प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचाराच्या नियोजनार्थ महत्वपुर्ण बैठक

 परळी राष्ट्रवादी शहर कार्यकारिणीची आज बैठक ना. धनंजय मुंडे  करणार मार्गदर्शन 


शहरातील सर्व आजी-माजी नगरसेवक, विविध आघाडी व फ्रंटल सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन


परळी वैद्यनाथ (दि. 12) - आगामी लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचाराच्या नियोजनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी शहर च्या कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार (दि. 13 एप्रिल) रोजी सायंकाळी सहा वाजता परळी शहरातील श्रद्धा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली असून या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा कृषिमंत्री धनंजय मुंडे हे मार्गदर्शन करणार आहेत. 


परळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मान्यवर नेते, पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, विभाग प्रमुख, वार्ड प्रमुख, बुथ प्रमुख, त्याचबरोबर विविध आघाडी व फ्रंटल सेलचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या सर्वांनी या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या