३९ लाखाच्या विटांचा व्यवहार: हैदराबादच्या एकाने परळीतील वीटउद्योग व्यापाऱ्याची केली फसवणूक

 ३९ लाखाच्या विटांचा व्यवहार: हैदराबादच्या एकाने परळीतील वीटउद्योग व्यापाऱ्याची केली फसवणूक



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......
      ३९ लाखाच्या विटांचा व्यवहार करुन  हैदराबादच्या एकाने परळीतील वीट उद्योग व्यापाऱ्याची  फसवणूक केल्याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, परळीतील फिर्यादी शेख मकसूद मुजीब शेख रा. इस्लामपुरा बंगला परळी वै. यांच्याशी आरोपी खैसर अकबर पठाण रा. हैद्राबाद याने वीटा खरेदीचा व्यवहार केला.यातील आरोपीने फिर्यादीकडून 39,02,700/- रुपयांच्या विटा घेवुन गेला. त्यापैकी एकुण रक्कम रुपये 25,00,000/- (पंचवीस लाख रुपये) फिर्यादीच्या खात्यावर पाठवले. अजुन त्याच्याकडे बाकी 1402,700/- (चौदा लाख दोन हजार सातशे) रुपये असुन त्यापैकी  11,42,000/- चा चेक दिला मात्र तो चेक वटला नाही. तो खोटा व बनावट धनादेश देवुन एकुण 1404,700/- (चौदा लाख दोन हजार सातशे) रुपयांची फसवणुक करुन  विश्वासघात केला. असा तक्रार अर्ज दिल्याने अर्ज चौकशी वरुन आरोपीविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनी ससाणे हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !