मराठवाड्यातील सर्व बाधित जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधींची परळीत बैठक

 द्रुतगती महामार्गापेक्षा मराठवाड्यात सिंचन अनुशेष पूर्ण करणारा प्रकल्प राबवा


■शक्ती पीठ महामार्ग प्रकल्प रद्द करा अथवा शेतकऱ्यांच्या प्रेतावरून बनवा-संतप्त भावना



●मराठवाड्यातील सर्व बाधित जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधींची परळीत बैठक


परळी / प्रतिनिधी


मराठवाड्यात अगोदरच सिंचनाखाली जमीन कमी आहे. त्यातच पवणार ते पत्रादेवी या शीघ्र दृतगती शक्तिपीठ महामार्ग नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यातून जात असून हा मार्ग अत्यन्त सुपीक आणि बागायती जमिनीतून जाणार आहे. त्यामुळे मराठवड्यातील खूप मोठी बागायत जमीन या महामार्गामध्ये जाऊन कायमस्वरूपी शेतकरी भूमिहीन होणार आहेत.यामुळे पवणार ते पत्रादेवी या शीघ्र दृतगती शक्तिपीठ महामार्गास विरोध करण्यासाठी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील बाधित शेतकरी प्रतिनिधीची बैठक शनिवार (दि13) रोजी परळी येथे संपन्न झाली. या बैठकीसाठी नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर धाराशिव या जिल्हातील प्रत्येक तालुक्यातून प्रमुख प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते.



मराठवाड्यातील ज्या सहा जिल्ह्यातुन हा शक्ती पीठ महामार्ग हळद, केळी, फळबागा, ऊस बागायत पट्ट्यातून हा महामार्ग प्रस्तावित आहे. हा महामार्ग खूप मोठ्या रुंदीचा असल्याकारणाने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उवजाऊ जमीन ही शासन संपादित करणार असल्याने असंख्य शेतकरी भूमिहीन तसेच अत्यल्पभूधारक होणार आहेत. मराठवाडा जिथे नेहमीच शेतकऱ्यांना अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत आपली उपजीविकेचे साधन असलेली शेती ह्या महामार्गाच्या नावाखाली शासनाकडून संपादित करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे जगण्याचं साधन कायम नष्ट होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा वातावरण आहे. सदरील भागामध्ये सिंचनाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने बाधित शेतकऱ्यांबरोबर इतर शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होणार आहे तसेच

शेतीवर अवलंबून असलेले शेतमजूर, शेतकऱ्यांना सेवा देणारे इतर व्यवसायिक यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. 


ह्याच मार्गावर अगोदरच तयार असलेला नागपूर रत्नागिरी महामार्ग असताना हा नवीन महामार्ग कशासाठी असा प्रश्न आता या भागातील शेतकरी आणि नागरिक उपस्थित करीत आहेत.या गंभीर प्रश्नावर शनिवार (दि 13 ) रोजी परळी येथे मराठवाड्यातील ज्या जिल्ह्यातून हा महामार्ग प्रस्तावित आहेत त्या जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील प्रमुख शेतकरी प्रतिनिधी यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत प्रामुख्याने 1)होऊ घातलेला पवणार ते पत्रादेवी शीघ्र दृतगती (शक्तिपीठ)महामार्ग कायमचा रद्द करण्यात यावा. 2)नागपूर ते मुंबई समृद्धी दृतगती महामार्ग मध्ये बाधित झालेल्या शेतकरी तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे गावांचे त्रयस्थ संस्थेकडून सामाजिक सर्वेक्षण करण्यात यावे. आणि त्याचा जशास तसा अहवाल प्रसारित करण्यात यावा.3)पवणार ते पत्रादेवी शीघ्र दृतगती महामार्ग (शक्तिपीठ) महामार्ग क्रमांक 10 बाबत निघालेले 28/2/2024, 7/3/2024 रोजी निघालेले व इतर सर्व परिपत्रके रद्द करण्यात यावीत.हे प्रमुख तीन ठराव यावेळी एकमुखाने मंजूर करण्यात आले आहे.शासनाने शेतकरी विरोधी हा शक्ती पीठ महामार्ग प्रकल्प रद्द करावा, जबरदस्ती ने हा प्रकल्प लादायांचा असेल तर आमच्या प्रेतावरून हा प्रकल्प न्यावा. अशा तीव्र स्वरूपाच्या भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त करून दाखवल्या.

●●●●●●●●●●●●●

सदरील महामार्गामध्ये मराठवाड्यातील अत्यन्त उपजाऊ जमीन जात आहे. त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.जलसंधारण तसेच नदीजोड सारखे प्रकल्पाना शासनाने प्राथमिकता दिली पाहिजे. सुपीक जमिनी घेऊन महामार्ग बांधणे योग्य नाही.


गजेंद्र येळकर

शेतकरी, लातूर. 

●●●●●●●●●●●

मी जालना - नांदेड समृद्धी महामार्ग मध्ये बाधित शेतकरी असून शक्तिपीठ महामार्ग मध्ये माझी खूप जास्त जमीन जाणार आहे. नांदेड- जालना महामार्ग मध्ये मला शासनाकडून अल्प मोबदला मिळत असल्याने आमचे पुनर्वसन शक्य नाही. आमच्या भागात जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत.


गोविंद घाटोळ

बाधित शेतकरी ,परभणी.

●●●●●●●●●●●●●


शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांची सुपीक जमीन कवडीमोल भावात संपादित करून कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशात घालण्याचे काम हे केंद्र आणि राज्य सरकार करत आहे.महामार्गापेक्षा मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न होण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या जमिनी विविध कारणांनी संपादित करून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचे कट कारस्थान सरकार कडून सुरू आहे.

एड.अजय बुरांडे

शेतकरी नेते, बीड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !