ग्लोबल आडगाव चित्रपटाची पुन्हा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड
सिलव्हर ओक फिल्म्स एंटरटेनमेंट प्रस्तुत प्रख्यात सिने लेखक-दिग्दर्शक अनिलकुमार साळवे लिखित-दिग्दर्शित
मनोज कदम निर्मित व अमृत मराठे सहनिर्मित, बहुचर्चित ग्लोबल आडगाव चित्रपटाची निवड पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली आहे.दि.२ते ९ फेब्रुवारी २०२३ दरम्यान पुणे येथे हा चित्रपट महोत्सव रंगणार आहे.
'ग्लोबल आडगाव' हा बहुआयामी लेखक आणि पुरस्कार विजेते व्यक्तिमत्व डॉ.अनिलकुमार साळवे दिग्दर्शित एक बिग-बजेट चित्रपट आहे. अभिनेता प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी सहदिग्दर्शन केले आहे.
'ग्लोबल आडगाव' हा चित्रपट कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला. तसेच अधिकृतपणे न्यू जर्सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अमेरिका साठी निवडला आहे.या चित्रपटास देश-विदेशातील नामवंत प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.नुकत्याच संपन्न झालेल्या अजंता_एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अशोक कानगुडे याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जगातील प्रसिद्ध चित्रपट महोत्सवापैकी एक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सव आहे.
या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, उपेंद्र लिमये, अनिल नगरकर, सिद्धी काळे, शिवकांता सुतार, अशोक कानगुडे, महेंद्र खिल्लारे, रौनक लांडगे, अनिल राठोड, संजीवनी दिपके, डॉ. सिद्धार्थ तायडे, साहेबराव पाटील,प्रदीप सोळंके, रानबा गायकवाड, विष्णू भारती,जालिंदर केरे, विक्रम त्रिभुवन,विष्णू चौधरी, परमेश्वर कोकाटे, प्राजक्ता खिस्ते, ऋषिकेश आवाड विक्की गुमलाडू,मंगेश तुसे यांच्या प्रमुख भूमिकेत आहेत.प्रख्यात गायक आदर्श शिंदे , डॉ. गणेश चंदनशिवे आणि जसराज जोशी यांनी गीतांना स्वरसाज चढविला आहे. प्रसिध्द गीतकार डॉ.विनायक पवार, प्रशांत मांडपुवार, अनिलकुमार साळवे यांच्या गीतांना समीक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. प्रशांत जठार, निर्मिती व्यवस्थापक सागर देशमुख, छायाचित्रण गिरीश जांभळीकर, संगीत विजय गावंडे, ध्वनी विकास खंदारे, कलादिग्दर्शन संदीप इनामके, संकलन श्रीकांत चौधरी, डीआय दिशा रंगालय, मेकअप मंगेश गायकवाड यांनी केला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा