MB NEWS:शिवराज कातकडे यांची एमपीएससीतून सहायक कक्ष अधिकारीपदी निवड

 शिवराज कातकडे यांची एमपीएससीतून सहायक कक्ष अधिकारीपदी निवड


परळी वैजनाथ (प्रतिनिधी), :- दि.२४ :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून  घेण्यात आलेल्या सहायक कक्ष अधिकारी विभागीय परीक्षेतून कातकडे शिवराज विश्वांभर यांची सहायक कक्ष अधिकारी (वर्ग - 2 ) या पदावर निवड झाली. कातकडे शिवराज विश्वांभर यांची निवड झाल्याबद्दल सर्वसाधारण अभिनंदन होत आहे. 

        महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२२ मधील उमेदवारांची  निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या सहायक कक्ष अधिकारी  या विभागीय परीक्षेतून सहायक कक्ष अधिकारी (वर्ग - 2 ) या पदावर कातकडे शिवराज विश्वांभर यांची निवड झाली आहे.  कातकडे शिवराज विश्वांभर  , रा.कातकरवाडी, कातकरवाडी ,या छोट्याशा गावात त्यांचे प्राथमिक शिक्षण व बडवणी येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले..परभणी येथे DTed चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली. जिद्द आणि चिकाटीने वाटचाल केली की आकाशालाही गवसणी घालता येते. तसेच आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी घेतलेल्या कष्टाची जाण ठेवली तर मिळणारे यश हे आयुष्याचा सोहळा करणारे ठरते. असेच कौतुकास्पद यश कातकडे शिवराज विश्वांभर यांनी मिळवले आहे. एमपीएससीतून सहाय्यक कक्ष अधिकारी  या परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !