इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

संभाजीनगर परळी वै. पोलीसांची कार्यवाही

 देशी गावठी कट्टयासह दोन जिवंत काडतुस जप्त !


संभाजीनगर परळी वै. पोलीसांची कार्यवाही

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
परळीतून एका जणाकडून देशी गावठी कट्टयासह दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात पोलीसांना यश मिळाले आहे.संभाजीनगर परळी वै. पोलीसांनी आज ही  कार्यवाही केली आहे.
        संभाजीनगर पोलीसांना गुप्त माहिती मिळाली की, सुरजसिंग प्रेमसिंग जुन्नी रा फुलेनगर परळी हा उड्डुणपुला खाली थांबला असुन त्यांचे जवळ गावठी कट्टा आहे .पोलीस स्टाफ व दोन पंचासह रवाना होवुन सुरजसिंग प्रेमसिंग जुन्नी रा फुलेनगर परळी हा उड्डाणपुला खाली शिदी खाण्याचे समोर मिळून आला पंचा समक्ष त्याची अंग इ ाडती घेतली असता त्याचे कंबरेला उजव्या बाजुस पॅन्टंमध्ये खोवलेला एक सिल्वर रंगाचा स्टेनलेस स्टीलचा गवठी बनावटीचा मॅगझीनसह कटटा (पिस्टल), ज्यास पकडण्यासाठी स्टीलची मुठ व त्यावर ग्रीप करीता चॉकलेटी रंगाचे प्लास्टीक कव्हर असलेला असा जुना वापरता कि.अ.40,000/- रुपये व मॅगझीन मध्ये दोन जिवंत काढतुस 1000/- रुपये असे गावठी कटटा व काढतुस दोन्हीची एकुण किमंत 42,000/- रुपयेचा मुदेमालासह मिळुण आल्याने दोन पंचासह जप्ती पंचनामा करुन मुदेमाल व आरोपी ताब्यात घेवुन त्या वरुन. संभाजीनगर गु.र.न 55/2024 कलम कलम 3/25, भारतीय शस्त्र अधिनियम 1959 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि ए.टी. शिंदे करीत आहेत.पो.नि उस्मान शेख, यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि शिंदे, पोह/भांगे, पोना/सानप, पोना/ मस्के, पोना/ शिंदे, पोकों/ फड, पोकों गुट्टे यांनी ही कारवाई केली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट