MB NEWS:परळीसाठी गौरवशाली: परळीचा १० वर्षिय तारांक आयाचित बनला जगातील सर्वात कमी वयाचा गेम डेव्हलपर*
• *परळीसाठी गौरवशाली: परळीचा १० वर्षिय तारांक आयाचित बनला जगातील सर्वात कमी वयाचा गेम डेव्हलपर*
• _वडील चीन बाॅर्डरवर देशसेवा बजावताना सैनिक पाल्याचीही सृजनशीलतेत उत्तुंग भरारी_ •

परळीवैजनाथ, प्रतिनिधी..
परळी वैजनाथ ही अनेक रत्नांची खाण आहे.विविध क्षेत्रात येथील व्यक्तीमत्त्वे आपल्या कार्याचा ठसा उमटवून नावलौकिक प्राप्त करतात. यामध्ये परळीतील बालकं ही मागे नाहीत याचा प्रत्यय नुकताच आला असुन परळीतील नांदुरवेस भागातील मुळ रहिवासी असलेल्या परळीच्या केवळ १० वर्षे वयाच्या मुलाने जगातील सर्वात कमी वयाचा गेम डेव्हलपर होण्याचा सन्मान पटकावला आहे.वडील चीन बाॅर्डरवर देशसेवा बजावताना तारांक आयाचित या सैनिक पाल्याने सृजनशीलतेत उत्तुंग भरारी मारुन जगभरात परळीचे नाव उज्ज्वल केले आहे.
भारतीय सैन्यात कार्यरत असलेले परळीचे इंद्रजीत आयाचित सध्या लढाख मध्ये पोस्टिंगवर आहेत.चीन व भारत यांच्यातील तणावाच्या या परिस्थितीत त्यांच्या चौथीत शिकणाऱ्या १०वर्षाच्या मुलाने मोठा आनंद देत त्यांची छाती अभिमानाने फुलून येईल अशी कामगिरी केली आहे.तारांक इंद्रजीत आयाचित सध्या अहमदाबाद येथील आर्मी पब्लिक स्कूल मध्ये चौथीच्या वर्गात शिकतो. व्हाइटहॅट जूनियर ही एक मुंबईतील एडटेक स्टार्टअप आहे. ज्यामध्ये तरुण मुलांना कोडिंग शिकवण्यावर भर दिला जातो. मुलांसाठी (वय 6 ते 18) ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून प्रोग्रामिंग शिकण्यास तयार केले जाते आणि त्यानंतर गेम, अॅनिमेशन आणि अनुप्रयोग (अॅप्स) तयार करण्यास प्रोत्साहित केले जाते. यामध्ये मुलांना स्वतचे क्रियेशन करुन प्रझेंटेशन करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
व्हाइटहॅट जूनियर व्यासपीठावरील पहिल्या 15 मुलांना त्यांच्या स्वत: च्या स्टार्ट-अप्स तयार करण्यास आणि त्यांना फेलोशिप प्रदान करण्यास मदत करते.तसेच सिलिकॉन व्हॅली भेट घडवली जाते.या चॅलेंज मध्ये तारांक आयाचित याने स्वत:ची छाप पाडली असुन तो जगातील सर्वात कमी वयाचा गेम डेव्हलपर ठरला आहे. सृजन (क्रियेटिव्हिटी) क्षेत्रात त्याने कमी वयात बुद्धिमत्ता व प्रतिभा सिद्ध केली असुन जागतिक स्तरावर परळीचे नाव उज्ज्वल केले आहे.त्याच्या या उत्तुंग भरारी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.दरम्यान देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून देशसेवा बजावणार्या भारतीय जवान इंद्रजीत आयाचित या बापाच्या डोळयात मात्र आपल्या चिमुकल्याच्या यशाने आनंदाश्रु तरळून निघाले आहेत. आपल्या मुलाचा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रियाइंद्रजीत आयाचित यांनी व्यक्त केली आहे.
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाअभिनअभि तारक , असेच यश संपासं करीक रहा ...
उत्तर द्याहटवा