MB NEWS:असे दिले धोंडे जेवण की......... माणुसकीलाही गहिवरून यावे ! परळीतील रोडे परिवाराचा मानवतेच्या दृष्टीने स्तुत्य उपक्रम

 असे दिले धोंडे जेवण की......... माणुसकीलाही गहिवरून यावे !

परळीतील रोडे परिवाराचा मानवतेच्या दृष्टीने स्तुत्य उपक्रम



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     सध्या अधिक मास सुरू आहे.धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा महिना पर्वकाळ म्हणून समजला जातो.जावयाला धोंडेजेवण दिले जाते.अनेक आप्तस्वकीय यांना निमंत्रित करून धोंडे जेवण दिले जाते.परळीतील रोडे परिवाराचा मानवतेच्या दृष्टीने स्तुत्य उपक्रम या माध्यमातून राबवला आहे.

   प्रत्येक मनुष्य हा समाजाच देण लागतं हे लक्षात घेऊन ;आपण सर्वांनी जमेल त्या प्रकारे गरजवंतांना सहकार्य करावे ,असे मत असणार्या  तसेच, वीरशैव वधु वर परिचय मेळावा माजी उपाध्याक्ष, युवा मदत फाऊंडेशन चे प्रमुख फाऊंडर व सामाजिक , धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असणार्या *सौ.वैशाली ताई बस्वराज आप्पा रोडे* व परिवार यांनी सध्या परळी शहरांमध्ये चालू असलेल्या अंडर ग्राउंड पाईपलाईन साठी आलेल्या परराज्यातील मजूर यांना धोंडे जेवणाचा कार्यक्रम ( पुरणपोळीचे जेवन , वस्त्र, हंडा,ग्लास देऊन ) केला. कोरोनाच्या काळात मानवतेच्या दृष्टीने महत्तवपूर्ण आदर्श असा उपक्रम राबविला..!!

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !