MB NEWS:नवीन शैक्षणिक धोरणामुळे हे शिक्षण नाकारण्याचे धोरण -राजकुमार कदम

 नवीन शैक्षणिक धोरणामुळे हे  शिक्षण नाकारण्याचे धोरण -राजकुमार कदम

महाराष्ट्र विद्यालय मोहा येथे माजी खासदार काॅ.गंगाधरअप्पा बुरांडे स्मृतीदिन



परळी वैजनाथदि.०१ प्रतिनिधी

नवीन शैक्षणिक धोरण २०२० हे विद्यार्थी व शिक्षण व्यवस्था उध्वस्त करणारे असून घटनेच्या कलम ४५ ची पायमल्ली करणारे आहे.नवीन शैक्षणिक धोरणामुळे हे धोरण शिक्षण नाकारण्याचे धोरण म्हणून ओळखले जाईल असे मत मराठवाडा शिक्षक संघटनेचे केंद्रिय कार्यकारिणी सदस्य राजकुमार कदम यांनी व्यक्त केले.

            तर प्रास्ताविकातून शिक्षण,आरोग्य,शेती,रोजगार व कामगार,महिला विषयक केंद्र सरकारची भूमिका ही जनमान्य नसून एकाधीरशाहीवादी असल्याचे मत अॅड.अजय बुरांडे यांनी व्यक्त केले.

            बीड जिल्ह्याचे माजी खासदार,जेष्ठ स्वांतत्र्य सेनानी तथा महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे यांचा १२ वा स्मृतीदिन ०१ ऑक्टोबर ( गुरुवार ) रोजी मोहा येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी.कोविड 19 या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी व शारीरिक अंतर ठेवून निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय साधेपणाने संपन्न झाला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून राजकुमार कदम हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे जेष्ठ संचालक तथा गावचे माजी सरपंच सुदाम देशमुख,संस्थेचे अध्यक्ष कॉ.प्रा.बाबासाहेब सरवदे ,संस्थेचे सचिव अॅड.अजय बुरांडे,संचालक कॉ.परमेश्वरअप्पा बुरांडे,कॉ.सुदाम शिंदे,कॉ.मुरलीधर नागरगोजे, कॉ.सखाराम शिंदे,कॉ.सरोज सरवदे मँडम,अप्पांच्या पत्नी श्रीमती महानंदाताई बुरांडे , प्रा.वाघमारे सर आदी मंचावर उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री.कदम म्हणाले की, मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार कायदा २००९ नुसार अंमलबजावणी करताना राज्यातील शाळा व शिक्षक संख्या वाढण्याचे सोडून सरकारने विद्यार्थी संख्या कमी असल्याच्या कारणाने  १४०० शाळा बंद केल्या.राज्यातील व देशातील कॉंग्रेस व भाजपा हे दोन्ही पक्ष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून आर्थिक धोरणे दोन्ही पक्षाची सारखीच आहेत.शिक्षण हे संविधानातील कलम ४५ नुसार मुलभूत अधिकारात येत असून बहुमताच्या जोरावर सरकार वेळोवेळी सोयीनुसार या कायद्यात बदल करीत शिक्षनाचे खाजगीकरण व बाजारीकरणावर दोन्ही सरकारचा जोर आहे.यातच नवीन शैक्षणीक धोरण २०२० हे तर सर्वसामान्य व्यक्तीला शिक्षण प्रवाहातून बाहेर टाकण्याचे काम करणार असून ग्रामीण भागात या शैक्षणिक धोरणाचे अतिशय वाईट परिणाम भोगावे लागतील असेही त्यांनी सांगितले.  

            तर प्रास्ताविकातून अॅड.अजय बुरांडे यांनी जगात विज्ञान व तंत्रज्ञान प्रगती करीत असताना कोविड 19 पुढे संपूर्ण जग हतबल झाल्याचे सांगत या काळात केंद्रातील सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली असून देश आर्थिक संकटात सापडल्याचे कारण कोविड 19 च्या संसर्गजन्य आजारामुळे झाली आहे असे जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे.केंद्रातील सरकार बहुमताच्या जोरावर एकाधीरशाहीपणाने वागत असून वेळोवेळी सोयीनुसार घटनेत व कायद्यात बदल करून सर्वसामान्य जनतेचा विचार न करता उद्योगपतीहिताचे धोरण स्वीकारत शिक्षण,आरोग्य,शेती,रोजगार व कामगार,महिला विषयक अन्यायकारक निर्णय पारित करीत आहे.मध्यमवर्गीयाची उन्नती करण्यापेक्षा उद्योगपती व भांडवलशाही यांना हितकारक निर्णय सरकार घेत आहे.मुक्त व्यापारी धोरण व डँकेल करार  स्वीकारल्यानंतरच आपल्या देशात शेतकरी आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढल्या आहेत.वेळोवेळी केंद्रातील व राज्यातील डाव्या विचाराचा पक्षांनी या निर्णयास विरोध केला वेळेप्रसंगी अणुकरार करतेवेळी विरोध करून सत्तेतून बाहेर पडले मात्र सर्वसामान्य जनतेच्या हिताकरिता प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.आज केंद्रातील व राज्यातील सरकार ज्या पद्धतीने सर्वसामन्य जनतेच्या विरोधातील निर्णय घेत आहे त्यावर एक सुजाण नागरिक व मतदार म्हणून आपण डोळसपणे पाहून वेळेप्रसंगी त्या कडाडून विरोध करण्याची जवाबदारी आपणावर आली आहे.नुकताच केंद्राने मंजूर केलेले शेतीविषयक कायद्यामुळे सर्वसामान्य शेतकरी व अल्पभूधारक शेतकरी उध्वस्त होणार असून वेळीच शेतक-यांनी सावध होऊन याला विरोध करणे आवश्यक आहे असे त्यांनी आपल्या प्रस्ताविकातून मनोगत व्यक्त केले.

या स्मृतीव्याख्यानमालेचे सूत्रसंचलन सहशिक्षक अंगद पेद्देवाड यांनी तर आभारव्यक्त महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.काळबा कसबे यांनी केले.


* कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर अतिशय साधेपणाने सर्व नियमांचे पालन करीत कार्यक्रम संपन्न

* शाळा परिसर विविधरंगी रांगोळी काढून सुशोभित करण्यात आला.

* आलेल्या सर्व मान्यवरांचे योग्य ती खबरदारी घेत निर्जंतुकीकरण करण्यात आले.

* निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !