परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:डॉ. संतोष मुंडे यांची रायुकाँग्रेसच्या हिंगोली जिल्हा प्रभारीपदी निवड

 डॉ. संतोष मुंडे यांची रायुकाँग्रेसच्या हिंगोली जिल्हा प्रभारीपदी निवड 



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या हिंगोली जिल्हा प्रभारीपदी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली असुन तसे नियुक्ती पत्र त्यांना देण्यात आले आहे. डॉ. संतोष मुंडे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 

          राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, खा.सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व ना.धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण व रविकांत वर्पे यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांची हिंगोली” जिल्हाप्रभारी पदावर  “नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.संतोष मुंडे यांचे नेहमीच गोर गरीब दिनदुबळ्यांच्या कार्यासाठी कार्य प्रेरणादायी आहे. दिव्यांग कुठल्याही अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर आसता. आगोदर परभणी व हिंगोली प्रभारी पदाची जबाबदारी सक्षमपणे पारपाडली आहे. युवकांना एकत्र करत या दोन्ही जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटन वाढविण्यासाठी पुढे होते.राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातुन राज्यातील विविध जिल्ह्यात युवकांची फळी निर्माण करून मोठे संघटन मजबूत केले आहे. विधानसभा निवडणुकीत प्रचारात आघाडीवर योगदान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली सर्वसामान्यांसाठी केलेली लोकउपयुक्‍त कामे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार जनसामान्यांत पोहचविणेचे काम चांगल्या प्रकारे काम केले आहे. या सर्व कार्याची दखल घेत पुन्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसची काम करण्याची संधी दिली आहे. 

          राष्ट्रवादी युवक काँग्रेस व पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त युवकांचे मोठे संघटन उभारणीसाठी आपण जीवाचे रान करणार तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या पुरोगामी व राष्ट्रवादी विचारांना समाजाच्या तळागाळापर्यंत नेण्याचा आपला संकल्प असल्याचेही ते म्हणाले. तसेच ना.धनंजय मुंडे  यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातुन पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी काम करणार असल्याची भावना डॉ.संतोष मुंडे यांनी व्यक्त केली. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे बीड व हिंगोली जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!