इमेज
  अरोही स्टाईल स्टुडीओच्या दांडीया महोत्सवास प्रारंभ महिला पोलीस कर्मचार्यांच्या हस्ते उद्घाटन,दररोज विविध स्पर्धांमध्ये आकर्षक बक्षीसे परळी (प्रतिनिधी)  परळी शहरातील अरोही स्टाईल स्टुडीओ च्या संचालिका,सामाजीक कार्यकर्त्या सौ.श्रध्दा गजानन हालगे- फुलारी यांच्या वतिने आयोजीत बेलवाडी येथे दांडीया स्पर्धेस प्रारंभ झाला या दांडीयाचे महिला पोलिस कर्मचार्यांच्या हस्ते व विविध क्षेत्रातील महिलांच्या उपस्थितीत शुक्रवार दि.4 ऑक्टोबर रोजी शुभारंभ करण्यात आला.या दांडीयामध्ये महिलांसाठी खेळ पैठणीचा,फॅशन शो,आरती ताट सजावट व दांडीया स्पर्धेतून दररोज आकर्षक बक्षीसे देण्यात येत आहेत.    परळी शहरातील महिलांना आपल्याच भागात दांडीया खेळाचा आनंद घेता यावा यासाठी अरोही स्टाईल स्टुडीओच्या वतिने नवरात्रोत्सवात प्रभु वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या गुरुलिंगस्वामी मठ,बेलवाडी येथे दररोज सायंकाळी 7 ते 10 या वेळेत नारीशक्ती दांडीया महोत्सवाचे आयोजन केले आहे.यामध्ये फॅशन शो,खेळ पैठणीचा,आरती ताट सजावट व दांडीया स्पर्धा घेण्यात येत आहेत.तसेच दररोज वेगवेगळ्या स्पर्धा घेवुन यातील विजेत्या महिलांना पेंटेवार कल

शिक्षणामुळेच बाबासाहेबांनी क्रांती केली - अजयकुमार गंडले

 शिक्षणामुळेच बाबासाहेबांनी क्रांती केली - अजयकुमार गंडले 

एक वही एक पेन अभियानास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद


परळी प्रतिनिधी.        विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणामुळेच भारतात महान अशी क्रांती केली असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत व लेखक अजयकुमार गंडले  यांनी केले .ते परळी येथे 14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या  जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या एक वही एक पेन या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

      परळी येथील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या डॉ .बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगणात काल दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता एक वही एक पेन या अभियानाचे उद्घाटन  करण्यात आले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ .अरुण गुट्टे हे होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत अजयकुमार गंडले ,सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ सावंत ,डॉ.आकाश वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार ससाने,मनसेचे शहर उपाध्यक्ष विठ्ठलराव झीलमेवाड, पत्रकार संभाजी मुंडे, पत्रकार दत्ता काळे, सेवानिवृत्त स.पो.नि.मधुकर निर्मळ पत्रकार विजय रोडे ,भीम शाहीर राहुल सूर्यवंशी ,परळी वीज निर्मिती केंद्राचे विलास ताटे,शिल्पा मुंडे, श्रीमती नंबरदार आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .

     याप्रसंगी पुढे बोलताना अजयकुमार गंडले  म्हणाले की ,एक काळ असा होता की बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते .माणसाच्या विकासाची सर्व ताकद शिक्षणामध्ये आहे हे ओळखून बाबासाहेबांनी उच्च शिक्षण प्राप्त केले .शिक्षणाच्या बळावर त्यांनी भारतातील विषम सामाजिक व्यवस्था उलथावून टाकली .यावेळी बोलताना वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरुण गुट्टे यांनी सांगितले की बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम आजच्या पिढीने केले पाहिजे. 

   

    आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत या अभियानाचे प्रमुख पत्रकार विकास वाघमारे,सामाजिक कार्यकर्ते  विकास रोडे  यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांनी केले .या कार्यक्रमात शहरातील अनेक नागरिक , सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर आदिनी एक वही एक पेन अभियानास वही आणि पेन देऊन  मदत केली .अभियानात जमा झालेले साहित्य शाळा सुरू झाल्यानंतर होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनायक काळे ,प्रशांत रोडे ,गौतम रोडे ,नवनाथ दाने ,विद्याधर सिरसाट , विनोद रायभोळे,बळी व्हावळे,राजू जोगदंड,संघपाल बनसोडे, मंगेश सरवदे आदिंनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?