MB NEWS-आईने धुनी भांडी करून शिकवले: मुलाने केले चीज परळी तालुक्यातील सेलूचा विनायक भोसले याने नीट मध्ये मिळवले 595 गुण

 आईने धुनी भांडी करून शिकवले: मुलाने केले चीज परळी तालुक्यातील सेलूचा विनायक भोसले याने नीट मध्ये मिळवले 595 गुण



अंबाजोगाई, प्रतिनिधी...आई लोकांची धुणीभांडी करते, कसल्याही भौतिक सुविधा नाहीत, ना शिकवणी, ना कसला आधार तरीही मुलाने हार मानली नाही. यूट्यूबवरील अभ्यासक्रमांचे व्हिडीओ पाहून सेल्फस्टडी करत विनायक अर्जुन भोसले याने नीट परीक्षेत ५९५ गुण प्राप्त केले आहेत. अंगी जिद्द व चिकाटी असेल तर आर्थिक स्थिती अडसर ठरत नाही याचा प्रत्यय विनायकने समाजासमोर ठेवला आहे. 



विनायक अर्जुन भोसले रा.सेलू ता. परळी. याच्या वडिलांचे सन-२०१४ मध्ये अपघाती निधन झाले. पतीच्या निधनानंतर खचून न जाता विनायकाची आई सुनीता यांनी लोकांच्या घरची धुनी-भांडी करून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले.त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. मुलांच्या शिक्षणासाठी सुनीताबाई यांनी अंबाजोगाई गाठले. आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने त्यांनी अंबाजोगाईत धुणे-भांडी करण्याचे काम सुरू केले. व एकाच छोट्याशा भाड्याच्या खोलीत हे चारजनांचे कुटुंब राहते.याच ठिकाणी सर्वजण एकत्रित अभ्यास करतात.आईचे कष्ट व आर्थिक परिस्थिती याची जाणीव ठेवून विनायकने डॉक्टर होण्याची जिद्द मनात बाळगली.नीट च्या शिकवणीची फिस भरू शकत नसल्याने त्याने यूट्यूब वर अभ्यासक्रमाचे व्हिडीओ पाहून मेहनतीने अभ्यास केला.व नीट च्या परीक्षेत ५९५ गुण प्राप्त केले.


अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत विनायकने जिद्दीने यश संपादन केले. त्याच्या पुढील शिक्षणासाठी आधार माणुसकीचाचे अध्यक्ष अँड.संतोष पवार, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे स्थानिक कार्यवाह बिपीन क्षीरसागर, भारतीय जैन संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष धनराज सोळंकी, सेवानिवृत्त अभियंता परमेश्वर भिसे, सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी रविंद लोमटे यांनी धुरा हाती घेतली आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !