पोस्ट्स

संभाजीनगर परळी वै. पोलीसांची कार्यवाही

इमेज
  देशी गावठी कट्टयासह दोन जिवंत काडतुस जप्त ! संभाजीनगर परळी वै. पोलीसांची कार्यवाही परळी वैजनाथ, प्रतिनिधी... परळीतून एका जणाकडून देशी गावठी कट्टयासह दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात पोलीसांना यश मिळाले आहे. संभाजीनगर परळी वै. पोलीसांनी आज ही  कार्यवाही केली आहे.         संभाजीनगर पोलीसांना गुप्त माहिती मिळाली की, सुरजसिंग प्रेमसिंग जुन्नी रा फुलेनगर परळी हा उड्डुणपुला खाली थांबला असुन त्यांचे जवळ गावठी कट्टा आहे . पोलीस स्टाफ व दोन पंचासह रवाना होवुन सुरजसिंग प्रेमसिंग जुन्नी रा फुलेनगर परळी हा उड्डाणपुला खाली शिदी खाण्याचे समोर मिळून आला पंचा समक्ष त्याची अंग इ ाडती घेतली असता त्याचे कंबरेला उजव्या बाजुस पॅन्टंमध्ये खोवलेला एक सिल्वर रंगाचा स्टेनलेस स्टीलचा गवठी बनावटीचा मॅगझीनसह कटटा (पिस्टल), ज्यास पकडण्यासाठी स्टीलची मुठ व त्यावर ग्रीप करीता चॉकलेटी रंगाचे प्लास्टीक कव्हर असलेला असा जुना वापरता कि.अ.40,000/- रुपये व मॅगझीन मध्ये दोन जिवंत काढतुस 1000/- रुपये असे गावठी कटटा व काढतुस दोन्हीची एकुण किमंत 42,000/- रुपयेचा मुदेमालासह मिळुण आल्याने दोन पंचासह जप्ती पंचनामा करुन मुदेमा

एसटी करणार महायुतीचा प्रचार !

इमेज
  एसटी करणार महायुतीचा प्रचार !        लोकसभा निवडणुकीची  रणधुमाळी सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यापासून  एसटी बसवर लावण्यात आलेल्या सर्व राजकीय जाहिराती काढून टाकण्यात आलेल्या आहेत. मात्र एस टी महामंडळाने एक पत्र काढले असून या पत्रानुसार आता महायुतीच्या प्रचाराच्या जाहिराती लावण्यास परवानगी देण्यात येत असल्पाचे सर्व विभागीय नियंत्रकांना कळविण्यात आले आहे.त्यामुळे एसटी आता महापयुतीचा प्रचार करणार आहे.       एस टि महामंडळाचे महाव्यवस्थापक (नियोजन व पणन)  यांचे एक पत्र जारी करण्यात आले असुन या पत्रानुसार आता एसटीवर महायुतीच्या जाहिरातीला परवानगी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नियंत्रक रा.प. मुंबई / पालघर / रायगड (पेण) रत्नागिरी / सिंधुदूर्ग / ठाणे / नाशिक / धुळे / जळगांव / अहमदनगर / पुणे / कोल्हापूर / सांगली / सातारा / सोलापूर / औरंगाबाद / बीड / जालना / लातूर / नांदेड / उस्मानाबाद / परभणी / नागपूर / भंडारा / चंदपूर / वर्धा अकोला / अमरावती / यवतमाळ / बुलडाणा / गडचिरोली विभाग, या विभागांना हे पत्र देण्यात आले आहे. या पत्रात म्हटले आहे की , लोकसभा सार्वत्रिक निवडण

रेल्वे स्थानकातील तांत्रिक विभागाचे कर्मचारी कुठे होते?

इमेज
  परळी रेल्वे स्थानकावर लिफ्टमध्ये अडकले प्रवासी ;काही काळ एकच तारांबळ परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       परळी वैजनाथ रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर रेल्वे प्रवाशांसाठी असलेल्या लिफ्टमध्ये अचानक काहीतरी बिघाड झाल्याने ही लिफ्ट मध्येच अडकली. या लिफ्टमध्ये काही प्रवासी अडकून बसले. चालू लिफ्ट अचानकच बंद पडून अडकल्याने या लिफ्ट मधील प्रवाशांची तारांबळ उडाली.        परळी रेल्वे स्थानकावर आज रात्री प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर अकोला गाडी ला जाण्यासाठी काही प्रवासी लिफ्ट मधून वर जात असताना या लिफ्टला तांत्रिक बिघाड झाला. लिफ्ट सुरू झाल्यानंतर मध्येच अडकून बसली. त्यामुळे बराच वेळ या लिफ्टमध्ये प्रवाशी अडकले. लिफ्टमध्ये असलेल्या प्रवाशांची मात्र चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र बघायला मिळाले. लिफ्टमध्ये अडकलेल्या प्रवाशांची तारांबळ प्लॅटफॉर्म वरील नागरिकांच्या लक्षात आली आणि नागरिकांनी  सतर्कता दाखवत ही लिफ्ट खाली घेतली व लिफ्टमध्ये अडकलेले प्रवासी त्यानंतर सुखरूप  बाहेर पडले.             दरम्यान अनेक वेळा परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या प्रशासनाचा गलथान कारभार नेहमीच समोर येतो. यातच

दुखःद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
  आध्यत्मिक गुरु वासुदेवराव खंदारे गुरुजी यांचे निधन ; नव्वदव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  केज  : रामकृष्ण परमहंस अनुयायी परिवाराचे अध्यात्मिक गुरू प. पू. वासुदेवराव खंदारे गुरुजी { 90 वर्ष } यांचे  सोमवार रोजी दुपारी चारच्या सुमारास लातूर येथे उपचार सुरू असताना निधन झाले. आज (मंगळवारी) सकाळी 9 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.        खंदारे गुरुजी नावानेच परिचित असलेले वासुदेवराव बंडोपंत खंदारे हे मूळ वरपगाव  येथील परंतु अनेक वर्षांपासून ते केज येथेच वास्तव्यास होते . विनोबा भावे यांच्या विचारांचा पगडा असलेल्या खंदारे गुरुजींनी ध्यान व प्राणायामाच्या माध्यमातून हजारो तरुणांना अध्यात्माच्या मार्गावर आणले व निर्व्यसनी जगण्याचा मंत्रही दिला  मागील काही दिवसांपासून ते आजारी होते लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार चालू असताना काल दि 15 रोजी चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले            त्यांच्यावर आज धारूर रोड याठिकाणी असलेल्या गो शाळेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी व हजारो शिष्यगण असा मोठा परिवार आहे

लोकसभेचा उमेदवारी अर्ज कसा भरावा ?

इमेज
नामनिर्देशन पत्र अर्ज सजगतेसह नियमानुसार परिपूर्ण भरा : जिल्हादंडाधिकारी बीड, दि. 15(जिमाला): लोकसभा सार्वत्रिक निवडणुका सुरू असून 39 बीड लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात सोमवार दिनांक 13 मे रोजी मतदान होणार असून यासाठी उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया गुरुवार दिनांक 18 एप्रिल पासून सुरुवात होणार आहे हे नामनिर्देशन अर्ज उमेदवाराने सजगतेने तसेच परिपूर्ण भरावे अशा सूचना, जिल्हादंडाधिकारी आणि  दीपा मुधोळ मुंडे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केले.  आज नियोजन सभागृहात सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलविण्यात आली असून या बैठकीदरम्यान जिल्हादंडाधिकारी यांनी सूचना केल्या.  याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्र कुमार कांबळे उपस्थित होते. जिल्हा निर्णय निवडणूक अधिकारी पुढे म्हणाल्या, 18 एप्रिल रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. याच दिवसापासून  11 ते 3 पर्यंत दिनांक 25 एप्रिल पर्यंत जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात हे नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील. अनुसूचित जाती तथा जमातीच्या उमेदवारासाठी 12.500 हजार रुपये अनामत रक्कम आहे त

पुरातन गोराराम मंदीर परळी येथे रामनवमी निमित्त रामजन्मोत्सवाचे आयोजन

इमेज
  पुरातन गोराराम मंदीर परळी येथे रामनवमी निमित्त  रामजन्मोत्सवाचे आयोजन आयोध्येतील रामलल्ला स्थापनेनंतरचा पहीला जन्मोत्सव:राम भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावाः- रामदासदादा रामदासी परळी वैजनाथ, प्रतिनिधी......         परळीतील पुरातन अशा श्री गोराराम मंदीर येथे अयोध्येच्या रामलल्ला स्थापने नंतरचा पहीला रामजन्मोत्सव दि.१७ रोजी बुधवारी मोठया उत्साहात संपन्न होणार आहे. प्रभु रामाच्या दर्शनाचा व दुपारी १२ वाजता होणा-या जन्मोत्सवाचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा असे वैद्यराज रामदासदादा रामदासी यांनी आवाहन केले आहे.             परळीतील ४०० वर्षे पुरातन असे गोराराम मंदीर असुन समर्थ रामदास स्वामी सज्जनगड यांचे शुभ हस्ते स्थापन केलेला मारोती व त्यांचे पट्टयशिष्य कल्याण स्वामीच्या हस्ते अयोध्या येथुन त्या काळी आणलेल्या श्रीराम मुर्ती स्थापन केलेल्या आहेत. अयोध्या येथे रामलल्ला स्थापना झाल्या नंतरची ही पहीली रामनवमी असुन रामकथाकार पं.मनोहरदेव जोशी कानेगांवकर यांनी अध्यात्म रामायण नऊ दिवस सांगीतले आहे. शेकडो वर्षाची परंपरा आजची पिढी पुढे चालवीत आहे. गुढी पाडव्यापासुन नऊ दिवस भजन, किर्तन, रामकथा असे उपक्रम

परळी उपजिल्हा रुग्णालयात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

इमेज
  परळी उपजिल्हा रुग्णालयात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  परळी प्रतिनिधी.      महामानव ,विश्वरत्न , डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133  व्या जयंतीनिमित्त परळी उपजिल्हा रुग्णालयात डॉ .बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. पत्रकार विकास वाघमारे यांच्या हस्ते  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली.       14 एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालय परळी वै येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विकास वाघमारे (दैनिक महाभारत )यांचे हस्ते पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली .यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अरुण गुट्टे ,वैद्यकीय अधिकारी, डॉ सचिन निळे ,डॉ राजश्री गीते, सहाय्यक अधीक्षक रामधन कराड ,औषध निर्माण अधिकारी दिक्कतवार, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी गीताजी चव्हाण, परी सेविका श्रीमती ज्योती कुलकर्णी, शीला कुलकर्णी, जगतकर ,शिंदे ,नागोराव वाळले ,सोमनाथ गिरी इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शिक्षणामुळेच बाबासाहेबांनी क्रांती केली - अजयकुमार गंडले

इमेज
  शिक्षणामुळेच बाबासाहेबांनी क्रांती केली - अजयकुमार गंडले  एक वही एक पेन अभियानास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद परळी प्रतिनिधी.        विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणामुळेच भारतात महान अशी क्रांती केली असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत व लेखक अजयकुमार गंडले  यांनी केले .ते परळी येथे 14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या  जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या एक वही एक पेन या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.       परळी येथील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या डॉ .बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगणात काल दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता एक वही एक पेन या अभियानाचे उद्घाटन  करण्यात आले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ .अरुण गुट्टे हे होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत अजयकुमार गंडले ,सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ सावंत ,डॉ.आकाश वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार ससाने,मनसेचे शहर उपाध्यक्ष विठ्ठलराव झीलमेवाड, पत्रकार संभाजी मुंडे, पत्रकार दत्ता काळे, सेवानिवृत्त स.पो.नि.मधुकर नि

उद्या धारुर- वडवणी च्या ग्रामीण भागात दौरा

इमेज
  पंकजाताई मुंडे यांचा उद्या  धारुर- वडवणी च्या  ग्रामीण भागात दौरा : नागरिक, मतदारांच्या घेणार भेटीगाठी  परळी वैजनाथ, प्रतिनिधी            भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई मुंडे या आपल्या झंझावाती दौऱ्याने बीड जिल्हा ढवळून काढत आहेत. जिल्ह्यात ठीक ठिकाणी पंकजाताई मुंडे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे. उद्या दि.१६ रोजी पंकजाताई मुंडे या वडवणी -धारुर ग्रामीण भागात दौरा करणार आहेत.या दौऱ्यात विविध गावात नागरिक व मतदारांच्या भेटीगाठी त्या घेणार आहेत.           भाजपाच्या वतीने बीड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यापासून पंकजाताई मुंडे यांचे जिल्ह्यात ठिकठिकाणी जनतेकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे.उद्या गुरुवार, दि.१६ एप्रिल 2024 रोजी पंकजाताई मुंडे यांचा वडवणी -धारुर ग्रामीण भागात दौरा करणार आहेत.वेळ सकाळी 9.30 वा परळी येथुन हिंगणी बुद्रुक ता धारूरकडे प्रयाण,सकाळी 10.00 हिंगणी बुद्रुक ता धारूर येथे भेट,सकाळी 10.30 हिंगणी खुर्द ता धारूर येथे भेट,सकाळी 11.00 कांदेवाडी ता धारूर येथे भेट, सकाळी 11.30

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाइं महायुतीच्या प्रचारफेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
  पंकजाताई मुंडेंच्या विजयासाठी परळीत महायुतीचे कार्यकर्ते सरसावले भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाइं महायुतीच्या प्रचारफेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद परळी ।दिनांक १५। भाजपा महायुतीच्या बीड लोकसभा मतदार संघातील उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सरसावले आहेत. शहरात आज मोठ्या उत्साहात महायुतीमधील घटक पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचारफेरी काढून मतदारांशी थेट संपर्क साधून पंकजाताईंना विक्रमी मताधिक्य देऊन विजयी करावे असे आवाहन केले.     जिल्हयाचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८ वाजता संत जगमित्र नागा मंदिर येथुन प्रारंभ झालेल्या या प्रचार फेरीत महायुतीचे फलक व पंकजाताई यांच्या संकल्पनेतील बीड जिल्ह्याच्या विकासाचे मुद्दे मतदारांना पटवून देण्यात आले.या प्रचारफेरीचे मतदारांनी ठिकठिकाणी स्वागतही केले. पंकजाताई मुंडे यांच्या उमेदवारीची महायुतीकडुन घोषणा झाल्यानंतर होमपिच असलेल्या परळी शहरात उत्साहाचे वातावरण आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही दिवस अगोदरच परळी शहर

केजच्या कार्यकर्ता मेळाव्यात पंकजाताई मुंडेंचा शब्द

इमेज
  विकास हीच माझी जात, संधी द्या, मतदान व्यर्थ जाणार नाही केजच्या कार्यकर्ता मेळाव्यात पंकजाताई मुंडेंचा शब्द पंकजाताई सर्व अठरापगड जातींना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व - विक्रमी मताधिक्यासाठी रमेश आडसकरांनी कंबर कसली केज ।दिनांक १५। आपला जिल्हा,आपली माणसं एवढाच दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन मी सत्तापदाच्या काळात केवळ विकासाचं राजकारण केलं. हा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रापेक्षाही विकासाच्या प्रवाहात पुढे जावा हे माझं स्वप्न आहे. तुम्ही र्‍हदयावर हात ठेवुन माझ्यावर विश्वास ठेवा, दिलेलं मतदान वाया जाणार नाही, विकास हीच माझी जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा तिसर्‍यांदा पंतप्रधान होतील तेव्हा त्यांच्याकडून क्षणोक्षणी जिल्ह्याचं भाग्य उजळण्यासाठी मी मिळालेल्या संधीचं सोनं केल्याशिवाय रहाणार नाही या शब्दांत लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडेंनी मतदारांना आवाहन केले. दरम्यान पंकजाताई म्हणजे सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेवुन चालणारी शक्ती असुन मागच्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणेना पाच लाख मते मिळाले. मात्र पाच वर्षात कुठल्या बिळात लपले? हा सवाल करत आडसकरांनी जातीपा

खळबळजनक: तीक्ष्ण हत्याराने भोसकून एकाची हत्या

इमेज
  खळबळजनक: तीक्ष्ण हत्याराने भोसकून एकाची हत्या अंबाजोगाई : अंबाजोगाई येथून जवळच असलेल्या अंबासाखर कारखान्याच्या परिसरात आज रविवारी 14 एप्रिल 2024 रोजी एका तरुणाची तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. संजय आत्माराम राठोड [वय 35 रा. राडी तांडा] असे मृत व्यक्तीचे नाव आहे.  रविवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास तो अंबासाखर परिसरात असताना एका व्यक्तीने त्याच्या छातीत तीक्ष्ण हत्याराने भोसकून त्याचा खून केल्याची माहिती आहे. किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.  घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ‘स्वाराती’ रुग्णालयात पाठवून दिला. दरम्यान, खुनाचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसून पोलीस पुढील तपास करित आहेत.

जागोजागी झाले उत्स्फुर्त स्वागत

इमेज
  पंकजाताई मुंडेंच्या धारूर, केजमध्ये डोअर टू डोअर प्रचार जागोजागी झाले उत्स्फुर्त स्वागत ; पंकजाताईंना विक्रमी मतांनी संसदेत पाठविण्याचा मतदारांचा  निर्धार धारूर/केज ।दिनांक १४। भाजप-महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज दिवसभर केज आणि धारुर शहरातील मतदारांच्या घरोघरी जावून भेटी घेत संवाद साधला. लोकसभा निवडणूकीत प्रचंड मताधिक्क्याने निवडून देण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.  दरम्यान ठिकठिकाणी महिलांसह जेष्ठ नागरिकांनी पंकजाताईंचे उत्स्फुर्त स्वागत करत पाठीशी असल्याचा विश्वास दिला. या भव्य स्वागताने पंकजाताई मुंडे भारावल्या. तुमच्या आशिर्वादाच्या शिदोरीवरच मी संसदेत बीडचे प्रतिनिधीत्व करेल अशा भावना याप्रसंगी त्यांनी  व्यक्त केल्या.   लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ पंकजाताई मुंडे यांनी सर्व जिल्ह्याचा दौरा पुर्ण केला आहे. आता प्रचाराच्या दुसर्‍या टप्प्यात त्या महायुतीच्या सर्व पदाधिकारी,कार्यकर्त्यांशी बैठकी घेत शहरांसह ग्रामीण भागातील जनतेशी संवाद साधत आहेत. रविवारी पंकजाताई मुंडे यांनी केज शहरात मतदारांच्या घरोघरी जावून त्यांच्याशी थेट संपर्क साधत या निवडणूकीत निवडून देण्याच

पुण्यश्लोक अहिल्यादेवी माझ्या आदर्श : जनतेची सेवा करताना सात्विकता ढळू देणार नाही

इमेज
  पंतप्रधानांकडून जिल्हयात मोठा उद्योग हट्टाने घेऊन येण्यासाठी माझा प्रयत्न असेल धारूरच्या धनगर समाज मेळाव्यात पंकजाताई मुंडेंनी दिला शब्द पुण्यश्लोक अहिल्यादेवी माझ्या आदर्श : जनतेची सेवा करताना सात्विकता ढळू देणार नाही धारूर ।दिनांक १३। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच आहेत, यात कुठलीही शंका नाही. ही निवडणूक कुठल्या कारणासाठी नाही. यातून मला काही मिळावं हे देखील माझं स्वप्न नाही. तथापि जिल्हयातील दहा हजार युवकांना रोजगार मिळेल असा एखादा मोठा उद्योग पंतप्रधानांकडून हट्टाने जिल्हयात घेऊन यायचा आहे, कॅन्सर रुग्णांसाठी मल्टिस्पेशालिटि हॉस्पीटल उभा करायचयं. या जिल्हयाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मला आशीर्वाद द्या. आपलं मतदान योग्य पारड्यात टाका असं आवाहन भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केले.    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माधवराव निर्मळ यांनी आयोजित केलेल्या जिल्हयातील धनगर समाज बांधवांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. माजी आमदार आर टी देशमुख, केशवदादा आंधळे, रमेश आडसकर, नगराध्यक्ष डाॅ. स्वरूपसिंह हजारी, उदयसिंह दिख्खत, राम कुलकर्णी, रामकृष्ण घुले, लक्ष

प्रभागनिहाय प्रचाराचे सूक्ष्म नियोजन

इमेज
  परळीतील जनतेने आजवर मला प्रत्येक निवडणुकीत विजय प्राप्त करून दिला, आता पंकजाताईला निवडून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी - धनंजय मुंडे परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतून धनंजय मुंडेंसह कार्यकर्त्यांनी केला पंकजाताईंच्या विजयाचा संकल्प प्रभागनिहाय प्रचाराचे सूक्ष्म नियोजन परळी वैद्यनाथ (दि. 13) - परळी शहरातील जनतेने नगर परिषदेच्या निवडणुकीपासून लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत प्रत्येक निवडणुकीत मला अभूतपूर्व प्रेम दिले. प्रत्येक निवडणुकीत मताधिक्य देत विजय नोंदवले. माझ्या प्रत्येक संघर्षात माझा प्रत्येक सहकारी कार्यकर्ता माझ्या बरोबरीने लढला. आता तीच जबाबदारी पुन्हा या लोकसभा निवडणुकीत पार पाडायची आहे. या निवडणुकीत आपण सर्वांनी मिळून पंकजाताईला निवडून देण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन अधिकाधिक मताधिक्य देऊ, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.  बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ ना.धनंजय मुंडे हे मैदानात उतरले असून, बीड जिल्ह्यात आणि विशेषकरून परळी मतदारसंघात त्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. आज

भागवतमर्मज्ञ बाळुमहाराज उखळीकर कथाप्रवक्ते:नामवंत किर्तनकारांची किर्तनसेवा

इमेज
  माजलगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवतकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन भागवतमर्मज्ञ बाळुमहाराज उखळीकर कथाप्रवक्ते:नामवंत किर्तनकारांची किर्तनसेवा माजलगाव, प्रतिनिधी.....          श्री विठ्ठल रुक्मीणी, श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री तुकाराम महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन तसेच  पिताश्री बप्पासाहेब व्यंकोबा सोळंके  वै. मातोश्री कस्तुराबाई बप्पासाहेब सोळंके मातृ-पितृ पुण्यस्मरणानिमित्त माजलगाव येथे दि.१४ एप्रिल ते २१ एप्रिल २०२४ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवतकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध भागवतकथा प्रवक्ते भागवतमर्मज्ञ ह भ प बाळुमहाराज उखळीकर यांच्या सुमधूर वाणीतून भागवतकथा तसेच नामवंत किर्तनकारांची किर्तनसेवा या सप्ताहात होणार आहे.              सोळंके निवास चिखलीकर ,दत्त मंदिर, समता काॅलनी माजलगांव येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवतकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात पहाटे ४ ते ६ काकडा भजन, ६ ते ६.३० विष्णुसहस्रनाम ६.३० ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १ गाथा भजन दुपारी २ ते ६ भागवत कथा सायं. ६ ते ७ ह

मराठवाड्यातील सर्व बाधित जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधींची परळीत बैठक

इमेज
  द्रुतगती महामार्गापेक्षा मराठवाड्यात सिंचन अनुशेष पूर्ण करणारा प्रकल्प राबवा ■शक्ती पीठ महामार्ग प्रकल्प रद्द करा अथवा शेतकऱ्यांच्या प्रेतावरून बनवा-संतप्त भावना ●मराठवाड्यातील सर्व बाधित जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधींची परळीत बैठक परळी / प्रतिनिधी मराठवाड्यात अगोदरच सिंचनाखाली जमीन कमी आहे. त्यातच पवणार ते पत्रादेवी या शीघ्र दृतगती शक्तिपीठ महामार्ग नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यातून जात असून हा मार्ग अत्यन्त सुपीक आणि बागायती जमिनीतून जाणार आहे. त्यामुळे मराठवड्यातील खूप मोठी बागायत जमीन या महामार्गामध्ये जाऊन कायमस्वरूपी शेतकरी भूमिहीन होणार आहेत.यामुळे पवणार ते पत्रादेवी या शीघ्र दृतगती शक्तिपीठ महामार्गास विरोध करण्यासाठी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील बाधित शेतकरी प्रतिनिधीची बैठक शनिवार (दि13) रोजी परळी येथे संपन्न झाली. या बैठकीसाठी नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर धाराशिव या जिल्हातील प्रत्येक तालुक्यातून प्रमुख प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. मराठवाड्यातील ज्या सहा जिल्ह्यातुन हा शक्ती पीठ महामार्ग हळद, केळी, फळबागा, ऊस बागायत पट्ट्यातून हा महाम
इमेज
  प्रेस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देवून केला वाढदिवस साजरा परळी वैजनाथ/प्रतिनिधी : तालुक्यातील मौजे परचुंडी येथील सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा प्रेस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे यांचा आज शनिवार दिनांक 13 एप्रिल रोजी वाढदिवस परचुंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करून साजरा करण्यात आला वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून भीाशंकर नावंदे यांनी समाज उपयोगी उपक्रम राबवत वाढदिवस साजरा केला. भीमाशंकर नावंदे हे राजकारण न करता नेहमीच समाजकारणामध्ये सक्रिय असल्याचे दिसून येते. परचुंडी व परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी  भीमाशंकर नावंदे हे नेहमीच सक्रिय असतात. युवकांना सोबत घेऊन काम करणे हे  भीाशंकर नावंदे यांचा नेहमी उद्देश असतो. श्री नावंदेे हे नेहमीच हसतमुख सर्वांसोबत प्रेमाने वागणारे व्यक्तिमत्व म्हणून परचुंडी व पंचक्रोशीमध्ये ओळखले जाते. वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परचुंडी ता.परळी वैजनाथ येथे अनावश्यक खर्च ट

३९ लाखाच्या विटांचा व्यवहार: हैदराबादच्या एकाने परळीतील वीटउद्योग व्यापाऱ्याची केली फसवणूक

इमेज
  ३९ लाखाच्या विटांचा व्यवहार: हैदराबादच्या एकाने परळीतील वीटउद्योग व्यापाऱ्याची केली फसवणूक परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......       ३९ लाखाच्या विटांचा व्यवहार करुन  हैदराबादच्या एकाने परळीतील वीट उद्योग व्यापाऱ्याची  फसवणूक केल्याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, परळीतील फिर्यादी शेख मकसूद मुजीब शेख रा. इस्लामपुरा बंगला परळी वै. यांच्याशी आरोपी खैसर अकबर पठाण रा. हैद्राबाद याने वीटा खरेदीचा व्यवहार केला. यातील आरोपीने फिर्यादीकडून 39,02,700/- रुपयांच्या विटा घेवुन गेला. त्यापैकी एकुण रक्कम रुपये 25,00,000/- (पंचवीस लाख रुपये) फिर्यादीच्या खात्यावर पाठवले. अजुन त्याच्याकडे बाकी 1402,700/- (चौदा लाख दोन हजार सातशे) रुपये असुन त्यापैकी  11,42,000/- चा चेक दिला मात्र तो चेक वटला नाही. तो खोटा व बनावट धनादेश देवुन एकुण 1404,700/- (चौदा लाख दोन हजार सातशे) रुपयांची फसवणुक करुन  विश्वासघात केला. असा तक्रार अर्ज दिल्याने अर्ज चौकशी वरुन आरोपीविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास

महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचाराच्या नियोजनार्थ महत्वपुर्ण बैठक

इमेज
  परळी राष्ट्रवादी शहर कार्यकारिणीची आज बैठक ना. धनंजय मुंडे  करणार मार्गदर्शन  शहरातील सर्व आजी-माजी नगरसेवक, विविध आघाडी व फ्रंटल सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन परळी वैद्यनाथ (दि. 12) - आगामी लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचाराच्या नियोजनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी शहर च्या कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार (दि. 13 एप्रिल) रोजी सायंकाळी सहा वाजता परळी शहरातील श्रद्धा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली असून या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा कृषिमंत्री धनंजय मुंडे हे मार्गदर्शन करणार आहेत.  परळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मान्यवर नेते, पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, विभाग प्रमुख, वार्ड प्रमुख, बुथ प्रमुख, त्याचबरोबर विविध आघाडी व फ्रंटल सेलचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या सर्वांनी या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी केले आहे.

तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या प्रशासनास सूचना

इमेज
  पडत्या पावसात धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर ! धारूर तालुक्यातील डाळिंब, आंबा, मिरची, टोमॅटो आदी पिकांच्या अवकाळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीची धनंजय मुंडेंनी केली पाहणी तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या प्रशासनास सूचना धारूर (दि.12) - राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला ब्रेक देत पडत्या पावसात धारूर तालुक्यातील चोरंबा, सोनीमोहा, आंबेवडगाव आदी गावांना भेटी देऊन अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या आंबा, डाळिंब, मिरची, टोमॅटो आदी पिकांची पाहणी केली, तसेच शेतकऱ्यांना धीर दिला. अवकाळीने फळांची व भाज्यांची पडझड झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्याचे अहवाल राज्य शासनाकडे तातडीने पाठवावेत, अशा सूचना यावेळी धनंजय मुंडे यांनी केल्या.  मागील दोन तीन दिवसात सातत्याने बीड जिल्ह्यात बहुतांश भागात अवकाळी पाऊस व काही ठिकाणी गारपीट झाली आहे. यामुळे आंबा, डाळिंब, यांसह मिरची, टोमॅटो, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी पंचनामे झाले आहेत तर उर्वरित ठिकाणचे पंचनामे तातडीने पूर्ण केले जावेत व मदतीचे अहवा

हजारो कोटींचा विकास निधी खेचून आणण्याची आमच्यात ताकद, त्यामुळे साथ द्या - आ.बाळासाहेब आजबे

इमेज
 स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांनी परळी पेक्षा पाटोदा-आष्टीवर अधिक प्रेम केले, त्याची परतफेड इथली जनता नेहमीप्रमाणे सर्वाधिक मताधिक्य देऊन करणार - धनंजय मुंडे हजारो कोटींचा विकास निधी खेचून आणण्याची आमच्यात ताकद, त्यामुळे साथ द्या - आ.बाळासाहेब आजबे  पंकजाताईंच्या विजयासाठी होणार सूक्ष्म नियोजन पाटोदा (दि. 12) - माझ्यासह बीड जिल्ह्यातील अनेकांना स्व.मुंडे साहेबांनी आमदार-खासदार केले. त्यांनी नेहमीच परळीपेक्षा अधिक प्रेम आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघावर केले. त्याबदल्यात इथल्या जनतेने देखील कायमच मुंडे साहेब उभं करतील त्या नेत्याला मताधिक्य दिले. याही वेळी पंकजाताईच्या रूपाने ती संधी पुन्हा एकदा आली आहे. इथली जनता पुन्हा एकदा पंकजाताईला परळीपेक्षा अधिक मताधिक्य देईल, असा विश्वास कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पाटोदा येथे बोलताना व्यक्त केला.  पाटोदा येथे आ.बाळासाहेब आजबे यांच्यासह महायुतीतील मान्यवर नेत्यांच्या पुढाकारातून महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक शहरातील चाऊस मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत धनंजय मुंडे बोलत होते.  पश्चिम वाहिनी नद्यांचे

पंकजाताईंच्या दारात कुठलाही रंग पाहिला जात नाही ; इथं प्रत्येकाचं काम सन्मानपूर्वक केलं जातं

इमेज
  तुमचं प्रत्येक मत माझ्यावर कर्ज; जिल्हा विकसित करूनच परतफेड करू - पंकजा मुंडे पाटोद्याच्या बैठकीत महायुतीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी कसली पंकजाताईंच्या विजयासाठी कंबर पंकजाताईंच्या दारात कुठलाही रंग पाहिला जात नाही ; इथं प्रत्येकाचं काम सन्मानपूर्वक केलं जातं पाटोदा ।दिनांक १२। पंकजाताईंच्या दारात कुठलाही रंग पाहिला जात नाही. प्रत्येकाचं काम इथं सन्मानपूर्वक केलं जातं. समाजातील सर्व घटकांचे हित साधत वंचित, उपेक्षितांचे स्वप्न साकार करण्यासाठीच आम्ही राजकारणात आहोत. लोकनेते मुंडे साहेबांची लेक म्हणून माझ्यावर जरूर प्रेम करा, पण मला मतदान करतांना माझ्यातील नेतृत्व, कर्तृत्वाला मतदान करा. तुमचं प्रत्येक मत हे माझ्यावर कर्ज आहे, त्याची परतफेड जिल्हयात विकासाची कामे करूनच करेन त्यासाठी मला साथ द्या असं आवाहन भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केलं. गेल्या निवडणुकीत पाच लाख मतं घेणाऱ्यांनी पाच वर्षांत जनतेचा चेहरा तरी पाहिला आहे का? असा सवालही त्यांनी केला.     भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ शहरात आज कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात

शेतात काम करणाऱ्या माय लेकावर कोसळली वीज

इमेज
  शेतात काम करणाऱ्या  माय लेकावर कोसळली वीज   गेवराई, प्रतिनिधी..  शेतात काम करत असताना अचानक वीज अंगावर पडल्याने शेतकरी महिलेचा जागीच मृत्यू झाला तर सदरील महिलेचा मुलगा गंभीर जखमी झाला. हि दुर्दैवी घटना शुक्रवार(ता.१२)एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी येथे घडली. मिना गणेश शिंदे (वय ३५)वर्ष असे मृत्यू झालेल्या शेतकरी महिलेचे नाव तर ओंकार गणेश शिंदे (वय १५) वर्ष असे जखमी युवकाचे नाव आहे.      गेवराई शहरात तसेच परिसरात शुक्रवार रोजी सायंकाळी वादळी वारा व विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस झाला. दरम्यान गेवराई शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मन्यारवाडी येथील मिना गणेश शिंदे व ओंकार गणेश शिंदे हे माय-लेकरं आपल्या स्वतःच्या शेतात काम करत होते. याचवेळी अचानक पाऊस व विजेच्या कडाकडाट सुरु झाल्याने मिना शिंदे व ओंकार हे दोघे लिंबाच्या झाडाखाली थांबले असता वीज कोसळली. यामध्ये मिना शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला तर ओंकार शिंदे हा गंभीररित्या जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी ओंकार याला गेवराई येथील एका खाजग

परळीत सलग दुसऱ्या दिवशी दोन गावात वीज कोसळली

इमेज
  परळीत सलग दुसऱ्या दिवशी दोन गावात वीज कोसळली: एक बैल व म्हैस दगावली परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा                   अवकाळी असून परळी तालुक्यात काल वीज कोसळून एक म्हैस दगावली होती त्यानंतर आज पुन्हा एकदा सलग दुसऱ्या दिवशी दोन विविध गावात वीच कोसळून दोन जनावरे दगावल्याची घटना घडली आहे.           परळी तालुक्यातील मौजे कानडी ता. परळी वै  येथील श्री प्रदीप बाबुराव कदम यांची म्हैस (वगार) वीज पडून मयत झाली आहे.तसेच मौजे  पाडोळी ता परळी वै येथील  भास्कर संभाबुवा पुरी यांचा बैल  वीज पडून मयत झाला.