पुरातन गोराराम मंदीर परळी येथे रामनवमी निमित्त रामजन्मोत्सवाचे आयोजन
आयोध्येतील रामलल्ला स्थापनेनंतरचा पहीला जन्मोत्सव:राम भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावाः- रामदासदादा रामदासी
परळी वैजनाथ, प्रतिनिधी......
परळीतील पुरातन अशा श्री गोराराम मंदीर येथे अयोध्येच्या रामलल्ला स्थापने नंतरचा पहीला रामजन्मोत्सव दि.१७ रोजी बुधवारी मोठया उत्साहात संपन्न होणार आहे. प्रभु रामाच्या दर्शनाचा व दुपारी १२ वाजता होणा-या जन्मोत्सवाचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा असे वैद्यराज रामदासदादा रामदासी यांनी आवाहन केले आहे.
परळीतील ४०० वर्षे पुरातन असे गोराराम मंदीर असुन समर्थ रामदास स्वामी सज्जनगड यांचे शुभ हस्ते स्थापन केलेला मारोती व त्यांचे पट्टयशिष्य कल्याण स्वामीच्या हस्ते अयोध्या येथुन त्या काळी आणलेल्या श्रीराम मुर्ती स्थापन केलेल्या आहेत. अयोध्या येथे रामलल्ला स्थापना झाल्या नंतरची ही पहीली रामनवमी असुन रामकथाकार पं.मनोहरदेव जोशी कानेगांवकर यांनी अध्यात्म रामायण नऊ दिवस सांगीतले आहे. शेकडो वर्षाची परंपरा आजची पिढी पुढे चालवीत आहे.
गुढी पाडव्यापासुन नऊ दिवस भजन, किर्तन, रामकथा असे उपक्रम राबविण्यात येतात. अशा जाज्जवल्य श्रीरामाचे राम नवमीच्या दिवशी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन वैद्यराज रामदासदादा रामदासी, लक्ष्मण रामदासी, नंदकुमार रामदासी सह सर्व रामदासी परीवाराने केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा