MB NEWS:राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासासाठी चे प्रभावी माध्यम : डॉ रमेश गटकळ*

 राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासासाठी चे प्रभावी माध्यम : डॉ रमेश गटकळ



सिरसाळा (प्रतिनिधि):- मौजे जयगाव या ठिकाणी १७ जानेवारी पासून सुरू असलेले *विशेष युवक युवती शिबिराची* २३ जानेवारी रोजी समारोप झाला. समारोप समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच पी कदम उपस्थित होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध वक्ते डॉ. रमेश गटकळ (श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव), तसेच श्री  डॉ. अमोल गंगणे (वसुंधरा महाविद्यालय घाटनांदुर) यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपले ध्येय निश्चित करून त्या दृष्टीने कठोर मेहनत करणे गरजेचे आहे. हेच यशस्वी होण्याचे सूत्र आहे आसे प्रतिपादन डॉ. अमोल गंगणे यांनी व्यक्त केले.  

माणसाने आपल्या आनंदी जीवन जगण्याची दिशा स्पष्ट केली पाहिजे जी इतरांना देखील आनंद देणारी असावी. हे सांगताना डॉ. रमेश गटकळ यांनी "बहु केली वणवण । पायपिटी जाला सिण॥  खांदीं भार पोटीं भुक । काय खेळायाचें सुख ॥" तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण करून दिली. त्यांनी आपले आयुष्य हे रडण्यात न घालवता हसण्यात घालवा हा संदेश दिला.

अध्यक्षीय समारोप करताना डॉ.एच.पी.कदम यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका आणि योगदान स्पष्ट करून यातील सहभाग विद्यार्थ्यांना आपले सामाजिक, राजकीय जीवन जगताना कसे महत्त्वाचे आहे हे समजून सांगितले. 

यावेळी विचार मंचावर गावातील श्री बापूराव दळवे, श्री बालासाहेब दळवे, श्री दिलीप आबा दळवे, श्री गंगाधरराव नायबळ तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाची कार्यक्रमाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे यांनी सात दिवसातील आपल्या उपक्रमांचा अहवाल वाचून प्रस्तावित केले. त्यावेळी दुसरे कार्यक्रम अधिकारी प्रा.दयानंद झिंजुर्डे यांनी आभार व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ जयदीप सोळंके यानी केले. त्यावेळी सह कार्यक्रमाधिकारी डॉ. अरुणा वाळके तसेच मोठ्या संख्येने स्वयंसेवक स्वयंसेविका प्राध्यापक गावातील नागरिक उपस्थित होते. 

दररोज सकाळच्या सत्राची सुरुवात योग साधणे होत असे, पुढील सत्र हे श्रम संस्काराचे, या मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक स्वयंसेविका आणि गावातील नागरिकांनी गावातील जिल्हा परिषद शाळा, मारुती मंदिराचा परिसर, गावातील मुख्य रस्ता त्याबरोबरच बौद्ध विहार आणि परिसर, तसेच जयगावातील प्रसिद्ध असणारा पीर बाबा चा परिसर आणि गावातील मज्जिद आणी त्याकडे जाणार मुख्य रस्ता शिबिरा दरम्यान या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले.  

दुपारच्या बोधीक सत्रा नंतर शिबिरा दरम्यान सायंकाळच्या सत्रामध्ये ह भ प श्याम सुंदर सोन्नर महाराज यांचे समाज प्रबोधन पर किर्तन झाले, यामध्ये त्यांनी संतांची शिकवण ही संविधानिक मूल्यांना कशाप्रकारे धरून होती याचे दाखले त्यांनी दिले. त्याबरोबरच ह भ प रामराव महाराज जगताप यांच्या भारुडांचा कार्यक्रम देखील संपन्न झाला. डॉ.संजय फुलारी यांनी “वऱ्हाड निघाले लंडनला” एक पात्री नाटक सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. याच काळात कवी संमेलन देखील पार पडले त्यावेळी डॉ. अविनाश ककासंडे, श्री.यशवंत मस्के, श्री.आत्माराम जाधव यांनी कवितेच्या माध्यमातून व्यसनमुक्ती त्याबरोबर स्त्रीभ्रूणहत्या रोखली पाहिजे असा संदेश दिला. हेमंत धानोरकर यांनी "भूत भानामती समाज आणि गैरसमज" या विषयावर अनेक प्रयोग सादर करून त्या माध्यमातून चमत्कार कसे घडवले जातात आणि भोंदू बाबांकडून कशी समाजाची फसवणूक होते हे आपल्या प्रयोगातून दाखवून दिले. 

या शिबिरासाठी रा से यों चे स्वयंसेवक, स्वयंसेविका आणि गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !