*सकल मराठा समाजाची परळीत होणार रविवारी बैठक
मोठ्या संख्येने उपस्थित राहा...धर्मराज खोसे*
परळी वैजनाथ दि.०३ (प्रतिनिधी)
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. यामुळे मराठा समाजातील मुलांचे शैक्षणिक तसेच नौकरीमध्ये मोठे नुकसान होत आहे. महाराष्ट्र शासनाने ही स्थगिती उठवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावेत व मराठा आरक्षणाची पुढील दिशा ठरवण्यासाठी तालुक्यातील सर्व सकळ मराठा समाजाची बैठक रविवारी (ता.०४) सकाळी ११. आहे. याबैठकीस सर्व समाजबांधवाने उपस्थित राहावे असे आवाहन धर्मराज खोसे सर यांनी केले आहे.
अनेक वर्षांच्या संघर्षानंतर व परळीतील प्रखर आंदोलनामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते. पण सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. महाराष्ट्र शासन यासंदर्भात लवकर पाऊले उचलत नाही. म्हणून शहरातील शिवाजी चौक परिसरातील अक्षता मंगल कार्यालयात रविवारी (ता.०४) तालुक्यातील सर्व सकळ मराठा समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये आरक्षणा संदर्भातील आंदोलनाबाबत पुढील दिशा ठरवायची आहे. त्यामुळे सर्व समाजबांधवानी बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन धर्मराज खोसे सर यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा