इमेज
  अरोही स्टाईल स्टुडीओच्या दांडीया महोत्सवास प्रारंभ महिला पोलीस कर्मचार्यांच्या हस्ते उद्घाटन,दररोज विविध स्पर्धांमध्ये आकर्षक बक्षीसे परळी (प्रतिनिधी)  परळी शहरातील अरोही स्टाईल स्टुडीओ च्या संचालिका,सामाजीक कार्यकर्त्या सौ.श्रध्दा गजानन हालगे- फुलारी यांच्या वतिने आयोजीत बेलवाडी येथे दांडीया स्पर्धेस प्रारंभ झाला या दांडीयाचे महिला पोलिस कर्मचार्यांच्या हस्ते व विविध क्षेत्रातील महिलांच्या उपस्थितीत शुक्रवार दि.4 ऑक्टोबर रोजी शुभारंभ करण्यात आला.या दांडीयामध्ये महिलांसाठी खेळ पैठणीचा,फॅशन शो,आरती ताट सजावट व दांडीया स्पर्धेतून दररोज आकर्षक बक्षीसे देण्यात येत आहेत.    परळी शहरातील महिलांना आपल्याच भागात दांडीया खेळाचा आनंद घेता यावा यासाठी अरोही स्टाईल स्टुडीओच्या वतिने नवरात्रोत्सवात प्रभु वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या गुरुलिंगस्वामी मठ,बेलवाडी येथे दररोज सायंकाळी 7 ते 10 या वेळेत नारीशक्ती दांडीया महोत्सवाचे आयोजन केले आहे.यामध्ये फॅशन शो,खेळ पैठणीचा,आरती ताट सजावट व दांडीया स्पर्धा घेण्यात येत आहेत.तसेच दररोज वेगवेगळ्या स्पर्धा घेवुन यातील विजेत्या महिलांना पेंटेवार कल

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाइं महायुतीच्या प्रचारफेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 पंकजाताई मुंडेंच्या विजयासाठी परळीत महायुतीचे कार्यकर्ते सरसावले




भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाइं महायुतीच्या प्रचारफेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


परळी ।दिनांक १५।

भाजपा महायुतीच्या बीड लोकसभा मतदार संघातील उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सरसावले आहेत. शहरात आज मोठ्या उत्साहात महायुतीमधील घटक पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचारफेरी काढून मतदारांशी थेट संपर्क साधून पंकजाताईंना विक्रमी मताधिक्य देऊन विजयी करावे असे आवाहन केले.


    जिल्हयाचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८ वाजता संत जगमित्र नागा मंदिर येथुन प्रारंभ झालेल्या या प्रचार फेरीत महायुतीचे फलक व पंकजाताई यांच्या संकल्पनेतील बीड जिल्ह्याच्या विकासाचे मुद्दे मतदारांना पटवून देण्यात आले.या प्रचारफेरीचे मतदारांनी ठिकठिकाणी स्वागतही केले. पंकजाताई मुंडे यांच्या उमेदवारीची महायुतीकडुन घोषणा झाल्यानंतर होमपिच असलेल्या परळी शहरात उत्साहाचे वातावरण आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही दिवस अगोदरच परळी शहरातील भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना (शिंदे गट),रिपाइं आदी महायुतीमधील घटक पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी संत जगमित्र नागा मंदिर, नेहरु चौक, बाजीप्रभु नगर, पंचवटी नगर, स्नेहनगर,पॉवर लुम,इंडस्ट्रीयल एरिया,माणिक नगर,शास्त्री नगर,नाथ नगर,शिवाजी नगर,जिव्हेश्वर नगर,न्यू माणिक नगर माणिक नगर आदी भागात  प्रचारफेरी काढली. पंकजाताई यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात थेट केंद्र सरकारच्या योजना आणुन मोठे प्रकल्प उभारुन रोजगार निर्मितीसाठी साथ द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रचारफेरीचा समारोप माणिकनगर येथे करण्यात आला.


*मतदारांकडून प्रचारफेरीचे स्वागत*

----

या व्यापक प्रचारफेरीचे मतदार,नागरीकांनी आपापल्या भागात स्वागत केले.प्रचारफेरीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता.स्वंयस्फुर्तीने सहभागी झालेले महायुतीचे कार्यकर्ते पंकजाताई यांना परळी शहरातुन मोठे मताधिक्य देण्यासाठी या रॅलीच्या माध्यमातुन एकवटल्याचे दिसून आले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?