इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या आवाहनास प्रचंड प्रतिसाद

 पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या आवाहनास प्रचंड प्रतिसाद



'परिक्षा पे चर्चा' उपक्रमातंर्गत परळीत चित्रकला स्पर्धा ; हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग


*गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या टीमने केली स्पर्धा यशस्वी*


परळी वैजनाथ ।दिनांक २५।

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 'परिक्षा पे चर्चा ' या उपक्रमांतर्गत शहरात आज पार पडलेल्या चित्रकला स्पर्धेत विविध शाळा, महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी प्रगतीपथावरील भारत आपल्या उत्तमोत्तम चित्रातून रेखाटला.


  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात सर्वत्र शाळा व महाविद्यालय स्तरावर  'परिक्षा पे चर्चा' हा उपक्रम घेण्यात येत आहे. पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या आवाहनानुसार आज शहर व मतदारसंघात देखील हा उपक्रम राबविण्यात आला, त्याअंतर्गत शहरातील विविध दहाहून अधिक शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. आझादी का अमृतमहोत्सव, सर्जिकल स्ट्राईक, कोरोना लसीकरणात भारत नंबर एक, स्वच्छ भारत अभियान, आत्मनिर्भर भारत, बेटी बचाओ बेटी पढाओ आदी विषय स्पर्धेसाठी ठेवण्यात आले होते. सुमारे एक हजार ३३५  विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक, शैक्षणिक व विविध समाजोपयोगी संदेश देणारे चित्र रेखाटले.


स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या टीमने ज्यात  नगरसेवक पवन मुंडे,महादेव इटके, नितीन समशेट्टी, सचिन गित्ते, पवन मोदानी, मोहन जोशी, अरुण पाठक, अनिश अग्रवाल, योगेश पांडकर, वैजनाथ रेकने, अश्विन मोगरकर, विकास हालगे, गोविंद चौरे, सुशील हरंगुळे, पवन  तोडकरी, दिलीप नेहरकर, श्रीपाद शिंदे, नितीन मुंडे, राहूल घोबाळे  यांच्यासह भाजप पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!