पोस्ट्स

MB NEWS-देशात महिला सुरक्षित नाहीत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - सौ शोभना बद्दर

इमेज
  उत्तर प्रदेशमधील हाथरस घटनेतील नराधमांना तात्काळ फाशी द्या ; देशात महिला सुरक्षित नाहीत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - सौ शोभना बद्दर परळी वैजनाथ दि ‌४ ( प्रतिनिधी ) :- हैदराबाद येथील समशाबाद येथील घटनेस एक वर्ष पूर्ण होत नाही तोच उत्तर प्रदेश मधील हाथरस  या ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणारी लज्जास्पद घटना घडली. एका अबला महिलेस गॅंग रेप करून तिचे हाल हाल करीत तिच्या जिवाशी खेळ खेळला गेला त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हा सदर घटनेतील नराधमांना तात्काळ काशी द्या आणि देशांमध्ये महिलांचे अस्तित्व धोक्यात असून महिला सुरक्षित नाहीत. त्याची लाजत का असेना जबाबदारी स्वीकारून तात्काळ केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका शोभना बद्दर यांनी केली आहे.  गेली १० महिन्यांपूर्वी म्हणजे २७ नोव्हेंबर २०१९ रोजी हैदराबाद येथील समशाबाद याठिकाणी अशाच एका निष्पाप व्हेटरनरी महिला डॉक्टरवर रात्री ड्युटीवरून घरी जात असताना चार ते पाच नराधमांनी आडवून तिच्यावर गॅंग रेप करीत तिची निर्गुण हत्या केली आणि तिचा मृतदेह दुसऱ्या दिवशी जळाल्या स्थितीत आढळला. या घटनेने

MB NEWS:१९ वर्षिय मुलगा बेपत्ता;चांदापुर तलावात बुडाला असण्याची शक्यता

इमेज
  १९ वर्षिय मुलगा बेपत्ता;चांदापुर तलावात  बुडाला असण्याची शक्यता परळी वैजनाथ प्रतिनिधी     येथील हबीबपुरा भागातील मुलगा बेपत्ता असुन तो चांदापुर तलावात पोहण्यासाठी गेला होता.त्यामुळे तो तलावात बुडाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्याचा शोध नातेवाईक व नागरिक सध्या घेत आहेत. तलावावर मोठी गर्दी झाली असल्याचे दिसून येत आहे.या मुलाचे नाव शेख खाजामिया असे आहे.        

MB NEWS:मंदिरबंदी काळात प्रतिवैद्यनाथाचे दर्शन घेत भाविक मानतायत समाधान

इमेज
  मंदिरबंदी काळात प्रति वैद्यनाथाचे दर्शन घेत भाविक मानतायत समाधान  परळी वैजनाथ(प्रतिनिधी) बारा ज्योर्तिलिंग असलेले श्रीक्षेत्र परळी वैजनाथ येथील मंदिर लाॕकडाऊन काळात पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे .अख्खा श्रावण महिना,अधिक मास भाविकांना भगवान श्रीवैद्यनाथ दर्शनापासून वंचित राहण्याची वेळ आली. आपल्या पूर्वजांनी पुरातनकाळापासून भाविकांच्या सोयीसाठी  दूरदृष्टी ठेवून दर्शनासाठी जर मंदिरात कांही अपरिहार्य कारणांमुळे  अडचण असेल अथवा घाई घडबड भाविकांनाही असेल तर प्रतिवैजनाथाचे दर्शन घेतात.  वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वस पायथ्याशी असलेले छोटेखानी मंदिर असून ते प्रतिवैद्यनाथ म्हणून सुप्रसिद्ध आहे तेथेच भाविकभक्त ,महिला वृंद दर्शन घेत भगवान वैजनाथ दर्शनाचे समाधान मानतात. पायरी जेथून सुरुवात होते तेथे प्रतिवैद्यनाथ मंदिर असून सततची होणारी कुचंबणा यामुळे श्रावण महिन्यात व लाॕकडाऊनकाळात भाविकांनी प्रतिवैद्यनाथ दर्शन करुन ,पायरीचे दर्शन घेऊन ते मेरु प्रदक्षिणा करून समाधान मानून अखंडीत व अव्याहतपणे नित्य  दर्शन करण्याची सेवा परळीच्या व पंचक्रोशीच्या भाविक जणांनी  चालूच ठेवली.             ••••••••••••••••

MB NEWS: परभणी,जिल्ह्यात 103 व्यक्ती कोरोनाबाधित, चार व्यक्तीचा मृत्यू...

इमेज
  जिल्ह्यात 103 व्यक्ती कोरोनाबाधित, चार व्यक्तीचा मृत्यू... परभणी दि. 3 (प्रतिनिधी) ः शहरासह जिल्ह्यात शनिवारी (दि.तीन) 103 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या. चार कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. तर 61 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली. कक्षात भरती रुग्ण 626 आहेत. आजपर्यंत 238 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 5 हजार 618 कोरोनाबाधित व्यक्ती आढळले असून 4 हजार 754 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शनिवारी चार कोरोनाबाधित पुरूषांचा मृत्यू झाला.

MB NEWS:रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या परळी तालुका अध्यक्षपदी शुभम इंगळे यांची निवड*

इमेज
  * रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या परळी तालुका अध्यक्षपदी शुभम इंगळे यांची निवड* परळी (प्रतिनिधी) -: परळी येथील युवा कार्यकर्ते शुभम इंगळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए च्या तालुकाध्यक्षपदी दिनांक 30 सप्टेंबर रोजी बीड जिल्हा अध्यक्ष किशोर कागदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील समतामूलक राष्ट्रनिर्मितीसाठी आणि रिपब्लिकन पक्षाला राजकीय व्यापकता मिळवून देण्यासाठी व  अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी शेतकरी शेतमजूर व कामगारांना मिळवून देण्यासाठी व आपली असलेली निष्ठा पाहून राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिपक भाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली व बीड जिल्हा अध्यक्ष किशोर कागदे यांच्या आदेशावरून परळी तालुका अध्यक्ष पदी शुभम इंगळे यांची निवड करण्यात आली त्यांच्या या निवडी मुळे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

MB NEWS:रेल्वेद्वारे 24 विशेष रेल्वेगाड्या प्रस्तावित... रेल्वे विभागाद्वारे सणासुदीनिमित्त नियोजन...

इमेज
  रेल्वेद्वारे 24 विशेष रेल्वेगाड्या प्रस्तावित... रेल्वे विभागाद्वारे सणासुदीनिमित्त नियोजन...  परभणी,  (प्रतिनिधी) ः सणासुदीच्या दिवसांत 200 विशेष रेल्वे गाड्या धावणार असून त्यापैकी 24 विशेष रेल्वेगाड्या मध्यरेल्वेद्वारे 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत चालविण्याचे नियोजन केल्या गेले आहे. दरम्यान, मराठवाड्यातून दादर - जालना, मुंबई - नांदेड, मुंबई - लातूर व पुणे - नांदेड या रेल्वेगाड्या विशेष गाड्या म्हणून प्रस्तावित केल्या गेल्या आहेत.  कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने रेल्वे गाड्यांची वाहतूक पूर्णतः थांबवली आहे. अलीकडे अनलॉकच्या टप्प्यात काही विशेष रेल्वे धावू लागल्या आहेत. दसरा आणि दिवाळीच्या सणांसाठी रेल्वेच्या वतीने 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या काळात रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रेल्वेची नियमित प्रवासी वाहतूक बंद आहे. सर्व विभागीय व्यवस्थापकांना आपापल्या भागातील स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून करोनास्थितीचा आढावा घ्यावयाचा सल्ला रेल्वेमंत्रालयाने दिला आहे. तूर्त दोनशे गाड्या सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे, प्रत्यक्षात कदाचित यापे

MB NEWS:सकल मराठा समाजाची परळीत होणार रविवारी बैठक

इमेज
 *सकल मराठा समाजाची परळीत होणार रविवारी बैठक *  मोठ्या संख्येने उपस्थित राहा...धर्मराज खोसे* परळी वैजनाथ दि.०३ (प्रतिनिधी)           सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. यामुळे मराठा समाजातील मुलांचे शैक्षणिक तसेच नौकरीमध्ये मोठे नुकसान होत आहे. महाराष्ट्र शासनाने ही स्थगिती उठवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावेत व मराठा आरक्षणाची पुढील दिशा ठरवण्यासाठी तालुक्यातील सर्व सकळ मराठा समाजाची बैठक रविवारी (ता.०४) सकाळी ११. आहे. याबैठकीस सर्व समाजबांधवाने उपस्थित राहावे असे आवाहन धर्मराज खोसे सर यांनी केले आहे.                      अनेक वर्षांच्या संघर्षानंतर व परळीतील प्रखर आंदोलनामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते. पण सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. महाराष्ट्र शासन यासंदर्भात लवकर पाऊले उचलत नाही. म्हणून शहरातील शिवाजी चौक परिसरातील अक्षता मंगल कार्यालयात रविवारी (ता.०४)  तालुक्यातील सर्व सकळ मराठा समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये आरक्षणा संदर्भातील आंदोलनाबाबत पुढील दिशा ठरवायची आहे. त्यामुळे सर्व समाजबांधवानी बैठ

MB NEWS:डॉ. संतोष मुंडे यांची रायुकाँग्रेसच्या हिंगोली जिल्हा प्रभारीपदी निवड

इमेज
  डॉ. संतोष मुंडे यांची रायुकाँग्रेसच्या हिंगोली जिल्हा प्रभारीपदी निवड  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या हिंगोली जिल्हा प्रभारीपदी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली असुन तसे नियुक्ती पत्र त्यांना देण्यात आले आहे. डॉ. संतोष मुंडे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.            राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, खा.सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व ना.धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण व रविकांत वर्पे यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांची हिंगोली” जिल्हाप्रभारी पदावर  “नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.संतोष मुंडे यांचे नेहमीच गोर गरीब दिनदुबळ्यांच्या कार्यासाठी कार्य प्रेरणादायी आहे. दिव्यांग कुठल्याही अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर आसता. आगोदर

MB NEWS:नादुरुस्त उभ्या ट्रकला रुग्णवाहिका धडकली !

इमेज
  नादुरुस्त उभ्या ट्रकला रुग्णवाहिका धडकली !           सिरसाळा नजिक घडली घटना परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....    नादुरुस्त झाल्याने रस्त्यावर एका कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला परळीकडून बीडकडे जाणारी १०८ रुग्णवाहिका धडकली.यामुळे रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले आहे.सुदैवाने यामध्ये रुग्ण नव्हता.       सिरसाळा जवळ काल रात्री एक ट्रक नादुरुस्त झाल्याने रस्त्यावर एका कडेला उभा करण्यात आलेला होता.रात्रीच्यावेळी अंधारात लक्षात न आल्यानेपरळीकडून बीडकडे जाणारी १०८ रुग्णवाहिका धडकली.यामुळे रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ट्रकचेही नुकसान झाले आहे.सुदैवाने या रुग्णवाहिकेत कोणी रुग्ण नव्हता.

MB NEWS: परभणीःजिल्ह्यात ४६ व्यक्ती कोरोना बाधित; तीन जणांचा मृत्यू

इमेज
  जिल्ह्यात 46 व्यक्ती कोरोना बाधित, तीन व्यक्तीचा मृत्यू परभणी दि. 2 (प्रतिनिधी) ः शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (दि.दोन) 46 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या. तीन कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. तर 34 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली. कक्षात भरती रुग्ण 588 आहेत. आजपर्यंत 234 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 5 हजार 515 कोरोनाबाधित व्यक्ती आढळले असून 4 हजार 693 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी तीन कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यात दोन पुरूष व एका महिलेचा समावेश आहे.

MB NEWS: वीजपुरवठा बंद ठेवू नये-महावितरण व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्तता यांचे निर्देश

इमेज
 *⚫ वीजपुरवठा बंद ठेवू नये-असीमकुमार गुप्ता*   --------------------------------- मुंबई- कोरोनामुळे लाॅकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळे अनेकांना घरुन काम करावं लागत आहे आणि आता सगळ्या परिक्षासुद्धा ऑनलाईन होणार आहे. महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. याच सगळ्या परिक्षा सुरळीत पार पडावी यासाठी, आयटी व इतर क्षेत्रात वर्क फ्रॉम होम कामासाठी वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी उपाययोजना करावी. अत्यावश्यक कामे असल्याखेरीज वीज यंत्रणेच्या पूर्वनियोजित देखभालीसाठी वीजपुरवठा बंद ठेवू नये, असे निर्देश महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता यांनी दिले. दरम्यान, शालेय वर्ग, परीक्षा इतर महत्वाच्या परीक्षा ऑनलाईनद्वारे सुरु आहेत. त्यामुळे अखंडित वीजपुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेण्यात यावी. तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्थेतून प्राधान्याने वीजपुरवठा करण्यात यावा, असंही त्यांनी सांगितलं.

MB NEWS:'...नमस्कार मी धनंजय मुंडेंच्या कार्यालयातून बोलतोय!' जगमित्र कार्यालयातून चालवले जाते कोरोना हेल्प सेंटर

इमेज
 * '...नमस्कार मी धनंजय मुंडेंच्या कार्यालयातून बोलतोय!' जगमित्र कार्यालयातून चालवले जाते कोरोना हेल्प सेंटर* * कोरोना बाधित रुग्णांची विचारपूस, बेड उपलब्धी ते बिलात सवलत मिळवून देण्यासाठी केले जाते मदत कार्य* परळी (दि. ०२) ---- : एकीकडे राज्य शासन कोरोना बाधित रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून त्यांच्या परळी येथील जगमित्र संपर्क कार्यालयात 'कोरोना हेल्प सेंटर' सुरू करण्यात आले आहे. याद्वारे 'हॅलो, मी धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून बोलतोय, आपली विचारपूस करण्यासाठी फोन केला आहे....' यास्वरूपाचे कॉल बीड जिल्ह्यातील अनेक कोरोना बाधित रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना येत आहेत. या हेल्प सेंटर द्वारे कोरोना बाधित रुग्णांची ना. मुंडे यांच्या वतीने दूरध्वनीवरून आस्थेवाईकपणे चौकशी केली जाते. रुग्णांची विचारपूस करणे, त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का, काही मदत हवी का? एखाद्या रुग्णाला खाजगी रुग्णालयात दाखल व्हायचे असल्यास तिथे बेड उपलब्ध करून देणे, विविध औषधोपचार उपलब्ध

MB NEWS:परळीसाठी गौरवशाली: परळीचा १० वर्षिय तारांक आयाचित बनला जगातील सर्वात कमी वयाचा गेम डेव्हलपर*

इमेज
 • * परळीसाठी गौरवशाली: परळीचा १० वर्षिय तारांक आयाचित बनला जगातील सर्वात कमी वयाचा गेम डेव्हलपर * • _वडील चीन बाॅर्डरवर देशसेवा बजावताना सैनिक पाल्याचीही सृजनशीलतेत उत्तुंग भरारी_   • देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून देशसेवा बजावणार्या  जवान इंद्रजीत आयाचित या बापाच्या डोळयात मात्र आपल्या चिमुकल्याच्या यशाने आनंदाश्रु तरळून निघाले. --------------------------------------------------------------------------   परळी वैजनाथ, प्रतिनिधी..     परळी वैजनाथ ही अनेक रत्नांची खाण आहे.विविध क्षेत्रात येथील व्यक्तीमत्त्वे आपल्या कार्याचा ठसा उमटवून नावलौकिक प्राप्त करतात. यामध्ये परळीतील बालकं ही मागे नाहीत याचा प्रत्यय नुकताच आला असुन परळीतील नांदुरवेस भागातील मुळ रहिवासी असलेल्या परळीच्या केवळ १० वर्षे वयाच्या मुलाने जगातील सर्वात कमी वयाचा गेम डेव्हलपर होण्याचा सन्मान पटकावला आहे.वडील चीन बाॅर्डरवर देशसेवा बजावताना तारांक आयाचित या सैनिक पाल्याने सृजनशीलतेत उत्तुंग भरारी मारुन जगभरात परळीचे नाव उज्ज्वल केले आहे.      भारतीय सैन्यात कार्यरत असलेले परळीचे इंद्रजीत आयाचित सध्या लढाख मध्ये पोस्टिंग

MB NEWS:बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि.२ आॅक्ट़ोबर प्राप्त अहवाल....* जिल्ह्यात २०० रिपोर्ट पाॅझिटिव्ह.

इमेज
 * बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि.२ आॅक्ट़ोबर प्राप्त अहवाल....* जिल्ह्यात २०० रिपोर्ट पाॅझिटिव्ह. ८०४ अहवाल प्राप्त झाले. *परळीत ०८ रिपोर्ट पाॅझिटिव्ह;परळीचे सरकारी आकडे आले एकांकीवर :शुन्य कोरोनासाठी नागरिकांनी आणखी दक्षता घ्यावी!* जिल्ह्यात ६०४ रिपोर्ट निगेटिव्ह. ------------------

MB NEWS: *⭕अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह*

इमेज
 *⭕ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह *                                -----------------------------------      वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.    त्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांची सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण तात्काळ क्वारंटाइन झाल्याचे सांगितले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली.ट्रम्प यांनी ट्विट करताना म्हटले आहे, मी आणि माझी पत्नी मेलेनिया कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलो आहोत. आम्ही यामधून लवकरच बाहेर पडू. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूक प्रचाराला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत आपली सल्लागार होप हिक्सला कोरोनाची लागण झाल्याचे सांगत आपण क्वारंटाइन होत असल्याचे सांगितले होते. अजिबात विश्रांती न घेता सतत काम करणाऱ्य

MB NEWS:कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे म.गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी*

इमेज
  कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे म.गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी सोनपेठ दि.2 (प्रतिनिधी) - तालुक्यातील खडका येथील कै.राजकुमार मव्हाळे सेवाभावी संस्था संचलित कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा येथे म.गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला.           कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा प्रांगणात संपन्न झालेल्या जयंती कार्यक्रमास कै.राजकुमार मव्हाळे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे, मुख्याध्यापक डी.एल. सोनकांबळे, वसतीगृह अधिक्षक डी.एम.माने आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी शाळेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टंसिंग चे योग्य पालन करण्यात आले होते. तसेच सर्व उपस्थितांनी मास्कचा वापर केला होता.

MB NEWS: परभणी जिल्हा कोरोना अपडेटस्

इमेज
  जिल्ह्यात 75 व्यक्ती कोरोनाबाधित, पाच व्यक्तीचा मृत्यू...... .. परभणी दि. 1 (प्रतिनिधी) ः शहरासह जिल्ह्यात गुरुवारी (दि.1) 75 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या. पाच कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. तर 118 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली. कक्षात भरती रुग्ण 579 आहेत. आजपर्यंत 231 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 5 हजार 469 कोरोनाबाधित व्यक्ती आढळले असून 4 हजार 659 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुरूवारी पाच कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यात दोन महिला व दोन पुरूषांसह परजिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताचा समावेश आहे.

MB NEWS:यंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच!*

इमेज
 *⭕ यंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच!*                                    -----------------------------------       मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षात म्हणजे मार्च / एप्रिलपर्यंत सरकारने शाळा उघडू नयेत, असे मत देशातील ३४% पालकांनी मांडले. तर ३२% पालकांनी ३१ डिसेंबर, २०२० पर्यंत शाळा न उघडण्याचा निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया दिली. ७% पालकांनी १ आॅक्टोबर, १२% पालकांनी १ नोव्हेंबर, तर ९% जणांनी १ डिसेंबरपासून शाळा उघडाव्यात, असे मत नोंदवले.  ‘लोकल सर्कल’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातील हे निरीक्षण आहे. सप्टेंबरमध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भात याआधीही संस्थेने सर्वेक्षण केले होते. त्या वेळी २३% पालकांनी शाळा सुरू करण्यास पाठिंबा दिला होता. मात्र गेल्या काही दिवसांत वाढलेल्या कोरोना संसर्गामुळे या आकडेवारीत ३% घट दिसून आली. काही राज्यांत अटी-शर्तींचे पालन करून शाळा सुरू करण्याच्या सूचना आहेत. मात्र देशातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता पालकांच्या मनात धास्ती तसेच मुलांच्या सुरक्षेबाबत काळजी आहे. या सर्वेक्षणासाठी देशातील २१७ जिल्ह्यांतील १४ हजार ५०० पालकांच्या प्रतिक्रिया

MB NEWS:माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियान: परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनजागृतीपर पत्रकाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खा.सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते विमोचन

इमेज
  माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान: परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनजागृतीपर पत्रकाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खा.सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते विमोचन परळी वैजनाथ,प्रतिनिधी ...      राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे  यांच्या मार्गदर्शनाखाली माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माहितीपूर्ण जनजागृतीपर पत्रक काढण्यात आली आहेत.या जनजागृती पत्रकाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खा.सुप्रियाताई सुळे व मान्यवरांच्या  हस्ते मुंबईत विमोचन करण्यात आले.              माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनजागृतीपर पत्रक तयार केले असून आज (दि.१ )मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील साहेब,संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे,आ.संजयभाऊ दौड,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख आदी मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.परळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी या

MB NEWS:सुकेशनी नाईकवाडे यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव राधा मोहन साथी प्रतिष्ठान च्या वतीने सन्मान

इमेज
  सुकेशनी नाईकवाडे यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव राधा मोहन साथी प्रतिष्ठान च्या वतीने सन्मान परळी:- कोरोना महामारीच्या संकट काळात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्धल, कोरोना योद्धा म्हणून पत्रकार सुकेशनी नाईकवाडे(रॉय)यांचा राधा मोहन साथी प्रतिष्ठान च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा दैनिक मराठवाडा साठी चे संपादक चंदूलाल बियाणी व प्राध्यापक विनोद जगतकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ सॅनिटायझर  मास्क व प्रमाण पत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी दैनिक मराठवाडा साथी चे कार्यकारी संपादक प्रशांत जोशी, PCN न्युज चे संपादक  मोहन व्हावळे, पत्रकार संजीब रॉय,अजय पुजारी आदी उपस्थित होते.

MB NEWS:परळी औष्णिक विद्युत केंद्राचे व्यवस्थापक पदी बढती बदली झाल्याबद्दल बी. बी. गायकवाड यांना निरोप

इमेज
  परळी औष्णिक विद्युत केंद्राचे व्यवस्थापक पदी बढती बदली झाल्याबद्दल बी. बी. गायकवाड यांना निरोप  परळी (प्रतिनिधी) : औष्णिक विद्युत केंद्राचे व्यवस्थापक (मा.स.) पदी बढती होऊन नाशिक येथे बदली झाल्याबद्दल बी.बी. गायकवाड यांना चेम्बरी रेस्ट हाऊस येथे दि.०१/१०/२०२० रोजी निरोप देण्यात आला. त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गायकवाड हे एच.आर. सेक्शन चे अभ्यासू अधिकारी आहेत. यावेळी फुले-आंबेडकरी अभ्यासक इंजि.भगवान साकसमुद्रे, महाजेनको च मुख्य लिपिक संतोष शिंदे,  गौतम गायकवाड ओऍसिस इंजि. सर्विसेस चे गौतम गायकवाड, बी.बी गायकवाड यांचे सुपुत्र मानव आदी छायाचित्रात दिसत आहेत.

MB NEWS:बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि.१ आॅक्ट़ोबर प्राप्त अहवाल.... जिल्ह्यात १८२ रिपोर्ट पाॅझिटिव्ह. १२५०अहवाल प्राप्त झाले. परळीत ०९रिपोर्ट पाॅझिटिव्ह. जिल्ह्यात १०६८ रिपोर्ट निगेटिव्ह. ------------------

इमेज
  बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि.१ आॅक्ट़ोबर प्राप्त अहवाल.... जिल्ह्यात १८२  रिपोर्ट पाॅझिटिव्ह. १२५०अहवाल प्राप्त झाले. परळीत ०९रिपोर्ट पाॅझिटिव्ह. जिल्ह्यात १०६८ रिपोर्ट निगेटिव्ह. ------------------

MB NEWS:असे दिले धोंडे जेवण की......... माणुसकीलाही गहिवरून यावे ! परळीतील रोडे परिवाराचा मानवतेच्या दृष्टीने स्तुत्य उपक्रम

इमेज
  असे दिले धोंडे जेवण की......... माणुसकीलाही गहिवरून यावे ! परळीतील रोडे परिवाराचा मानवतेच्या दृष्टीने स्तुत्य उपक्रम परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      सध्या अधिक मास सुरू आहे.धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा महिना पर्वकाळ म्हणून समजला जातो.जावयाला धोंडेजेवण दिले जाते.अनेक आप्तस्वकीय यांना निमंत्रित करून धोंडे जेवण दिले जाते.परळीतील रोडे परिवाराचा मानवतेच्या दृष्टीने स्तुत्य उपक्रम या माध्यमातून राबवला आहे.    प्रत्येक मनुष्य हा समाजाच देण लागतं हे लक्षात घेऊन ;आपण सर्वांनी जमेल त्या प्रकारे गरजवंतांना सहकार्य करावे ,असे मत असणार्या  तसेच, वीरशैव वधु वर परिचय मेळावा माजी उपाध्याक्ष, युवा मदत फाऊंडेशन चे प्रमुख फाऊंडर व सामाजिक , धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असणार्या *सौ.वैशाली ताई बस्वराज आप्पा रोडे* व परिवार यांनी सध्या परळी शहरांमध्ये चालू असलेल्या अंडर ग्राउंड पाईपलाईन साठी आलेल्या परराज्यातील मजूर यांना धोंडे जेवणाचा कार्यक्रम ( पुरणपोळीचे जेवन , वस्त्र, हंडा,ग्लास देऊन ) केला. कोरोनाच्या काळात मानवतेच्या दृष्टीने महत्तवपूर्ण आदर्श असा उपक्रम राबविला..!!

MB NEWS:नवीन शैक्षणिक धोरणामुळे हे शिक्षण नाकारण्याचे धोरण -राजकुमार कदम

इमेज
  नवीन शैक्षणिक धोरणामुळे हे  शिक्षण नाकारण्याचे धोरण -राजकुमार कदम महाराष्ट्र विद्यालय मोहा येथे माजी खासदार काॅ.गंगाधरअप्पा बुरांडे स्मृतीदिन परळी वैजनाथदि.०१ प्रतिनिधी नवीन शैक्षणिक धोरण २०२० हे विद्यार्थी व शिक्षण व्यवस्था उध्वस्त करणारे असून घटनेच्या कलम ४५ ची पायमल्ली करणारे आहे.नवीन शैक्षणिक धोरणामुळे हे धोरण शिक्षण नाकारण्याचे धोरण म्हणून ओळखले जाईल असे मत मराठवाडा शिक्षक संघटनेचे केंद्रिय कार्यकारिणी सदस्य राजकुमार कदम यांनी व्यक्त केले.             तर प्रास्ताविकातून शिक्षण,आरोग्य,शेती,रोजगार व कामगार,महिला विषयक केंद्र सरकारची भूमिका ही जनमान्य नसून एकाधीरशाहीवादी असल्याचे मत अॅड.अजय बुरांडे यांनी व्यक्त केले.             बीड जिल्ह्याचे माजी खासदार,जेष्ठ स्वांतत्र्य सेनानी तथा महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे यांचा १२ वा स्मृतीदिन ०१ ऑक्टोबर ( गुरुवार ) रोजी मोहा येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी.कोविड 19 या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी व शारीरिक अंतर ठेवून निमंत्रित मान्यवरां

MB NEWS:बीड जिल्ह्यात हॉटेल, रेस्टॉरंट सुरु करण्यास परवानगी 5 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी; शाळा, महाविद्यालय तूर्तास बंदच

इमेज
  बीड जिल्ह्यात हॉटेल, रेस्टॉरंट सुरु करण्यास परवानगी 5 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी; शाळा, महाविद्यालय तूर्तास बंदच बीड :  अनलॉक 5 चे सुधारित आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी जारी केले. यामध्ये जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरु करण्यास परवानगी दिली आहे. याची अंमलबजावणी 5 ऑक्टोबरपासून होणार असून शाळा, महाविद्यालय व शिक्षण संस्था 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत.  बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येने 10 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. दिलासादायक बाब म्हणजे यातील सात हजारावर रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी उपाययोजना सुरु असतांनाच गुरुवारी प्रशासनाने अनलॉक 5 चे सुधारित आदेश जारी केले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील   शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहेत. याबरोबरच चित्रपटगृहे, जलतरण तलाव, उद्यान, सिनेमागृहही बंदच राहतील.  सामाजिक, राजकीय, क्रीडा,मनोरंजन कार्यक्रमांच्या आयोजनावरील निर्बंध कायम असून हॉटेल, रेस्टॉरंट, बार यांच्या एकूण क्षमतेच्या पन्नास टक्के ग्राहकांच्या मर्यादेत सुरु करण्यासाठी 5 ऑक्टोबरपासून पर