MB NEWS:रेल्वेद्वारे 24 विशेष रेल्वेगाड्या प्रस्तावित... रेल्वे विभागाद्वारे सणासुदीनिमित्त नियोजन...

  रेल्वेद्वारे 24 विशेष रेल्वेगाड्या प्रस्तावित...

रेल्वे विभागाद्वारे सणासुदीनिमित्त नियोजन... 



परभणी,  (प्रतिनिधी) ः सणासुदीच्या दिवसांत 200 विशेष रेल्वे गाड्या धावणार असून त्यापैकी 24 विशेष रेल्वेगाड्या मध्यरेल्वेद्वारे 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत चालविण्याचे नियोजन केल्या गेले आहे.

दरम्यान, मराठवाड्यातून दादर - जालना, मुंबई - नांदेड, मुंबई - लातूर व पुणे - नांदेड या रेल्वेगाड्या विशेष गाड्या म्हणून प्रस्तावित केल्या गेल्या आहेत. 

कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने रेल्वे गाड्यांची वाहतूक पूर्णतः थांबवली आहे. अलीकडे अनलॉकच्या टप्प्यात काही विशेष रेल्वे धावू लागल्या आहेत. दसरा आणि दिवाळीच्या सणांसाठी रेल्वेच्या वतीने 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या काळात रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रेल्वेची नियमित प्रवासी वाहतूक बंद आहे. सर्व विभागीय व्यवस्थापकांना आपापल्या भागातील स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून करोनास्थितीचा आढावा घ्यावयाचा सल्ला रेल्वेमंत्रालयाने दिला आहे.

तूर्त दोनशे गाड्या सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे, प्रत्यक्षात कदाचित यापेक्षा अधिक गाड्याही सुरू होऊ शकतात, असे म्हटले असून महाराष्ट्रात यापैकी 24 रेल्वे धावणार आहेत. राज्य सरकारांच्या गरजेनुसार प्रवासी वाहतुकीचा दैनंदिन आढावा घेण्याचा निर्णयही रेल्वेने घेतला आहे. जेथे गरज असेल, तेथे प्रवासी गाड्या सुरू केल्या जातील, असेही नमूद केले. 

दरम्यान, मध्य रेल्वेद्वारे खालील गाड्या प्रस्तावित आहेत. त्या विशेष रेल्वे गाड्यांची यादी...

17617/18 मुंबई - नांदेड - मुंबई तपोवन डेली एक्सप्रेस,

12729/30 पुणे नान्देड पुणे द्विसाप्ताहिक एक्सप्रेस,

12071/72 दादर जालना दादर जनशताब्दी डेली एक्स्प्रेस,

22107/08 मुंबई लातूर मुंबर्ई,

12105/06 मुंबई - गोंदिया - मुंबई विदर्भ एक्स्प्रेस,

12137/38 मुंबई - फिरोजपूर - मुंबई पंजाब डेली मेल,

11077/78 पुणे जम्मूतवी पुणे झेलम डेली एक्सप्रेस,

12133/34 मुंबई मंगळूर - मुंबई डेली एक्सप्रेस,

11033/34 पुणे दरभंगा पुणे साप्ताहिक एक्सप्रेस,

11017/18 लोकमान्य टिळक टर्मिनस कराईकल - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस,

11007/08 मुंबई - पुणे - मुंबई डेक्कन डेली एक्सप्रेस,

12127/28 मुंबई पुणे मुंबई इण्टरसिटी डेली एक्सप्रेस,

11009/10 मुंबई पुणे मुंबई सिंहगड डेली एक्सप्रेस,

12125/26 मुंबई पुणे मुंबई प्रगती डेली एक्सप्रेस,

12111/12 मुंबई अमरावती मुंबई डेली एक्सप्रेस,

12139/40 मुंबई नागपुर मुंबई सेवाग्राम डेली एक्सप्रेस,

12131/32 दादर साई नगर शिर्डी दादर त्रिसाप्ताहिक एक्सप्रेस,

12115/16 मुंबई सोलापुर मुंबई सिध्देश्वर डेली,

17411/12 मुंबई कोल्हापुर मुंबई डेली एक्सप्रेस,

12157/58 पुणे सोलापुर पुणे डेली इंटरसिटी,

12135/36 पुणे नागपुर पुणे त्रिसाप्ताहिक एक्सप्रेस,

12113/14 पुणे नागपुर पुणे गरीबरथ त्रिसाप्ताहिक,

11025/26 भुसावळ पुणे भुसावळ हुतात्मा डेली,

11039/40 कोल्हापुर गोंदिया कोल्हापुर महाराष्ट्र डेली एक्सप्रेस.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !