रेल्वे स्थानकातील तांत्रिक विभागाचे कर्मचारी कुठे होते?

 परळी रेल्वे स्थानकावर लिफ्टमध्ये अडकले प्रवासी ;काही काळ एकच तारांबळ




परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
      परळी वैजनाथ रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर रेल्वे प्रवाशांसाठी असलेल्या लिफ्टमध्ये अचानक काहीतरी बिघाड झाल्याने ही लिफ्ट मध्येच अडकली. या लिफ्टमध्ये काही प्रवासी अडकून बसले. चालू लिफ्ट अचानकच बंद पडून अडकल्याने या लिफ्ट मधील प्रवाशांची तारांबळ उडाली.
       परळी रेल्वे स्थानकावर आज रात्री प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर अकोला गाडी ला जाण्यासाठी काही प्रवासी लिफ्ट मधून वर जात असताना या लिफ्टला तांत्रिक बिघाड झाला. लिफ्ट सुरू झाल्यानंतर मध्येच अडकून बसली. त्यामुळे बराच वेळ या लिफ्टमध्ये प्रवाशी अडकले. लिफ्टमध्ये असलेल्या प्रवाशांची मात्र चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र बघायला मिळाले. लिफ्टमध्ये अडकलेल्या प्रवाशांची तारांबळ प्लॅटफॉर्म वरील नागरिकांच्या लक्षात आली आणि नागरिकांनी  सतर्कता दाखवत ही लिफ्ट खाली घेतली व लिफ्टमध्ये अडकलेले प्रवासी त्यानंतर सुखरूप  बाहेर पडले.
            दरम्यान अनेक वेळा परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या प्रशासनाचा गलथान कारभार नेहमीच समोर येतो. यातच आता रेल्वे स्थानकातील लिफ्ट मध्ये प्रवासी अडकल्याची घटना समोर आली. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील तांत्रिक विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वास्तविक पाहता रेल्वे स्थानकातील ज्या लिफ्ट आहेत त्या लिफ्ट वर देखरेख करण्यासाठी तांत्रिक विभागाचे कर्मचारी नियुक्त केलेले असतात. मात्र आज जेव्हा ही लिफ्ट अडकण्याची घटना घडली तेव्हा नागरिकांना नागरिकांनीच मदत केली. त्यावेळी या तांत्रिक विभागाचे कर्मचारी कुठे होते? असा प्रश्न निर्माण होतो. रेल्वेची ही लिफ्ट अनेक वेळा नादुरुस्त असते. त्यामुळे या लिफ्टमध्ये असे प्रकार पाहावयास मिळतात. यापूर्वी सुद्धा अनेक प्रवाशांची अशाच प्रकारे तारांबळ उडालेली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !