MB NEWS:बीड जिल्ह्यात हॉटेल, रेस्टॉरंट सुरु करण्यास परवानगी 5 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी; शाळा, महाविद्यालय तूर्तास बंदच

 बीड जिल्ह्यात हॉटेल, रेस्टॉरंट सुरु करण्यास परवानगी


5 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी; शाळा, महाविद्यालय तूर्तास बंदच


बीड :  अनलॉक 5 चे सुधारित आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी जारी केले. यामध्ये जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरु करण्यास परवानगी दिली आहे. याची अंमलबजावणी 5 ऑक्टोबरपासून होणार असून शाळा, महाविद्यालय व शिक्षण संस्था 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत. 


बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येने 10 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. दिलासादायक बाब म्हणजे यातील सात हजारावर रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी उपाययोजना सुरु असतांनाच गुरुवारी प्रशासनाने अनलॉक 5 चे सुधारित आदेश जारी केले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील   शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहेत. याबरोबरच चित्रपटगृहे, जलतरण तलाव, उद्यान, सिनेमागृहही बंदच राहतील.  सामाजिक, राजकीय, क्रीडा,मनोरंजन कार्यक्रमांच्या आयोजनावरील निर्बंध कायम असून हॉटेल, रेस्टॉरंट, बार यांच्या एकूण क्षमतेच्या पन्नास टक्के ग्राहकांच्या मर्यादेत सुरु करण्यासाठी 5 ऑक्टोबरपासून परवानगी देण्यात आली आहे. यासाठीच्या सविस्तर मार्गदर्शक सुचना लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.  हे आदेश 31 ऑक्टोबरपर्यंत कायम राहणार असल्याचेही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी म्हटले आहे.


*ऑक्सीजन वाहतुकीला सूट*

कोरोनावरील उपचारात ऑक्सीजन हा महत्त्वाचा घटक आहे. सध्या ऑक्सीजनला मागणी वाढलेली असतांना पुरवठा मात्र मर्यादित स्वरुपात आहे. या पार्श्‍वभूमीवर ऑक्सीजन उत्पादन व वाहतुक करणार्‍या वाहनांना राज्यात व राज्याबाहेर कोणत्याही वेळेचे बंधन राहणार नाही.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !