पोस्ट्स

MB NEWS:शिवराज कातकडे यांची एमपीएससीतून सहायक कक्ष अधिकारीपदी निवड

इमेज
  शिवराज कातकडे यांची एमपीएससीतून सहायक कक्ष अधिकारीपदी निवड परळी वैजनाथ (प्रतिनिधी), :- दि.२४ :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून  घेण्यात आलेल्या सहायक कक्ष अधिकारी विभागीय परीक्षेतून कातकडे शिवराज विश्वांभर यांची सहायक कक्ष अधिकारी (वर्ग - 2 ) या पदावर निवड झाली. कातकडे शिवराज विश्वांभर यांची निवड झाल्याबद्दल सर्वसाधारण अभिनंदन होत आहे.          महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२२ मधील उमेदवारांची  निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या सहायक कक्ष अधिकारी  या विभागीय परीक्षेतून सहायक कक्ष अधिकारी (वर्ग - 2 ) या पदावर कातकडे शिवराज विश्वांभर यांची निवड झाली आहे.  कातकडे शिवराज विश्वांभर  , रा.कातकरवाडी, कातकरवाडी ,या छोट्याशा गावात त्यांचे प्राथमिक शिक्षण व बडवणी येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले..परभणी येथे DTed चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली. जिद्द आणि चिकाटीने वाटचाल केली की आकाशालाही गवसणी घालता येते. तसेच आपल्या

MB NEWS:एकाच घरातले ‘ते’ 7 मृतदेह, गूढ उकललं!! भयंकर हत्याकांड, आरोपींची कबुली..

इमेज
  एकाच घरातले ‘ते’ 7 मृतदेह, गूढ उकललं!! भयंकर हत्याकांड, आरोपींची कबुली.. पुणे :  भीमा नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह  आढळल्याने पुण्यात खळबळ माजली आहे. या भयंकर घटनेमागचं नेमकं कारण समोर आलं आहे. कुटुंबियांनी ही आत्महत्या केली असावी असा अंदाज आधी वर्तवण्यात आला होता. मात्र सखोल तपासाअंती  पोलिसांनी या प्रकरणाचं गूढ उकललं आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं उघड झालं आहे. कुटुंबियांच्या नातेवाईकांनीही हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता.  विशेष म्हणजे या प्रकरणी आरोपींनी या घटनेची कबुलीही दिली आहे. आरोपींच्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हे हत्याकांड घडवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच पोलीस अधिकारी यासंदर्भात  पत्रकार परिषद घेणार आहेत. घटनेचं गूढ उकललं… दौंड तालुक्यातील पारगाव येथील भीमा नदी पात्रात एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या नसून हत्या झाल्याचं कारण उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून त्यांनी या भयंकर कृत्याची कबुलीही दिली आहे. आरोपीच्या एका भावाचा काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. हा अपघात सदर कुटुंबियां

पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या आवाहनास प्रचंड प्रतिसाद

इमेज
  पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या आवाहनास प्रचंड प्रतिसाद 'परिक्षा पे चर्चा' उपक्रमातंर्गत परळीत चित्रकला स्पर्धा ; हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या टीमने केली स्पर्धा यशस्वी* परळी वैजनाथ ।दिनांक २५। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 'परिक्षा पे चर्चा ' या उपक्रमांतर्गत शहरात आज पार पडलेल्या चित्रकला स्पर्धेत विविध शाळा, महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी प्रगतीपथावरील भारत आपल्या उत्तमोत्तम चित्रातून रेखाटला.   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात सर्वत्र शाळा व महाविद्यालय स्तरावर  'परिक्षा पे चर्चा' हा उपक्रम घेण्यात येत आहे. पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या आवाहनानुसार आज शहर व मतदारसंघात देखील हा उपक्रम राबविण्यात आला, त्याअंतर्गत शहरातील विविध दहाहून अधिक शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. आझादी का अमृतमहोत्सव, सर्जि

MB NEWS:धक्कादायक : एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह तलावात सापडले

इमेज
  धक्कादायक : एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह तलावात सापडले गेवराई तालुक्यातील एकाच कुटुंबातील 7 मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. बदलत्या काळात आतंरधर्मीय, आंतरजातीय लग्न मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहेत. मात्र, अद्याप जुन्या रितीरिवाजांना पाळून असलेल्या एका कुटंबातील मुलाने लग्नाकरिता एका महिलेस पळवून नेल्याच्या रागातून मुलाच्या पित्यासह कुटुंबाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांना सर्व मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आले आहे. यात तीन लहान मुलांचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार… दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदी पात्रात सोमवारी एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सापडले होते. आज मंगळवारी, 24 जानेवारी रोजी दुपारी 1 नंतर या नदीपात्रात पुन्हा तीन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले. या सर्व मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. मोहन उत्तम पवार (अंदाजे वय 50 वर्षे) संगीता मोहन पवार (अंदाजे वय 45 वर्षे, दोघे रा. खामगाव, ता.गेवराई) त्यांचे जावई श्यामराव पंडित फुलवरे (अंदाजे वय 32 वर्षे) त्यांची पत्नी राणी श्यामराव

MB NEWS:राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासासाठी चे प्रभावी माध्यम : डॉ रमेश गटकळ*

इमेज
  राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासासाठी चे प्रभावी माध्यम : डॉ रमेश गटकळ सिरसाळा (प्रतिनिधि):- मौजे जयगाव या ठिकाणी १७ जानेवारी पासून सुरू असलेले *विशेष युवक युवती शिबिराची* २३ जानेवारी रोजी समारोप झाला. समारोप समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच पी कदम उपस्थित होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध वक्ते डॉ. रमेश गटकळ (श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव), तसेच श्री  डॉ. अमोल गंगणे (वसुंधरा महाविद्यालय घाटनांदुर) यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.  विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपले ध्येय निश्चित करून त्या दृष्टीने कठोर मेहनत करणे गरजेचे आहे. हेच यशस्वी होण्याचे सूत्र आहे आसे प्रतिपादन डॉ. अमोल गंगणे यांनी व्यक्त केले.   माणसाने आपल्या आनंदी जीवन जगण्याची दिशा स्पष्ट केली पाहिजे जी इतरांना देखील आनंद देणारी असावी. हे सांगताना डॉ. रमेश गटकळ यांनी "बहु केली वणवण । पायपिटी जाला सिण॥  खांदीं भार पोटीं भुक । काय खेळायाचें सुख ॥" तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण करून दिली. त्यांनी आपले

MB NEWS:ग्लोबल आडगाव चित्रपटाची पुन्हा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड

इमेज
  ग्लोबल आडगाव चित्रपटाची पुन्हा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड  सिलव्हर ओक फिल्म्स एंटरटेनमेंट प्रस्तुत प्रख्यात  सिने लेखक-दिग्दर्शक अनिलकुमार साळवे लिखित-दिग्दर्शित  मनोज कदम निर्मित व अमृत मराठे सहनिर्मित,  बहुचर्चित ग्लोबल आडगाव चित्रपटाची निवड पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली आहे.दि.२ते ९ फेब्रुवारी २०२३ दरम्यान पुणे येथे हा चित्रपट महोत्सव रंगणार आहे. 'ग्लोबल आडगाव' हा बहुआयामी लेखक आणि पुरस्कार विजेते व्यक्तिमत्व डॉ.अनिलकुमार साळवे दिग्दर्शित एक बिग-बजेट चित्रपट आहे. अभिनेता प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी सहदिग्दर्शन केले आहे.   'ग्लोबल आडगाव' हा चित्रपट कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला. तसेच अधिकृतपणे न्यू जर्सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अमेरिका साठी निवडला आहे.या चित्रपटास देश-विदेशातील नामवंत प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.नुकत्याच संपन्न झालेल्या अजंता_एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अशोक कानगुडे याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा ज

MB NEWS:परळी नंतर आता केज मध्ये ही करुणा शर्मांवर गुन्हा दाखल

इमेज
  परळी नंतर आता केज मध्ये ही करुणा शर्मांवर गुन्हा दाखल केज :- केज पोलीस ठाण्यात करुणा शर्मा व अन्य एक जणां विरुद्ध अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवार दि. २३ जानेवारी रोजी रात्री ९:०० वा सुमारास बालाजी तांदळे हे त्यांच्या मोबाईलमध्ये फेस बुकवर करूणा शर्मा यांचा व्हीडीओ पाहात असताना आमदार धनंजय मुंडे यांचेवर व्हिडीओ मध्ये केलेल्या आरोपा संदर्भात त्यांनी फोन केला असता करुणा शर्मा यांनी बालाजी तांदळे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच मोबाईल वरून अजय देडे यानेही बालाजी तांदळे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. संबंधित बातमी: ● *जीवे मारण्याची धमकी दिली: करुणा शर्मा विरोधात परळीत गुन्हा* या प्रकरणी बालाजी तांदळे यांच्या तक्रारी वरून करुणा शर्मा  आणि अजयकुमार देडे दोघे रा. मुंबई यांचे विरुध्द दि. २३ जानेवारी रोजी रात्री ११:०० वा च्या दरम्यान केज पोलीस ठाण्यात दखलपात्र स्वरूपाचा गु. र. न. ५६/२०२३ भा. दं. वि. ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

MB NEWS: कल्याण आयुक्त रविराज इळवे यांचे भजन स्पर्धेला उपस्थित राहण्याचे आवाहन

इमेज
  कामगार कल्याण मंडळातर्फे राज्यस्तरीय कामगार पुरुष व महिला भजन स्पर्धेचे आयोजन  कल्याण आयुक्त रविराज इळवे यांचे भजन स्पर्धेला उपस्थित राहण्याचे आवाहन  परळी (प्रतिनिधी):  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने २७ वी  राज्यस्तरीय कामगार पुरुष आणी १७ वी  महिला भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त  दरवर्षी  भजन स्पर्धेचे आयोजन केले जाते.  या वर्षीच्या भजन स्पर्धा आयोजनाचा बहुमान मराठवाडा विभागाला मिळाला आहे.  या स्पर्धा औरंगाबाद येथील तापडिया नाट्यमंदिर येथे २९ व ३० जानेवारी रोजी होणार असून राज्यभरातून ३८ भजनी संघ  स्पर्धेत सहभागी होणार आहे.  स्पर्धेचे उद्घाटन रविवारी स. १० वाजता लोकमत मिडीया प्रा. लि.चे मानव संसाधन विभागाचे उपाध्यक्ष बालाजी मुळे, कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत, दै. सकाळचे निवासी संपादक दयानंद माने यांच्या  उपस्थितीत होणार आहे. तर सोमवारी सायं. ७ वाजता या स्पर्धेचे पारितोषिक वितरण मराठवाडा विकास मंडळाचे अपर आयुक्त विजयकुमार फड, दै. लोकमतचे संपादक चक्रधर दळवी यांच्या शुभहस्ते होणार आहे.  यावेळी कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त र

MB NEWS:जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी करुणा शर्मा विरोधात परळीत गुन्हा

इमेज
  जीवे मारण्याची धमकी दिली:  करुणा शर्मा विरोधात परळीत गुन्हा  परळी (प्रतिनिधी)  करुणा शर्मा यांनी काही दिवसापुर्वी केलेल्या फेसबुक पोष्टवर कमेंट का केली म्हणुन परळीतील एकास शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात करुणा शर्मा व अन्य एका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  परळी शहरातील पंचवटीनगर येथील रहिवासी बालाजी ज्ञानोबा दहिफळे यांनी करुणा शर्मा यांनी काही दिवसापुर्वी फेसबुकवर केलेल्या पोष्टवर कमेंट केली होती.दि.22 जानेवारी रोजी रात्री 9.40 वाजता करुणा शर्मा यांनी दहिफळे यांना फोन करत तु माझ्या फेसबुक पोष्टवर कमेंट का केली म्हणुन शिविगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली तसेच करुणा शर्मा यांच्या फोनवरुन अजयकुमार देडे यांनीही शिवीगाळ केली.याप्रकरणी दहिफळे यांच्या फिर्यादीवरुन परळी शहर पोलिस ठाण्यात कलम 507,34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ट

MB NEWS:प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतमातेच्या प्रतिमेचे पुजन आणि देशभक्तीगीत कार्यक्रमाचे आयोजन - संजय सेवलकर

इमेज
  प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतमातेच्या प्रतिमेचे पुजन आणि देशभक्तीगीत कार्यक्रमाचे आयोजन - संजय सेवलकर परळी, (प्रतिनिधी) :- मागील अनेक वर्षांची परंपरा कायम राखत परळीत यंदाही  विक्रम चहाकडून प्रजासत्ताक दिन राणी लक्ष्मीबाई चौकात दि २६ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता भारतमातेच्या प्रतिमेचे पुजन करून, देशभक्तीपर गीत संगीत वाजवून साजरा करण्यात येणार आहेत.            दरवर्षी प्रजासत्ताक दिन राणी लक्ष्मीबाई चौकात जिलेबी वाटून साजरा केला जातो तरी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी सर्व परळीकरांनी यावे असे आवाहन विक्रम चहाचे वितरक संजय सेवलकर यांनी केले आहे.

MB NEWS:गोवा येथे आंतरराष्ट्रीय राष्ट्र गौरव पुरस्कार 2023 ने संपादक बालासाहेब फड सन्मानित

इमेज
  गोवा येथे आंतरराष्ट्रीय राष्ट्र गौरव पुरस्कार 2023 ने संपादक बालासाहेब फड सन्मानित परळी, (प्रतिनिधी):- इंटरनॅशनल ह्यूमन राईट आणि क्राईम कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमानाने अद्भुत भारत, संपन्न भारत, आत्मनिर्भर भारत आंतरराष्ट्रीय राष्ट्र गौरव अवार्ड  2023 ने दैनिक सोमेश्वर साथीचे मुख्य संपादक बालासाहेब फड यांना गोवा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले आहे. संपादक बालासाहेब फड यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी गोवा येथे  इंटरनॅशनल हॉटेल पार्क रेगिस्ट येथे इंटरनॅशनल ह्यूमन राईट क्राईम कौन्सिलचे मुख्य डॉ व्ही.पी सिंग व आकांक्षा विद्यार्थी, डॉ हरीश मखीजा यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत एका भव्य कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय राष्ट्र गौरव अवॉर्ड ने बालासाहेब फड यांना सन्मानित करण्यात आले. त्यांना या मिळालेल्या पुरस्काराबद्दल  सर्वत्र अभिनंदन होत आहे, तसेच या अगोदरही संपादक बालासाहेब फड यांना नाशिक येथे झालेल्या वंजारी समाज साहित्य संमेलनात मानाचा  ग्रामीण साहित्यिका कै.  सुंदराबाई आंधळे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हो

MB NEWS:२२ जानेवारीला कार्यशाळा झाली तर, १९ फेब्रुवारीला प्रक्षेपण

इमेज
  दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलची  कु.सेजल गायकवाड विद्यार्थिनीला  परभणी  येथे मिळाली 'पिको सॅटॅलाइट' बनवण्याची संधी २२ जानेवारीला कार्यशाळा झाली तर, १९ फेब्रुवारीला प्रक्षेपण  परळी (प्रतिनिधी) 'डॉ. ए पी जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल - फाऊंडेशन हाऊस ऑफ कलाम रामेश्वरम्' आयोजित आणि स्पेस झोन इंडीया, मार्टिन ग्रुप यांच्या संयुक्त  विद्यमाने "डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशन २०२३" साठी बीड, औरंगाबाद , परभणी जिल्ह्यातील विविध शाळामधील  विद्यार्थ्यांना 'पिको उपग्रह (satellite)' बनवण्याची संधी मिळाली आहे. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी तामिळनाडू मधील पट्टीपुरम येथून देशभरातून विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे १५० पिको सॅटॅलाइट पुन्हा वापरता येणाऱ्या किटच्या साह्याने अवकाशात सोडले जाणार  आहेत. यासाठी देशभरातील ५००० विद्यार्थ्यांनी ऑनलाईने प्रशिक्षण घेतले आहे. हे प्रशिक्षण बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल ची विद्यार्थिनी कु सेजल चंद्रकांत गायकवाड ( वर्ग -8 वी) हिने घेतले आहे. या कार्यक्रमाला परभणीचे जिल्हाधिकारी श्रीमती आँचल गोयल ,

MB NEWS:प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देशव्यापी आंदोलन

इमेज
  प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देशव्यापी आंदोलन आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे-किसान सभा परळी / प्रतिनिधी संयुक्त किसान मोर्चाने शेतकरी प्रश्नावर पुन्हा एकदा देशव्यापी शेतकरी आंदोलनाची हाक दिली आहे.या देशव्यापी आंदोलनात बीड जिल्हा किसान सभा सहभागी असून या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात किसान सभेच्यावतीने ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती बीड जिल्हा किसान सभेने दिली आहे. दीडपट हमी भावाचा कायदा, संपूर्ण कर्जमुक्ती, केंद्रीय वीज विधेयकाची वापसी, पेन्शन, पीक विमा या देश पातळीवरील मागण्यांसाठी 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनी हरियाणामध्ये भव्य किसान महापंचायत आयोजित करून या आंदोलनाची सुरुवात होत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रात वरील देशव्यापी प्रश्नांच्या सोबत राज्यातील, पीक विमा, गायरान व देवस्थान जमिनी, व, अपूर्ण कर्जमुक्ती तसेच बीड जिल्ह्यातील खरीप २०२२ मधील अतिवृष्टी अनुदान, २०२२ मधील खरीप विमा वाटपातील ताफवती व अपारदर्शकता.शेतकऱ्यांची बँक खाती होल्ड करणे.पी

MB NEWS: स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त 97 निराधारांना चादरी वाटप परळी (प्रतिनिधी)

इमेज
 स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर विचारातुनच नवसमाजनिर्मीती शक्य- धनंजय गित्ते  स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त 97 निराधारांना चादरी वाटप  परळी (प्रतिनिधी)    हिंदुर्हदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्व व प्रखर विचारांतुनच नवसामानिर्मीती शक्य असुन याच विचारांवर बाळासाहेबांची शिवसेनेची कार्यपध्ती असल्याचे बाळासाहेबांची शिवसेनेचे विधानसभा प्रमुख धनंजय गित्ते यांनी सांगितले.स्व.बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतिने आयोजीत जयंती सप्ताह निमित्ताने वैद्यनाथ मंदिर परिसातील 97 अनाथ,निराधारांना चादरी वाटप कार्यक्रम घेण्यात आला.   स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांची शिवसेनेचे मुख सचिव संजय मोरे,खा.श्रीकांत शिंदे,खा.गजानन कीर्तिकर,मुख्य समन्वयक नरेश मस्के,सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रमुख धनंजय गित्ते यांच्या नेतृत्वाखाली, शहरात जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.आतापर्यंत व्यापार्यांना तिळगुळ वाटप,हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आल्यानंतर सोमवार दि.23 जानेवा

MB NEWS:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी लवकरच करणार 'घरवापसी' !

इमेज
  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी लवकरच करणार 'घरवापसी' ! राज्यपाल यांनी माघारी आपल्या राज्यात परत जाण्याची इच्छा पंतप्रधान मोदींकडे  केली आहे. राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केल्याची राज्यपाल म्हणालेत. काय आहे प्रसिद्धीपत्रकात  महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे, हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,' असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. दरम्य

MB NEWS:बाळासाहेब ठाकरे चौकाचे सुशोभीकरण

इमेज
  शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असलेली समाजसेवा करावी - अभयकुमार ठक्कर स्व.बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्ताने बाळासाहेब ठाकरे चौकाचे सुशोभीकरण, भगव्या ध्वजाचे ध्वजारोहन व नवीन फलकाचे अनावरण *परळी वैजनाथ (प्रतिनिधी)* शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व. मा बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली समाजसेवा करावी अशी समाज सेवा केली तरच खर्‍या अर्थाने शिवसेनाप्रमुखांची जयंती साजरी केली असे होईल असे प्रतिपादन श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा परळीचे माजी नगराध्यक्ष अभयकुमार पप्पू ठक्कर यांनी केले. दरम्यान आज सोमवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकाचे सुशोभीकरण व नवीन फलक व भगव्या ध्वजाचे  अनावरण  अभय कुमार ठक्कर यांच्या हस्ते करण्यात आले. हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सोमवार दि. 23 जानेवारी रोजी परळी वैजनाथ येथे सकाळी 11 वाजता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकात भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण व प्रतिमेचे पूजन अभयकुमार ठक्कर यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.  कार्यक्रमास प्रम

MB NEWS: ◆महाराष्ट्र विद्यालयाची क्षेत्र भेट संपन्न;विदेशी पाहुण्यांना दिली देशाची ओळख

इमेज
 ◆महाराष्ट्र विद्यालयाची क्षेत्र भेट संपन्न;विदेशी पाहुण्यांना दिली देशाची ओळख परळी / प्रतिनिधी महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य विद्यालय, मोहा या शाळेतील उच्च प्राथमिक विभागाची दोन दिवसीय क्षेत्र भेट शैक्षणिक सहल सुरक्षित व उत्साहात संपन्न झाली.या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी विदेशी पाहुण्यांशी मनमोकळेपणाने संवाद करत आपल्या देशाची ओळख करून दिली. विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील असलेल्या महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य विद्यालय मोहा या शाळेतील उच्च प्राथमिक विभागाची क्षेत्र भेट सहली शनिवार दि 21 रोजी रवाना झाली.या क्षेत्र भेट सहलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी इ.स 735 मध्ये 200 वर्षे मेहनत करून निर्माण केलेला जगप्रसिद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेली वेरूळ येथील कैलास लेणी याचा अभ्यास केला.या नंतर मार्गस्थ होत असताना घृष्णेश्वर येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी 12 वे ज्योतिर्लिंग श्री.घृष्णेश्वर, खुलताबाद येथील भद्रा मारोती या ठिकाणी भेट देत दर्शन घेतले तर रविवार दि 22 रोजी 12 व्या शतकातील सर्वाधिक शक्तिशाली उत्कृष्ट वास्तुकलेनचा नमुना असलेल्या देवगिरी अर्थात दौलताबाद किल्ल्यास भेट

MB NEWS:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगम शैक्षणिक सहल

इमेज
  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगम शैक्षणिक सहल  परळी  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगम ता परळी ची शैक्षणिक एक दिवसीय परिसर भेट व शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न झाली. सहली दरम्यान गोपीनाथ गड पांगरी,श्री कंकालेश्वर मंदिर बीड,बीड शहराजवळच साधारण १६२५ ते ३० या काळात बांधली गेलेली भव्य जलवास्तू आहे. शहरापासून दक्षिण दिशेला पाच किलोमीटर अंतरावर खजाना विहिर आहे. या विहिरीचा व्यास सुमारे ५० फूट आहे, तर खोली २३.५ मीटर आहे. जमिनीपासून १७ फुटांवर विहिरीत गोलाकार ओरांडाही असून त्यावर सहज फिरता येते. याही ऐतिहासिक वास्तूला भेट देण्यात आली , श्री क्षेत्र कपिलधार मन्मथस्वामी समाधी व भव्य डोंगराच्या रांगा याचेही दर्शन झाले,श्री क्षेत्र कपिलधार येथे श्री नंदकिशोर विभूते यांनी  दुपारी जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था केली,तसेच  श्री क्षेत्र चाकरवाडी व योगेश्वरी देवी अंबाजोगाई दर्शन घेऊन सहल संपन्न झाली.       सहलीच्या यशस्वीतेसाठी  मुख्याध्यापक अशोक नावंदे सर ,शा.व्य. समिती अध्यक्ष  श्री नवनाथराव नागरगोजे,शिक्षक सर्वश्री महादेव गित्ते सर,सचिन फड सर,श्रीम बबिता शिंदे मॅडम यांनी परिश्रम घेतले.

MB NEWS:कर्म हीच ईश्वरसेवा मानणाऱ्या संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सवाची कार्यकारणी घोषित

इमेज
  कर्म हीच ईश्वरसेवा मानणाऱ्या संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सवाची कार्यकारणी घोषित अध्यक्षपदी शांतीनाथ शिंदे तर उपाध्यक्षपदी राहुल गायकवाड परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दि. २२ जानेवारी २०२३ रोजी गुरू रविदास मंदिर येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सव समितीच्या कार्यकारणी निवडीबाबत तथा जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यासाठी एक व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. यात अध्यक्षपदी शांतीनाथ शिंदे तर उपाध्यक्षपदी राहुल गायकवाड तसेच कार्याध्यक्ष वैजनाथ वाघमारे, सचिव अशोक शिंदे व कोषाध्यक्ष शिवाजी घायाळ यांची निवड करण्यात आली. सोबतच सहसचिव रवी सातपुते, सहकोषाध्यक्ष शाहू वाघमारे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. याप्रसंगी सुधीर गायकवाड, त्र्यंबक शिंदे, शाम वाघमारे, अमोल शिंदे, नरहरी आसेवार, रंगनाथ खराटे, एकनाथ शिंदे, पांडुरंग शिंदे, वैजनाथ वाघमारे, राजेश खन्ना, रामकृष्ण वाघमारे, बालाजी माने, विजय शिंदे, सचिन सोनवणे, गोपाल सोनवणे, त्र्यंबक कदम, सुदाम शिंदे, रोहित गायकवाड, अजय शिंदे, लक्ष्मण सोनवणे, रामचंद्र कदम, लक्ष्मण कांबळे, कृष्णा आदाटे, नागनाथ वाघमारे, सतीश शिंदे, रोहिदा

MB NEWS:क्रिकेटर ते यशस्वी युवा उद्योजक: व्यंकटेश (पापा) मुंडे

इमेज
  क्रिकेटर ते यशस्वी युवा उद्योजक: व्यंकटेश (पापा) मुंडे  ...........................................   व्यवसाय करीत असताना नम्रता, शिष्टाचार, राहणीमान आदी  गोष्टींचं कौशल्य असल्याशिवाय यशस्वी उद्योजक होणे नाही. उद्योजक होण्यासाठी बाजारपेठेतील स्पर्धा आदींची माहिती उद्योजकाला असणे आवश्यक आहे. या सर्वच गुणांचा संगम असलेले व्यंकटेश पापा मुंडे आजच्या तरुण उद्योजकांना आदर्श निर्माण करणारे आहेत. परळी शहरातील भेल सेकंडरी स्कूलमध्ये  व्यंकटेश पापा मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण झाले तर शहरातीलच वैद्यनाथ महाविद्यालय पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले त्यानंतर त्यांनी विद्यापीठातून बीबीए पदवी पूर्ण ग्रामीण भागात शिक्षण घेऊन सुद्धा ग्रामीण भागासाठी काहीतरी करता येते हे त्यांच्या कार्यातून ठळक जाणवते. लहानपणापासूनच क्रिकेटची त्यांना आवड होती. शहरातील कोणत्याही क्रिकेट स्पर्धा असोत त्यामध्ये त्यांची क्रिकेट बद्दलची ओढ लक्षात येत असेल. एक प्रकारे क्रिकेटर ते यशस्वी उद्योजक असे थोडक्यात वेंकटेश बाबा मुंडे यांचे वर्णन करता येईल. शहरात बुलेट शोरूम आणि टाटा मोटर्स आदी शोरूम कंपनीची यशस्वी उभारणी त्यांनी के

MB NEWS:परळी तालुका व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार

इमेज
  परळी तालुका व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  व्हॉईस ऑफ मीडिया राष्ट्रीय पत्रकार संघटनेची परळी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये तालुकाध्यक्ष पदी स्वानंद पाटील, कार्याध्यक्ष पदी महादेव गित्ते तर उपाध्यक्ष पदी श्रीराम लांडगेंची निवड झाल्याबद्दल या पदाधिकाऱ्यांचा  परळीत संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुस्तके भेट देऊन सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.                 राष्ट्रीय स्तरावर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संघटना म्हणून ओळख असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया राष्ट्रीय पत्रकार संघटनेची परळी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.या कार्यकारिणीमध्ये तालुकाध्यक्षपदी स्वानंद पाटील, कार्याध्यक्षपदी महादेव गित्ते, उपाध्यक्षपदी श्रीराम लांडगे व व्हॉईस ऑफ मीडिया राष्ट्रीय पत्रकार संघटनेची परळी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. परळी तालुकाध्यक्ष स्वानंद पाटील, कार्याध्यक्षप महादेव गित्ते, उपाध्यक्षप श्रीराम लांडगे त्यांच्या नियुक्ती बद्दल परळीत संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव,

MB NEWS:वसंतनगर येथे रा . से . यो. वतीने आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
  वसंतनगर येथे रा . से . यो. वतीने आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद  परळी -वै: -वसंतनगर येथे राष्ट्रीेय सेवा योजना वैद्यनाथ कॉलेज व  ग्रामपंचायत वंसतनगर ,  सखारामजी नाईक ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने  दि .२१ जानेवारी २०२३ या कालवधीत  '' युवकांचा ध्यास ग्राम - शहर विकास '' विशेष युवक - युवती शिबिर अतंर्गत आरोग्य तपासणी व मोफत गोळया , औषध वाटप करण्यात आले . या आरोग्य शिबिरात १०० पुरूष व ६० महिला यांची तपासणी करण्यात आले.  वैद्यकीय अधिकारी धर्मापुरी डॉ .बालासाहेब मेढे, यांच्या उपस्थिती, कार्यक्रमात विशेष सहकार्य तर प्राचार्य अरूण पवार, संयोजक एन . एस.एस. विभागाचे प्रा . माधव रोडे , . मुख्यापक राम राठोड,विजय राठोड,समुदाय आरोग्य अधिकारी आश्विनी कराड, आरोग्य सहिका , आरोग्य सहाय्यक आर . एस . जोगदंड, गोविंद गुट्टे, पवार बी . एल . , पुरी एल . यु . , चव्हाण आदि यांनी मुले, मुली, पुरुष -स्त्रीचे विविध आजारी व्यक्तीची रक्तच्या चाचण्या तपासणी करून औषध दिली .

MB NEWS:रा . से . यो. युवक शिबिर वैद्यनाथ कॉलेज वतीने वसंतनगर येथे परिसर स्वच्छता अभियान

इमेज
  रा . से . यो. युवक शिबिर : वैद्यनाथ कॉलेज वतीने वसंतनगर येथे परिसर स्वच्छता अभियान परळी -वै: -वसंतनगर येथे राष्ट्रीेय सेवा योजना वैद्यनाथ कॉलेज व  ग्रामपंचायत वंसतनगर ,  सखारामजी नाईक ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने  दि . १८ ते २४ जानेवारी २०२३ या कालवधीत  '' युवकांचा ध्यास ग्राम - शहर विकास '' विशेष युवक - युवती शिबिराचे उद्घाटन संपन्न होत आहे . सात दिवशीय शिबिरात समाजिक प्रबोधन सह विशेष  श्रमदान तून परिसर स्वच्छता हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यात १३० स्वंयसेवक विद्यार्थी यात सहभाग घेतला असून विशेष ७० मुलींचा यात सहभाग घेतला.  झाडांना आळे बनवणे, परिसरातील परस बाग साठी पाण्याच्या प्लॉटिल रिकाम्या बाटल्याचा वापरा करून , श्रमदान तून स्वच्छाता अभियान आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रा . माधव रोडे, सरपंच शाहूताई विजय राठोड, प्राचार्य अरुण पवार , उपसरपंच कुंडलीराव जाधव, विजय राठोड, प्रा . नयनकुमार आचार्य, प्रा . एन . एस . जाधव, प्रा . दिलीप गायकवाड, प्रा . सागर शिंदे, प्रा . उमाकांत कुरे, प्रा . मारूती मोकळे, स्वामी सर, प्रा . गणेश परळीकर, यांच्यासह स्वंयस

MB NEWS:महाराष्ट्राच्या चित्ररथात साडेतीन शक्तिपीठे; प्रजासत्ताकदिनाच्या संचलनाची जोरदार तयारी

इमेज
  महाराष्ट्राच्या चित्ररथात साडेतीन शक्तिपीठे; प्रजासत्ताकदिनाच्या संचलनाची जोरदार तयारी         मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार असून यंदा “महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि ‘स्त्रीशक्ती जागर’ ही चित्ररथाची संकल्पना आहे. सध्या नवी दिल्लीत हा चित्ररथ साकारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या पथसंचलनाकडे देशवासीयांचे लक्ष लागलेले असते. पथसंचलनात सहभागी होणारे राज्य आणि मंत्रालये आप आपल्या परीने उत्तमोत्तम संकल्पना निवडतात आणि कलाकार त्या संकल्पनांना मूर्त रूप देऊन, हुबेहूब साकारून पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करतात. (Maharashtra Chitrarath 2023 ) स्त्रीशक्ती जागर’  संकल्पना यावर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी ‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ या संकल्पनेची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. या साडेतीन शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी

MB NEWS:रमाई प्रायमरी व प्ले स्कूलच्या स्नेहसंमेलना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

इमेज
  रमाई प्रायमरी व प्ले स्कूलच्या स्नेहसंमेलना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन परळी वैजनाथ दि.२० (प्रतिनिधी)             येथील रमाई प्रायमरी व प्ले स्कूलच्या स्नेहसंमेलना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन २१ व २२ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. शनिवारी (दि.२१) स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, बालरोगतज्ज्ञ डॉ गुरुप्रसाद देशपांडे, गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, रवींद्र देशमुख, प्रा. प्रसाद देशमुख यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्नेहसंमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंगेश देशमुख यांनी केले आहे.                  येथील रमाई प्रायमरी व प्ले स्कूलच्या वतीने दरवर्षी शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच शाळेस महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वच्छ सुंदर शाळा स्पर्धेत स्वच्छ विद्यालय पुरस्कार हा तालुक्यातून पहिला क्रमांक पटकावला. शाळेत गुणवत्ते बरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. याच अनुषंगाने शाळेच्या वतीने दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाचे भव्य आयोजन करण्यात येते. यंदा वा