MB NEWS:यंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच!*

 *⭕यंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच!*                                  

 -----------------------------------     


 मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षात म्हणजे मार्च / एप्रिलपर्यंत सरकारने शाळा उघडू नयेत, असे मत देशातील ३४% पालकांनी मांडले. तर ३२% पालकांनी ३१ डिसेंबर, २०२० पर्यंत शाळा न उघडण्याचा निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया दिली. ७% पालकांनी १ आॅक्टोबर, १२% पालकांनी १ नोव्हेंबर, तर ९% जणांनी १ डिसेंबरपासून शाळा उघडाव्यात, असे मत नोंदवले.  ‘लोकल सर्कल’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातील हे निरीक्षण आहे. सप्टेंबरमध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भात याआधीही संस्थेने सर्वेक्षण केले होते. त्या वेळी २३% पालकांनी शाळा सुरू करण्यास पाठिंबा दिला होता. मात्र गेल्या काही दिवसांत वाढलेल्या कोरोना संसर्गामुळे या आकडेवारीत ३% घट दिसून आली. काही राज्यांत अटी-शर्तींचे पालन करून शाळा सुरू करण्याच्या सूचना आहेत. मात्र देशातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता पालकांच्या मनात धास्ती तसेच मुलांच्या सुरक्षेबाबत काळजी आहे. या सर्वेक्षणासाठी देशातील २१७ जिल्ह्यांतील १४ हजार ५०० पालकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. सरकार शाळा सुरू करण्यासंदर्भात पालकांच्या मतांच्या, प्रतिक्रियांचा विचार करून योग्य तो निर्णय घेऊ शकेल यासाठी हा अहवाल राज्य आणि केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार