मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

एसटी करणार महायुतीचा प्रचार !

 एसटी करणार महायुतीचा प्रचार !



       लोकसभा निवडणुकीची  रणधुमाळी सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यापासून  एसटी बसवर लावण्यात आलेल्या सर्व राजकीय जाहिराती काढून टाकण्यात आलेल्या आहेत. मात्र एस टी महामंडळाने एक पत्र काढले असून या पत्रानुसार आता महायुतीच्या प्रचाराच्या जाहिराती लावण्यास परवानगी देण्यात येत असल्पाचे सर्व विभागीय नियंत्रकांना कळविण्यात आले आहे.त्यामुळे एसटी आता महापयुतीचा प्रचार करणार आहे.
      एस टि महामंडळाचे महाव्यवस्थापक (नियोजन व पणन)  यांचे एक पत्र जारी करण्यात आले असुन या पत्रानुसार आता एसटीवर महायुतीच्या जाहिरातीला परवानगी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नियंत्रक रा.प. मुंबई / पालघर / रायगड (पेण) रत्नागिरी / सिंधुदूर्ग / ठाणे / नाशिक / धुळे / जळगांव / अहमदनगर / पुणे / कोल्हापूर / सांगली / सातारा / सोलापूर / औरंगाबाद / बीड / जालना / लातूर / नांदेड / उस्मानाबाद / परभणी / नागपूर / भंडारा / चंदपूर / वर्धा अकोला / अमरावती / यवतमाळ / बुलडाणा / गडचिरोली विभाग, या विभागांना हे पत्र देण्यात आले आहे. या पत्रात म्हटले आहे की ,लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ ची आचारसंहितेचा भंग होवु नये म्हणून, संदर्भाधिन पत्र क्र. ०२ अन्वये सर्व रा.प. जाहिरात परवानाधारकांना व संदर्भाधिन पत्र क्र. ०३ अन्वये सर्व विभागांना करावायाच्या कार्यवाहीबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.

तथापी संदर्भाधिन पत्र क्र. ०१ अन्वये मे. प्रोअॅक्टीव इन अॅण्ड आऊट अॅड.प्रा.लि. यांनी रा.प. महामंडळाच्या १,००० बसेसवर शिवसेना पक्षाच्या जाहिराती प्रसारित करण्यास परवानगी देणेबाबत या कार्यालयास विनंती केली आहे. सदरच्या राजकीय जाहिराती प्रसारित करयाकरीता आवश्यक असलेल्या कागदपत्राची पुर्तता संबंधीत परवानाधारकांने केली असल्याने सोबत जोडलेल्या राजकीय जाहिराती प्रसिद्ध करण्यास या कार्यालयामार्फत परवानगी देण्यात येत आहे. सदर जाहिराती व्यतिरिक्त आचारसंहितेचा भंग करणा-या इतर जाहिराती परवानाधारकामार्फत / इतरामार्फत प्रसारित होणार नाही, याची दक्षता घ्यावी,
        त्यामुळे आता एसटी बसवर महायुतीच्या जाहिराती झळकणार असुन एक प्रकारे एसटीच आता महायुतीचा बिनदिक्कत प्रचार करणार आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....