MB NEWS:रमाई प्रायमरी व प्ले स्कूलच्या स्नेहसंमेलना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 रमाई प्रायमरी व प्ले स्कूलच्या स्नेहसंमेलना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन





परळी वैजनाथ दि.२० (प्रतिनिधी)

            येथील रमाई प्रायमरी व प्ले स्कूलच्या स्नेहसंमेलना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन २१ व २२ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. शनिवारी (दि.२१) स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, बालरोगतज्ज्ञ डॉ गुरुप्रसाद देशपांडे, गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, रवींद्र देशमुख, प्रा. प्रसाद देशमुख यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्नेहसंमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंगेश देशमुख यांनी केले आहे.

                 येथील रमाई प्रायमरी व प्ले स्कूलच्या वतीने दरवर्षी शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच शाळेस महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वच्छ सुंदर शाळा स्पर्धेत स्वच्छ विद्यालय पुरस्कार हा तालुक्यातून पहिला क्रमांक पटकावला. शाळेत गुणवत्ते बरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. याच अनुषंगाने शाळेच्या वतीने दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाचे भव्य आयोजन करण्यात येते. यंदा वार्षिक स्नेहसंमेलन दि.२१ व २२ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शनिवारी (दि.२१) दुपारी ४.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, बालरोगतज्ज्ञ डॉ गुरुप्रसाद देशपांडे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, रवींद्र देशमुख, प्रा. प्रसाद देशमुख यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक वैजनाथ जेलंग, मनोरमा सावजी, रोहिणी जोशी व शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. तर रविवारी (दि.२२) ५.३० वाजता विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी स्नेहसंमेलन होणार आहे. या वार्षिक स्नेहसंमेलनास पालक व पररीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंगेश देशमुख यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार