दुखःद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली

 आध्यत्मिक गुरु वासुदेवराव खंदारे गुरुजी यांचे निधन ; नव्वदव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 






केज  : रामकृष्ण परमहंस अनुयायी परिवाराचे अध्यात्मिक गुरू प. पू. वासुदेवराव खंदारे गुरुजी { 90 वर्ष } यांचे  सोमवार रोजी दुपारी चारच्या सुमारास लातूर येथे उपचार सुरू असताना निधन झाले. आज (मंगळवारी) सकाळी 9 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  

     खंदारे गुरुजी नावानेच परिचित असलेले वासुदेवराव बंडोपंत खंदारे हे मूळ वरपगाव  येथील परंतु अनेक वर्षांपासून ते केज येथेच वास्तव्यास होते . विनोबा भावे यांच्या विचारांचा पगडा असलेल्या खंदारे गुरुजींनी ध्यान व प्राणायामाच्या माध्यमातून हजारो तरुणांना अध्यात्माच्या मार्गावर आणले व निर्व्यसनी जगण्याचा मंत्रही दिला  मागील काही दिवसांपासून ते आजारी होते लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार चालू असताना काल दि 15 रोजी चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले 

          त्यांच्यावर आज धारूर रोड याठिकाणी असलेल्या गो शाळेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी व हजारो शिष्यगण असा मोठा परिवार आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !