बाप्पांची विधीवत पूजा करून महाआरती करत श्रींच्या चरणी 56 प्रकारचे नैवेद्य अर्पण करण्यात आले.


        मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झालेल्या या महाआरतीसाठी महाराणा प्रताप गणेश मंडळाचे मार्गदर्शक आबासाहेब देशमुख, नारायण देशमुख, गणेश देशमुख, बाळू देशमुख , प्रशांत देशमुख, विजय देशमुख, लखन पारेकर, ओम देशमुख, शंकर लोखंडे, सागर बुंदेले, ऋषी देशमुख, प्रणव जठार आदि सदस्यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी भागातील प्रतिष्ठित नागरिक तसेच मान्यवरांसह शेकडो गणेशभक्त, महिलावर्ग तथा बालगोपाळांची मोठी उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार