MB NEWS:परळी नंतर आता केज मध्ये ही करुणा शर्मांवर गुन्हा दाखल

 परळी नंतर आता केज मध्ये ही करुणा शर्मांवर गुन्हा दाखल


केज :- केज पोलीस ठाण्यात करुणा शर्मा व अन्य एक जणां विरुद्ध अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सोमवार दि. २३ जानेवारी रोजी रात्री ९:०० वा सुमारास बालाजी तांदळे हे त्यांच्या मोबाईलमध्ये फेस बुकवर करूणा शर्मा यांचा व्हीडीओ पाहात असताना आमदार धनंजय मुंडे यांचेवर व्हिडीओ मध्ये केलेल्या आरोपा संदर्भात त्यांनी फोन केला असता करुणा शर्मा यांनी बालाजी तांदळे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच मोबाईल वरून अजय देडे यानेही बालाजी तांदळे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.


संबंधित बातमी:● *जीवे मारण्याची धमकी दिली: करुणा शर्मा विरोधात परळीत गुन्हा*


या प्रकरणी बालाजी तांदळे यांच्या तक्रारी वरून करुणा शर्मा  आणि अजयकुमार देडे दोघे रा. मुंबई यांचे विरुध्द दि. २३ जानेवारी रोजी रात्री ११:०० वा च्या दरम्यान केज पोलीस ठाण्यात दखलपात्र स्वरूपाचा गु. र. न. ५६/२०२३ भा. दं. वि. ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !