प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

शेतात काम करणाऱ्या माय लेकावर कोसळली वीज

 शेतात काम करणाऱ्या  माय लेकावर कोसळली वीज 



गेवराई, प्रतिनिधी.. 

शेतात काम करत असताना अचानक वीज अंगावर पडल्याने शेतकरी महिलेचा जागीच मृत्यू झाला तर सदरील महिलेचा मुलगा गंभीर जखमी झाला. हि दुर्दैवी घटना शुक्रवार(ता.१२)एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी येथे घडली. मिना गणेश शिंदे (वय ३५)वर्ष असे मृत्यू झालेल्या शेतकरी महिलेचे नाव तर ओंकार गणेश शिंदे (वय १५) वर्ष असे जखमी युवकाचे नाव आहे.

     गेवराई शहरात तसेच परिसरात शुक्रवार रोजी सायंकाळी वादळी वारा व विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस झाला. दरम्यान गेवराई शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मन्यारवाडी येथील मिना गणेश शिंदे व ओंकार गणेश शिंदे हे माय-लेकरं आपल्या स्वतःच्या शेतात काम करत होते. याचवेळी अचानक पाऊस व विजेच्या कडाकडाट सुरु झाल्याने मिना शिंदे व ओंकार हे दोघे लिंबाच्या झाडाखाली थांबले असता वीज कोसळली. यामध्ये मिना शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला तर ओंकार शिंदे हा गंभीररित्या जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी ओंकार याला गेवराई येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सदरील मृत्यू झालेल्या महिलेच्या पश्चात पती, एक मुलगी व जखमी ओंकार असा परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या