MB NEWS:जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी करुणा शर्मा विरोधात परळीत गुन्हा
जीवे मारण्याची धमकी दिली: करुणा शर्मा विरोधात परळीत गुन्हा
परळी (प्रतिनिधी)
करुणा शर्मा यांनी काही दिवसापुर्वी केलेल्या फेसबुक पोष्टवर कमेंट का केली म्हणुन परळीतील एकास शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात करुणा शर्मा व अन्य एका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी शहरातील पंचवटीनगर येथील रहिवासी बालाजी ज्ञानोबा दहिफळे यांनी करुणा शर्मा यांनी काही दिवसापुर्वी फेसबुकवर केलेल्या पोष्टवर कमेंट केली होती.दि.22 जानेवारी रोजी रात्री 9.40 वाजता करुणा शर्मा यांनी दहिफळे यांना फोन करत तु माझ्या फेसबुक पोष्टवर कमेंट का केली म्हणुन शिविगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली तसेच करुणा शर्मा यांच्या फोनवरुन अजयकुमार देडे यांनीही शिवीगाळ केली.याप्रकरणी दहिफळे यांच्या फिर्यादीवरुन परळी शहर पोलिस ठाण्यात कलम 507,34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ट
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा