MB NEWS:मंदिरबंदी काळात प्रतिवैद्यनाथाचे दर्शन घेत भाविक मानतायत समाधान

 


मंदिरबंदी काळात प्रति वैद्यनाथाचे दर्शन घेत भाविक मानतायत समाधान 

परळी वैजनाथ(प्रतिनिधी)

बारा ज्योर्तिलिंग असलेले श्रीक्षेत्र परळी वैजनाथ येथील मंदिर लाॕकडाऊन काळात पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे .अख्खा श्रावण महिना,अधिक मास भाविकांना भगवान श्रीवैद्यनाथ दर्शनापासून वंचित राहण्याची वेळ आली.

आपल्या पूर्वजांनी पुरातनकाळापासून भाविकांच्या सोयीसाठी  दूरदृष्टी ठेवून दर्शनासाठी जर मंदिरात कांही अपरिहार्य कारणांमुळे  अडचण असेल अथवा घाई घडबड भाविकांनाही असेल तर प्रतिवैजनाथाचे दर्शन घेतात.  वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वस पायथ्याशी असलेले छोटेखानी मंदिर असून ते प्रतिवैद्यनाथ म्हणून सुप्रसिद्ध आहे तेथेच भाविकभक्त ,महिला वृंद दर्शन घेत भगवान वैजनाथ दर्शनाचे समाधान मानतात.

पायरी जेथून सुरुवात होते तेथे प्रतिवैद्यनाथ मंदिर असून सततची होणारी कुचंबणा यामुळे श्रावण महिन्यात व लाॕकडाऊनकाळात भाविकांनी प्रतिवैद्यनाथ दर्शन करुन ,पायरीचे दर्शन घेऊन ते मेरु प्रदक्षिणा करून समाधान मानून अखंडीत व अव्याहतपणे नित्य  दर्शन करण्याची सेवा परळीच्या व पंचक्रोशीच्या भाविक जणांनी  चालूच ठेवली.

            •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

मंदिर पहाटे ४-3० ते ५ वाजण्याच्या दरम्यान नित्य उघडून मंदिराचे पुजारी असलेले श्री राजाभाऊ महाराज पुजारी हे  अभिसिंचन व षोडशोपचारे पूजा करतात.हि वंशपरंपरेने सेवा त्यांच्या पुजारी परिवारात अदलून बदलून साला बादप्रमाणे येत असते.

         ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

••••••••••••••••••••••••

(माहिती स्त्रोत:ॲड.दत्ता महाराज आंधळे )

••••••••••••••••••••••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !