MB NEWS:माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियान: परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनजागृतीपर पत्रकाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खा.सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते विमोचन

 माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान:

परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनजागृतीपर पत्रकाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खा.सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते विमोचन


परळी वैजनाथ,प्रतिनिधी ...

     राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे  यांच्या मार्गदर्शनाखाली माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माहितीपूर्ण जनजागृतीपर पत्रक काढण्यात आली आहेत.या जनजागृती पत्रकाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खा.सुप्रियाताई सुळे व मान्यवरांच्या  हस्ते मुंबईत विमोचन करण्यात आले.

             माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनजागृतीपर पत्रक तयार केले असून आज (दि.१ )मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील साहेब,संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे,आ.संजयभाऊ दौड,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख आदी मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.परळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी याबाबत मान्यवरांना माहिती दिली. यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे,विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख,जि. प.सदस्य प्रा.डॉ.मधुकर आघाव सर नगरसेवक राजेंद्र सोनी,शशिकांत बिराजदार,श्रीपाद पाठक आदी  उपस्थित होते.

       राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी अ भिनयान घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी जनजागृती पत्रक  उपयुक्त ठरणार आहेत.त्याचबरोभर हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी शहरात प्रभागनिहाय राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते जनजागृती अभियान राबविणार असुन ही पत्रके या माध्यमातून घराघरात वितरीत होणार आहेत. परळी राष्ट्रवादी काँग्रेस कोविड 19 संदर्भात सातत्याने विविध उपक्रम वकार्यक्रम राबवत आहे.याअनुषंगाने माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान यशस्वी करण्यासाठीही योगदान देण्यात येत आहे.या उपक्रमांचे मान्यवरांनी कौतुक केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !