प्रेस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी


शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देवून केला वाढदिवस साजरा


परळी वैजनाथ/प्रतिनिधी :

तालुक्यातील मौजे परचुंडी येथील सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा प्रेस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे यांचा आज शनिवार दिनांक 13 एप्रिल रोजी वाढदिवस परचुंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करून साजरा करण्यात आला वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून भीाशंकर नावंदे यांनी समाज उपयोगी उपक्रम राबवत वाढदिवस साजरा केला.

भीमाशंकर नावंदे हे राजकारण न करता नेहमीच समाजकारणामध्ये सक्रिय असल्याचे दिसून येते. परचुंडी व परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी  भीमाशंकर नावंदे हे नेहमीच सक्रिय असतात. युवकांना सोबत घेऊन काम करणे हे  भीाशंकर नावंदे यांचा नेहमी उद्देश असतो. श्री नावंदेे हे नेहमीच हसतमुख सर्वांसोबत प्रेमाने वागणारे व्यक्तिमत्व म्हणून परचुंडी व पंचक्रोशीमध्ये ओळखले जाते.

वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परचुंडी ता.परळी वैजनाथ येथे अनावश्यक खर्च टाळून खर्या अर्थाने समाज उपयोगी उपक्रम राबवला, यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊवाटप करून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही मनोभावना मनात ठेवून खर्या अर्थाने  भीमाशंकर नावंदे  यांनी कार्य केले आहे. यावेळी जेष्ठ मंडळी सुभाष दादा रुपनर, व्यंकट पाटील गडदे, राम अण्णा सरांडे, कमलाकर नावंदे, अर्जुन सरांडे, बलभीम थोरात,बंडू सुरवसे, शंकर पत्रवाळे, दयानंद नावंदे, प्रेस फोटोग्राफर गणेश पत्रवाळे व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

दरम्यान आज सकाळपासूनच  भीमाशंकर नावंदे यांना दुरध्वनी व सोशल मिडीडीयाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, इंजिनिअर, वकील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार